Join us

मुलं फार चिडचिड करतात, नाकावर राग? आईबाबांच्या ५ चुकाही ठरतात त्रासदायक, पाहा काय करायचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2025 10:21 IST

Irritable children: Parenting mistakes: Child anger issues: Kids behavior: पालकांनी मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तर ते जीवनातील महत्त्वाचे धडे कधी शिकू शकणार नाही. त्यांनी कोणत्या चुका टाळायला हव्या हे जाणून घेऊया.

बाळ जन्माला आलं की, आई-वडील हौसेने त्यांच्यासाठी काही ना काही करतात.(parenting tips) आपल्याला लेकराला काही कमी पडू नये म्हणून दिवस-रात्र कष्ट करतात. (Irritable children) पण हळूहळू पालक मुलांचे सगळेच हट्ट पूर्ण करतात. मुलं म्हणतील ते त्यांच्या पुढ्यात आणून ठेवतात. पण मुलांच्या प्रत्येक मागणी बळी पडणं पालकांसाठी हानिकारक ठरू शकते.  (Emotional health in kids)मुलं हट्टीपणा करु लागली, रडू लागली की पालकांना त्यांची दया येते. अनेकादा त्यांच्या रडण्याकडे बघून पालक माघार घेतात. पण अशामुळे मुलांना वाईट सवयी सहज लागतात.(Angry child solutions) प्रसिद्ध पालकतज्ज्ञ परीक्षित जोबनपुत्र म्हणतात पालकांनी मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तर ते जीवनातील महत्त्वाचे धडे कधी शिकू शकणार नाही. कायमच ते आपल्यावर अवलंबून राहातील, ज्यामुळे त्याच्या शारीरिक विकासासह मानसिक विकासावर परिणाम होईल. पालकांनी कोणत्या चुका टाळायला हव्या हे जाणून घेऊया. 

मुलं शाळेत जाताना रडतात-घाबरतात? ५ गोष्टी करा, मुलं रोज आनंदानं जातील शाळेत-छान रमतील

1. सगळेच हट्ट पूर्ण करु नका

अनेकदा मुलं हट्टीपणा करु लागले की, पालक त्यांना ती वस्तू किंवा त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देतात. मुलांना हव्या असणाऱ्या वस्तू देणे थांबवा. त्यांना काही गोष्टींची किंमत वेळीच कळायला हवी. जर मुलांना सहज गोष्टी मिळू लागल्या तर त्याचे मूल्य त्यांना समजणार नाही. 

2. मुलांचा संयम पाहा

अनेकदा मुलांना कोणतीही गोष्ट देण्यापूर्वी धीर धरण्यास सांगा. ती गोष्ट फार महत्त्वाची नसेल तर ती देण्यासाठी काही वेळ घ्या. त्या वस्तूसाठी मुलं किती प्रयत्न करताय हे देखील पाहा. ज्यामुळे मुलांना धीर धरण्याची सवय लागेल. 

3. मुलांचे ऐकू नका 

अनेकदा मुलं हवं म्हणजे हवं असा हट्ट धरतात. अशावेळी पालकांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. आपल्या मुलांसाठी कोणती गोष्ट कोणत्या वेळी चांगली आहे याकडे अधिक प्राधान्य द्या. त्यांना तुमच्या नाही म्हणण्याची सवय लागली की, ते आपोआप सुधारतील. 

4. त्यांच्याशी बोला

पालकांनी मुलांशी वेळोवेळी बोलायला हवं. त्यांचे एखाद्या गोष्टीबाबत मत जाणून घ्या. मुलांना काय वाटतं हे पाहा. एखाद्या गोष्टीबाबत किंवा त्यांची विचारकरण्याची क्षमता पाहा. 

5. आपली भूमिका ठरवा

चांगले पालक होण्यासाठी पालकांनी नेहमी शिकण्याची तयारी ठेवा. कारण कधीही आपण जे बोलतो त्याचे पालन मुलं करत नाही. आपण जे काही करतो त्याचे अनुसरण मुले करतात. त्यासाठी योग्य पालक होण्यासाठी प्रयत्न करा. 

टॅग्स :पालकत्व