'आई होणं' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील कायम लक्षात राहण्यासारखा आणि अगदी मौल्यवान क्षण असतो. प्रेग्नन्सीचे ते दिवस असे असतात की, नवीन जीव आणि नवीन स्वप्नांची चाहूल लागते. स्त्रीच्या आयुष्यात येणारे हे खास क्षण आयुष्यभर एक गोड आठवण म्हणून कायम जपून ठेवण्याची प्रत्येकीची इच्छा असते, यासाठीच अनेकजणी आजकाल 'मॅटरनिटी फोटोशूट' करतात. प्रत्येक आई होणारी स्त्री हे क्षण आपापल्या परीने जपून ठेवते... मग कुणी महागडे मॅटरनिटी फोटोशूट करत तर कुणी सोहळे समारंभ...मातृत्वाचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रीता प्रदीप (Malayalam Actress Preeta Pradeep) हिने आपले मातृत्व एका आगळ्यावेगळ्या आणि पारंपारिक पद्धतीने साजरे केले आहे, जे सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे(Malayalam Actress Preeta Pradeep Maternity Shoot).
अभिनेत्री प्रीता प्रदीप लवकरच आई होणार असून ती सध्या तिच्या गरोदरपणाचा आणि नव्याने आई होण्याचा आनंद अनुभवत आहे. येत्या काही दिवसांतच तिच्या आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आपल्या या प्रवासातील प्रत्येक टप्पा तिने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. मात्र, तिने नुकतेच शेअर (motherhood celebration photos) केलेले फोटो हे केवळ फोटोशूट(viral maternity photos)नसून ती एक सुंदर कलाकृतीच म्हटली पाहिजे...
प्रीताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या बेबी बंपवर एक अतिशय सुबक आणि अर्थपूर्ण मेहंदी डिझाईन पाहायला मिळते. या डिझाईनमध्ये एका कमळाच्या फुलावर बसलेल्या आईने आपल्या बाळाला मायेने कुशीत घेतले आहे. हे मेहंदी डिझाईन पाहून कोणाचेही डोळे सुखावेल इतके ते मोहक आहे. भारतीय संस्कृतीत कमळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते, तर बाळाला कुशीत घेतलेली आई हे प्रेमाचे सर्वोच्च स्वरूप आहे. ही संपूर्ण कलाकृती आईचे मुलांवरील निस्सीम प्रेम आणि नव्याने आई होण्याच्या आयुष्याची सुरुवात यांचे प्रतीक म्हणून तिने आपल्या बेबी बम्पवर हे अप्रतिम मेहेंदी डिझाईन काढले आहे.
पारंपारिक हिरव्या रंगाची साडी, गुलाबी ब्लाऊज आणि दागिन्यांसोबतच प्रीता या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे हे 'युनिक' फोटोशूट पाहून मल्याळम चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. "आई होण्याचा आनंद यापेक्षा सुंदर पद्धतीने व्यक्त होऊच शकत नाही," अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
सोशल मिडिया माध्यमांवर हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले की, "माझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाशकिरण येणार आहे. मातृत्व म्हणजे प्रेमाचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे, ज्याची सुरुवात एका श्वासाने होते. आज मी माझ्या शरीरात घडणाऱ्या या चमत्काराचा उत्सव साजरा करत आहे". तिच्या या शब्दांनी अनेक नेटकरी भावुक झाले आहेत. प्रीता प्रदीपचे हे फोटोशूट केवळ फॅशन किंवा ट्रेंड म्हणून नाही, तर एका आईच्या आपल्या बाळाप्रती असलेल्या ओढीचे किंवा प्रेमाचे सुंदर उदाहरण आहे. कलेचा वापर करून मातृत्वाचा असा सोहळा साजरा करण्याची तिची ही कल्पना सध्या सोशल मिडीयावर ट्रेंडिंग आहे.
Web Summary : Malayalam actress Preetha Pradeep celebrated motherhood uniquely with a henna tattoo of mother and child on her baby bump. The beautiful, traditional photoshoot is trending, showcasing her love and the miracle of new life. Fans and celebrities are showering her with blessings.
Web Summary : मलयालम अभिनेत्री प्रीथा प्रदीप ने अपने बेबी बंप पर मेहंदी से माँ और बच्चे का चित्र बनाकर मातृत्व का अनोखा जश्न मनाया। खूबसूरत, पारंपरिक फोटोशूट ट्रेंड कर रहा है, जो उनके प्यार और नए जीवन के चमत्कार को दर्शाता है। प्रशंसक और सेलेब्रिटी उन्हें आशीर्वाद दे रहे हैं।