मूल जन्माला आलं की, पालकांची जबाबदारी वाढते.(Kajol parenting story) आपण आपल्या मुलांना ज्या पद्धतीने वाढवू, समजावू किंवा शिकवू त्याप्रमाणे ते वागतात. मुले पालकांचे अनुसरण करुन बाहेरच्या जगात वावरत असतात.(Bollywood celebrity kids) अनेकदा पालक मुलांचे मित्र-मैत्रिण बनण्याचा प्रयत्न देखील करतात आणि त्यांना यामध्ये यश देखील येते. पालकत्वाच्या बाबतीत बॉलिवूडमधील स्टार्स देखील मागे पडत नाही, त्यातील एक अजय देवगण आणि काजोल. (Why Nysa doesn’t want to be a girl)अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा हिचा मोठा चाहतावर्ग आहे.(Kajol on raising a daughter) ते नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.(Mother-daughter emotional moment) तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. ज्यामुळे ती प्रचंड ट्रोल होत असते. इतकंच नाही तर अनेक मुलाखतीत काजोल देखील आपल्या मुलांबद्दल सांगत असते.
मुलं शाळेत जाताना रडतात-घाबरतात? ५ गोष्टी करा, मुलं रोज आनंदानं जातील शाळेत-छान रमतील
काजोल म्हणते मी माझ्या दोन्ही मुलांची आई कमी आणि मैत्रिण जास्त आहे. त्यामुळे माझी मुलं माझ्याशी कोणत्याही टॉपिकवर बोलू शकतात. तिने एका मुलाखतीत याविषयी सांगितलं. त्यावर तिची मुलगी तिला असं म्हटली की, 'मला मुलगी कधीच नको'मला दोन मुलं हवी. त्यावर मी मुलीला म्हटलं जेव्हा तु स्वत:आई होशील ना, तेव्हा तुला कळेल आई झाल्यावर काय होतं. त्यातही एका मुलीची आई होणं काय असतं.
न्यासाला मुलगी नको तर मुलांची आई व्हायचं आहे. तिला असं वाटतं की मुलांची आई होणं अर्थात त्यांचा सांभाळ करणं खूप सोपं असतं. एका मुलाखतीत काजोल म्हणाली की मी अधिक शिस्तबद्ध आणि कडक राहण्याऐवजी मुलांच्या कलेने घेते, त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल तर ओरड्यापेक्षा त्यांची मैत्रिण होते. मी आई जरी असली तरी त्यांची मैत्रिण बनते. त्यावर एकदा न्यासाला असं म्हटलं तुला आई झाल्यावर समजेल. त्यावर न्यासा म्हणते मला मुलगीच नको, मला मुलं हवीत.
मोबाइल दाखवला नाही तर मुले जेवतच नाहीत? ३ सोपे उपाय लवकर करा, नाहीतर पस्तावाल-तज्ज्ञ म्हणतात...
काजोल म्हणते मुलांना असं वाटतं की पालकत्व सोप्प असतं. मुलांशी मैत्री करणे, त्यांना समजून घेणे हे आईला स्वाभाविकपणे जमत नाही. कारण या सगळ्यात आपण आई म्हणून स्वत:ला समर्पित करतो. मुलांशी मैत्री करण्यासाठी, त्यांच्या न पटणाऱ्या गोष्टी, संवाद किंवा इतर भावना मनात साठवून ठेवाव्या लागतात. ज्या कधी कधी खूप अस्वस्थ करतात. हे मनात ठेवण्यासाठी खूप कष्ट देखील घ्यावे लागते.
आई म्हणून मुलांसोबत मैत्रीचे नातं ठेवणं मला कठीण झालं होतं असं काजोल म्हणते. परंतु, एक चांगला पालक हा एक चांगला मित्र होऊ शकतो असं देखील मी मानते. काजोल म्हणते, मी आई जरी असली तर माझ्या मुलांनी मला सगळं काही येऊन सांगावं इतकी मोकळीक नक्कीच मी त्यांना दिली आहे.