Join us  

How To Teach Your child To Be Responsible : मुलं खूप त्रास देतात, अजिबात ऐकत नाहीत? ५ टिप्स, बेफिकीर मुलंही वागतील जबाबदारीने!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 3:46 PM

How To Teach Your child To Be Responsible : हट्टी आणि निष्काळजी मुले कधी कधी अशा चुका करतात, त्यामुळे मोठे नुकसान होते. पण याचा अर्थ पालकांनी हट्टी आणि निष्काळजी मुलांच्या प्रत्येक सवयीचा स्वीकार करावा असे नाही.

मुलांच्या संगोपनाचा थेट परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो. ज्या पद्धतीने तुम्ही मुलांचे संगोपन करता, तुमची मुले त्यांच्या आयुष्यात त्याच पद्धतीने वागतात. (Parenting Tips) पण अशी अनेक मुलं आहेत जी लहानपणापासूनच हट्टी आणि बेफिकीर असतात. हट्टी आणि निष्काळजी मुलांचे संगोपन करताना त्यांच्या सवयी सुधारणे हे पालकांसाठी मोठे काम असते. पालकांना नेहमी काळजी असते की मुलांच्या सवयी कशा सुधारायच्या? (Tips to make your kids responsible)

हट्टी आणि निष्काळजी मुले कधी कधी अशा चुका करतात, त्यामुळे मोठे नुकसान होते. पण याचा अर्थ पालकांनी हट्टी आणि निष्काळजी मुलांच्या प्रत्येक सवयीचा स्वीकार करावा असे नाही. अशा मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांनीही हुशार असणे गरजेचे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला पालकत्वाच्या अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही मुलांना शहाणे बनवू शकता. 

१) मुलांची तुलना करू नका

अनेक वेळा पालक आपल्या मुलाची तुलना त्यांच्या मित्रांशी आणि इतर मुलांशी करतात. असे केल्याने मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मुलांची नेहमी इतरांशी तुलना केल्याने नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. यामुळे मुले हट्टी आणि निष्काळजी देखील होऊ शकतात. मुलांची तुलना केल्याने त्यांना इतरांपेक्षा कमीपणा जाणवतो. म्हणून असं अजिबात करू नये. असे केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्याऐवजी मुलांना प्रेमाने समजावून सांगितल्यास सुधारणा होऊ शकते.

उन्हामुळे त्वचा जास्तच काळी पडलीये? फक्त 4 घरगुती उपायांनी मिळवा ग्लोईंग, डागविरहीत चेहरा

२) कडक शिक्षा देणं टाळा

मुलांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांच्या सवयी सुधारण्यासाठी, पालक कधीकधी त्यांना कठोर शिक्षा देतात. मुलांना त्यांच्या चुकांसाठी शिक्षा करणे आणि वारंवार फटकारणे यामुळे त्यांची सवय आणखी बिघडू शकते. खूप कठोर शिक्षा केल्याने तुमच्या मुलावर मानसिक ताण येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांची सवय हट्टी होऊ शकते. मुलांना शहाणे आणि जबाबदार बनवण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा देण्याऐवजी त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे. प्रथम त्यांना प्रेमाने समजावून सांगा आणि जर प्रेमाने पटत नसेल तर थोडं ओरडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब

३) मुलांना चूक समजावून सांगा

मुलाला मारहाण किंवा शिक्षा करण्याऐवजी, जर तुम्ही त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली तर ते त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील. मुलांना शिक्षा केल्याने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत नाही आणि ते त्यांची चूक पुन्हा करू शकतात. पण जेव्हा तुम्ही मुलाच्या चुका त्यांना समजावून सांगता आणि त्यांच्या चुकांची जाणीव करून देता तेव्हा त्यांना त्यांची चूक कळते.

४) मुलांना वेळ द्या

निष्काळजी आणि हट्टी मुलांना हाताळण्यासाठी, त्यांना वेळ देणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत खेळण्यासाठी दिवसभरात वेळ काढल्याने तुम्हाला त्यांच्यासोबत मिसळता येते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्ही त्यांचा मूड सहज समजू शकता आणि तुमच्या बॉन्डिंग चांगले राहील.

५) स्वत: उदाहरण बना

मुलांसमोर पालक जसे वागत असतात, तशीच सवय मुलांमध्येही रुजवली जाते. म्हणून, हट्टी आणि निष्काळजी मुलाची सवय सुधारण्यासाठी, आपण प्रथम स्वत: ला सुधारले पाहिजे. पालकांनीच आपल्या गरजा एकमेकांवर लादल्या किंवा मुलांसमोर भांडण केले, तर या वातावरणात मूल कधीच आज्ञाधारक होऊ शकत नाही. अशा स्थितीत आधी पालकांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. तरच ते आपल्या मुलाला जबाबदार बनवू शकतात

टॅग्स :पालकत्व