दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि मुलांच्या शाळा सुरु झाला. सुट्ट्या सुरु झाल्या की मुलांना फार आनंद होतो. ना अभ्यासाचे टेन्शन, ना शाळेत जाण्याची घाई.(how to improve child’s handwriting) रोज मित्रांसोबत आवडीचे खेळ खेळा असा रोजचा उपक्रम.(handwriting improvement tips for kids) पण सध्याच्या डिजिटल युगात मुलांना मोबाईल, टीव्ही आणि गेम्स इतके आवडतात की अभ्यास करण्याचा त्यांना कंटाळा येतो. आता पुन्हा हातात पेन, पेन्सिल आणि वही येणारं म्हटलं की त्यांना नकोसं होते.(messy handwriting solution) वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांना अक्षर तर समजतात पण लिहिताना मात्र त्यांची गल्लत होते.(easy handwriting trick for children) पूर्वीच्या काळी स्क्रीन टाइम कमी असल्यामुळे अनेक मुलांमध्ये अभ्यासाची गोडी आपल्याला पाहायला मिळायची. सध्या मुलांना लिहिण्यापेक्षा टायपिंग जास्त आवडते. ज्यामुळे पालकांची कायम तक्रार असते. माझं मूल अभ्यासात चांगलं आहे, पण अक्षर मात्र गचाळ आहे. मुलांना अभ्याला बसवलं तर ती जबरदस्ती बसवली आहेत असं वाटतं. हातात पेन जरी घेतला तरी चेहऱ्यावर त्यांच्या कंटाळा पाहायला मिळतो. त्यांच्या लिहिण्याच्या गचाळपणामुळे अभ्यासावर परिणाम होतो. ज्यामुळे मार्क्स देखील कमी मिळतात आणि आत्मविश्वास देखील कमी होतो. काही सोप्या आणि रोजच्या सवयींनी मुलांचं अक्षर केवळ सुंदरच नाही तर वाचनास सोपं आणि आकर्षकही बनू शकतं.
प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्पित गुप्ता म्हणतात पालक अनेकदा मुलांना बाराखडी किंवा अल्फाबेट शिकण्यासाठी घाई करतात. यामुळे मुलांवर दबाव येतो आणि त्यांना लिहिण्याची भीती वाटते. त्यासाठी मुलांना लिहियला शिकवण्याची सुरुवात अक्षरांनी नाही तर रेषांनी करा.
मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय! पार्टनरला मिठी मारुन झोपा, ५ फायदे- डॉक्टर म्हणतात...
मुलांची बोटांची पकड, हाताची हालचाल आणि डोळ्यांशी समन्वय चांगला असतो तेव्हा त्यांचे हस्ताक्षर चांगले असते. त्यासाठी पहिले पाऊल म्हणजे स्क्रिबलिंग. मुलांना कागद आणि पेन्सिल द्या. त्यांना हवं तसं त्यावर गिरवू द्या. ते वाकड्या-तिकड्या रेषा काढत असोत किंवा गोल ही त्यांची पहिली लिहिण्याची क्रिया असेल.
मुलांना उभ्या, आडव्या आणि तिरक्या रेषा काढण्याचा सराव लावा. ज्यामुळे हळूहळू त्यांना शिकण्यास मदत होईल. मुलांना पेन्सिल किंवा पेन हातात व्यवस्थित पकडता आला, लिहिता आले की त्यांचे अक्षर सुंदर आणि वळणदार होईल. मुलांना ओरडून, मारुन शिकवण्यापेक्षा शांत आणि प्रेमाने काही गोष्टी समजावून सांगितल्या तर ते हुशारच नाही तर स्वत:हून अभ्यासाला बसतील.
Web Summary : Children's handwriting is often messy due to increased screen time. Pediatrician Dr. Arpit Gupta suggests starting with lines instead of letters. Practice scribbling, drawing lines, and proper pencil grip to improve handwriting and make learning enjoyable.
Web Summary : स्क्रीन पर ज़्यादा समय बिताने के कारण बच्चों की लिखावट अक्सर ख़राब हो जाती है। बाल रोग विशेषज्ञ डॉ. अर्पित गुप्ता अक्षरों के बजाय रेखाओं से शुरुआत करने का सुझाव देते हैं। लिखावट सुधारने और सीखने को मज़ेदार बनाने के लिए स्क्रिबलिंग, रेखाएँ खींचने और पेंसिल को ठीक से पकड़ने का अभ्यास करें।