Join us  

मुलांना सतत रागवलं-ओरडलं तर ते पालकांचं ऐकतात? ‘हा’ घ्या खास मंत्र, रागवायची गरजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:50 AM

How to Handle Stubborn Child (Mulanna Shist Kashi Lavaychi) : मुलांना एकमेकांशी कसं वागायचं ते समजावून सांगा.  नियम तोडल्यानंतर मुलांना शिक्षा द्या पण मारण्याची किंवा ओरडण्याची नको

वाढत्या वयात मुलं चिडचिड करतात. मुलांच्या विकासासाठी हे फार महत्वाचे असते.  काही मुलं इतकी हट्टी असतात की शाळेतील वर्गातील मुलांची खेळणी हिसकावतता तर काही मुलं मोठ्याने ओरडतात.(5 Ways To Deal With A Stubborn Child) मुलाचं असं वागणं आई-वडीलांसाठी चिंतेचे कारण असते. (Parenting Tips in Marathi) मुलं कधी कोणती वस्तू मिळाली नाही किंवा हवं ते घेऊन दिलं नाही तर  रागराग करतात. काही सवयींकडे वेळीच लक्ष दिले तर मुलांना शस्त लागण्यास मदत होईल. (How to Handle Stubborn Child)

१) मुलांसाठी नियम ठरवून द्या

मुलांना एकमेकांशी कसं वागायचं ते समजावून सांगा.  नियम तोडल्यानंतर मुलांना शिक्षा द्या पण मारण्याची किंवा ओरडण्याची नको. मुलांना शांतपणे आपली चूक समजावून सांगा आणि त्यांची चूक झाल्यानंतर घरातील पसारा आवरण्याची किंवा पाठांतर करण्याची, घरात एखादं सोपं काम पूर्ण करण्याची, एक्स्ट्रा होमवर्क करण्याची शिक्षा द्या. 

२) मोठ्याने बोलू नका-ओरडू नका

आई-वडीलांनी कधीच आपल्या मुलांशी चिडून बोलू नये. मुलं कोणत्याही गोष्टीचा हट्ट करत असतील तर त्यांना चूक बरोबर यातील फरक समजावून सांगा आणि मुलांच्या भावना न दुखावता त्यांना समजावून सांगा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे टेंशन असेल तर त्याचा राग मुलांवर काढणं योग्य नाही. ऑफिसच्या आणि वैयक्तीक गोष्टी वेगवेगळ्या ठेवा.

ऐन तरूण्यात कंबर-सांधे दुखू लागले? हिवाळ्यात रोज १ लाडू खा; कॅल्शियम-प्रोटीन मिळेल, ताकद येईल

३) मुलांच्या मनातलं ओळखायला शिका

अनेकदा मुलं आपल्या पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हट्ट करतात. तुमचीसुद्धा मुलं असंच करत असतील तर त्यांच्याशी शांतपणे या विषयावर बोला.  मुलं हट्ट करतात  हे फार सामान्य आहे पण वारंवार जर मुलं हट्ट करत असतील तर ही सवय भविष्यात त्यांना महागात पडू शकते. 

४) मुलांसाठी एक रोल मॉडेल बना

मुलांसाठी घरातील सदस्य आदर्श असायला  हवेत. मुलांनीही इतरांचा सन्मान करायला हवा.  तुम्ही इतर कोणावरही ओरडत असाल किंवा वागण्यात नम्रता नसेल तर मुलांवरही चुकीचा परिणाम होऊ शकतो. म्हणून मुलांसाठी रोल मॉडेल बना तुम्ही जसे वागताय तसेच मुलांनी अनुकरण केले तर  ते एक चांगली व्यक्ती बनू शकतात.  

दूध आवडत नाही पण कॅल्शियमचं काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

५) मुलांना बदलांबद्दल वॉर्निंग द्या

मुलं मोठी होत असतातना त्यांना त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल करायला सांगा. नियम ठरवून द्या. घरातील व्यक्तीशीं कसे बोलावे, बाहेरील व्यक्तींशी कसे बोलावे याचे त्यांना ज्ञान द्या.  मुलं उद्धटपणे वागत असतील तर त्यांचा परिणाम काय होतो ते समजावून सांगा. 

टॅग्स :पालकत्व