Join us

सतत फोनला चिकटून बसली मुलं तर काय बिघडलं? ५ भयंकर दुष्परिणाम, तुमच्या मुलांना नैराश्य आलंय-वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 15:28 IST

Effects of Phone Addiction on Children: Children and Excessive Phone Use: 5 Negative Impacts of Phones on Kids: How Smartphones Affect Children's Mental Health: Phone Addiction in Children: The Dangers of Kids Spending Too Much Time on Phones: Depression in Children Due to Phone Overuse: सतत फोन पाहिल्याने मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या

कामाच्या व्यापामुळे आई-वडिल दोघेही व्यस्त असतात. बदलेल्या वेळेमुळे घर आणि काम असा दैनंदिन उपक्रम सुरु असतो. (Effects of Phone Addiction on Children) रात्री एकत्र बसून गप्पा मारणे, जेवणे किंवा मुलांना वेळ देणे हे चित्र सध्या पाहायला मिळत नाही. (5 Negative Impacts of Phones on Kids) मोबाईल आणि टीव्ही बघत पालकांना जेवण्याची आणि आपलं काम करण्याची सवय लागली आहे. हेच अनुसरण आपली मुलं करत असतात. मुलं जास्त रडू लागली, चिडचिड करु लागली की, पालक त्यांच्या हातात फोन टेकवतात. यामुळे त्यांना सारखी फोन पाहण्याची सवय लागते. (How Smartphones Affect Children's Mental Health)अगदी खाण्यापासून झोपण्यापर्यंत त्यांच्या हातात त्यांना मोबाईल हवा असतो. जराही नजरेआड झाला तर त्यांच्या भोंगा सुरुच. (Phone Addiction in Children) सतत मोबाईल पाहिल्यानं मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. आपल्या शरीरात डोपामाइन हार्मोन्स आहे. जे मेंदूच्या भागांवर कार्य करते. ज्यामुळे आपण आनंदी, समाधानी असतो. परंतु, सतत फोन पाहिल्यांमुळे यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे मुलांना नैराश्य येऊ शकते. मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतोय पाहूया. 

घाबरु नका!परीक्षेचं टेन्शन आले आहे? सद्गुरुंचा कानमंत्र ध्यानात ठेवा, राहाल स्ट्रेस फ्री

1. मानसिक आरोग्यावर परिणाम

मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहचवू शकते. सतत स्क्रीनवर वेळ घालवल्याने त्यांची एकाग्रता कमी होते. ज्यामुळे अभ्यास आणि इतर कामांपासून त्यांचे लक्ष विचलीत होते. फोनचा अतिरिक्त वापरामुळे मुले चिडचिडी आणि रागट स्वभावाची होतात.

2. झोपेच्या समस्या

 

सतत मोबाईल पाहून मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. फोनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांच्या नाजूक भागावर समस्या निर्माण करतात. ज्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. मोबाईलाचा निळा प्रकाश झोप नियंत्रित करणाऱ्या मेलोटोनिन हार्मोनवर परिणाम करतात. यामुळे मुलं सतत थकलेली वाटतात. 

3. डोळ्यांवर वाईट परिणाम 

मोबाईल स्क्रिनमधून निघणारे रेडिएशन आणि निळा प्रकाश मुलांच्या नाजूक डोळ्यांना हानी पोहचवतात. यामुळे डोळ्यांची आग होते, पाणी येते आणि दृष्टी अधुंक होणे यांसारख्या समस्या येतात. चश्मा लागण्याची देखील शक्यता अधिक असते. 

4. शारीरिक हालचालीवर परिणाम

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुले बाहेर खेळत नाही. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होतात. याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. लठ्ठपणासारख्या समस्यांना बळी पडू शकतात. सतत एकाचजागी बसून मोबाईल पाहिल्यामुळे त्यांच्या मनक्यावर आणि मानेवर परिणाम होतात. 

5. सामाजिक कौशल्यांवर परिणाम

मोबाईलच्या व्यसनामुळे मुलं सामाजिकदृष्ट्या कमकुवत होतात. मित्र आणि कुटुंबाशी गप्पा मारण्याऐवजी ते त्यांच्या फोनमध्ये व्यस्त राहातात. याच्या त्यांच्या संवाद कौशल्यावर आणि आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो. 

टॅग्स :पालकत्व