Join us

मोबाइल दाखवला नाही मुले जेवतच नाहीत? ३ सोपे उपाय लवकर करा, नाहीतर पस्तावाल - तज्ज्ञ म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 12:43 IST

Children mobile addiction: Kids addicted to smartphones: Child not eating due to phone: मुले सतत मोबाइल बघतात, जेवताना नाक मुरडतात डॉक्टर म्हणतात पालकांनी या गोष्टी करा...

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.(Children mobile addiction) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोनशिवाय आपले एकही पान हलत नाही. सध्या लहान मुलांना देखील स्मार्टफोनची सवय झाली आहे. अगदी झोपेतून उठल्यापासून त्यांना हातात फोन हवा असतो. (Kids addicted to smartphones)फोन बघितल्याशिवाय ते जेवत नाही. आठ-नऊ महिन्यांची मुलं युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या व्हिडीओच्या अधीन गेली आहेत.(Child not eating due to phone) परंतु, याचा गंभीर परिणाम मुलांच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहेत.(Mobile addiction in children) त्यामुळे डोळ्यांवर आणि मेंदूवरही परिणाम होतोय. मुलांना कार्टून बघण्याचे इतके वेड लागले आहे की, ते पाहिल्याशिवाय ते खात पित नाही.(Mobile addiction in children)

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

तज्ज्ञ सांगतात की, सतत मोबाइल पहाणे मुलांसाठी खूप वाईट सवय असू शकते. जास्त स्क्रीन टाइम मुलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात. तसेच मानसिक विकासावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेव्हा मुले अन्न खातात तेव्हा त्याची चव वास किंवा सुगंध त्यांना जाणवत नाही. जे त्यांच्यासाठी चांगले नसते. तसेच सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांवर दबाव येतो, त्यामुळे मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या गोष्टी करा. 

या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. 

1. जेवण करण्यापूर्वी मोबाइल फोन त्यांच्या आजूबाजूला ठेवू नका. मुलं जेवत असताना त्यांना एखादी गोष्ट सांगा किंवा त्याच्यासोबत गाणी गाऊ शकता. यामुळे त्यांचे लक्ष दुसरीकडे वळेल. 

2. मुलाला खाऊ घालताना किंवा फावल्या वेळेत त्यांच्याशी गप्पा मारा, ज्यामुळे त्यांचे संवादकौशल्य सुधारेल. 

3. जेवताना मोबाइल फोन वापरणे टाळा आणि आपल्या मुलांसोबत जेवा. आपली मुले आपल अनुकरण करत असतात हे पालकांनी नेहमी लक्षात ठेवा. 

4. मुलांकडून मोबाइल फोन हिसकावून घेऊ नका, त्यामुळे ते जास्त चिडचिड करतात. त्यांचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी इनडोअर गेम्स किंवा त्यांना इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा. 

 

टॅग्स :पालकत्व