Lokmat Sakhi >Parenting > राहाने 'अशी' मुलगी होणं मला मान्यच नाही, आलिया भट सांगतेय तिच्यावर अपेक्षांचं ओझं असेल पण..

राहाने 'अशी' मुलगी होणं मला मान्यच नाही, आलिया भट सांगतेय तिच्यावर अपेक्षांचं ओझं असेल पण..

Alia Bhatt's Expectations From Raha Kapoor: आलिया भटची लेक अजून लहान आहे, पण आई म्हणून ती सांगतेय पालकत्वाची खरी अपेक्षा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 05:39 PM2024-07-05T17:39:03+5:302024-07-05T17:40:40+5:30

Alia Bhatt's Expectations From Raha Kapoor: आलिया भटची लेक अजून लहान आहे, पण आई म्हणून ती सांगतेय पालकत्वाची खरी अपेक्षा. 

Alia Bhatt's expectations From raha kapoor, alia bhatt want her daughter raha to be a best version of herself | राहाने 'अशी' मुलगी होणं मला मान्यच नाही, आलिया भट सांगतेय तिच्यावर अपेक्षांचं ओझं असेल पण..

राहाने 'अशी' मुलगी होणं मला मान्यच नाही, आलिया भट सांगतेय तिच्यावर अपेक्षांचं ओझं असेल पण..

Highlightsआलिया म्हणाली की राहाने असंच असावं, तसंच असावं अशी माझी कोणतीही अपेक्षा नाही. मला असं वाटतं की तिने.....

अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लेक म्हणजे राहा कपूर. राहा अजून दोन वर्षांचीही नसली तरी तिची भरपूर चर्चा नेहमीच सोशल मिडियावर होत असते. बॉलीवूडमधल्या दोन बड्या कुटूंबांची नात आणि सुपरस्टार आई- वडिलांची लेक असणारी राहा म्हणजे रणबीर- आलियाच्या चाहत्यांसाठी नेहमीच कौतूकाचा विषय असतो. या गोष्टी जशा तिच्यासाठी आता अतिशय सकारात्मक आहेत, तशाच मोठेपणी त्या तिच्यावर दडपणही निर्माण करू शकतात. कारण प्रत्येकवेळी तिच्या बारीकशा कृतीकडेही त्याच नजरेतून पाहिलं जाणार. याचं दडपण कधी राहावर येऊ शकतं का, असा प्रश्न विचारला असता राहाची आई म्हणून आलियाने दिलेलं उत्तर खूप खास आहे. (Alia Bhatt want her daughter raha to be a best version of herself)

 

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा आलियाला हा प्रश्न विचारला गेला तेव्हा आलिया म्हणाली की राहाने असंच असावं, तसंच असावं अशी माझी कोणतीही अपेक्षा नाही. मला असं वाटतं की तिने इतर कोणत्याही गोष्टींचं दडपण घेऊन कधीही अशी व्यक्ती बनू नये, ज्यामुळे ती स्वत:च कधी आनंदी नसेल.

डोक्यावर तयार केली चहाची किटली!! बघा 'Tea Pot' हेअरस्टाईलचा भन्नाट व्हायरल व्हिडिओ 

कोणाची मुलगी, कोणाची नात होण्यापेक्षा तिने तिचंच स्वत:चं बेस्ट व्हर्जन व्हावं, ज्यात तिचा खरा आनंद आहे. आलिया म्हणते की माझा या गोष्टीवर पुर्ण विश्वास आहे की प्रत्येक मूल त्याची स्वत:ची काही कौशल्ये घेऊन जन्माला येत असतं.

मुलांचं टीव्ही- मोबाईल बघणं कमी करण्याचा १ खास उपाय, स्वत:हून स्क्रीन टाइम कमी करतील...

आपल्याला एक पालक म्हणून मुलांच्या त्या गुणांना विकसित करण्यासाठी फक्त वाव द्यायचा असतो, प्राेत्साहन द्यायचं असतं.  त्यामुळे मुलांना त्यांच्या वाटा त्यांच्या  मनाने निवडू द्याव्या. राहाच्या बाबतीतही माझा हाच विचार नेहमी असेल, असं आलिया सांगते..
 

Web Title: Alia Bhatt's expectations From raha kapoor, alia bhatt want her daughter raha to be a best version of herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.