आलिया भट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा कपूर ही सध्या अवघी ३ वर्षांची आहे. पण राहा जशी जन्माला आली तशीच तिच्याविषयीची जोरदार चर्चा रंगायला लागली. सुरुवातीला आलिया आणि रणबीर या दोघांनीही तिला मीडियापासून दूर ठेवले. पण राहा १ वर्षाची झाल्यानंतर जेव्हा त्यांनी तिला मीडियासमोर आणले तेव्हा तिच्या सौंदर्याची, निळ्या डोळ्यांची आणि तिच्यामध्ये आणि ऋषी कपूर यांच्या दिसण्यात असणारं साम्य यांची चर्चा झाली. इतर कोणत्याही स्टार किड्सपेक्षा राहा नेहमीच जास्त चर्चेत असते. आता पुन्हा एकदा आलियाच्या एका गिफ्टच्या निमित्ताने राहा सोशल मीडियावर गाजत असून ते गिफ्ट नेमकं कोणतं याची उत्सूकता आलिया आणि राहा या दोघींच्याही चाहत्यांमध्ये आहे...(Alia Bhatt's Gift For Daughter Raha)
काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघींच्याही Too Much with Kajol and Twinkle या टॉक शोमध्ये आलियाने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी आलियाला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. गप्पांच्या दरम्यान काजोलने आलियाला विचारले की तु राहासाठी रोज इमेल लिहितेस असं ऐकलंय,
दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी
यावर आलियाने हसून कबुली दिली आणि तिच्या एका मैत्रिणीकडून तिला ही कल्पना सुचल्याचं तिने सांगितलं. आलिया म्हणाली की तिने तिच्या आईकडून एकदा ऐकलं होतं की आई- वडील त्यांच्या कामात खूप बिझी असतात. त्यामुळे वाढत्या वयासोबत मुलांना अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात. याची खंत मग नंतर वाटत राहाते.
आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून मी राहाला रोज काही ना काही मेलमध्ये लिहिते. ते खूप काही मोठं असतं असं नाही. कधी कधी तर अगदी एखादी ओळ किंवा एखादा फोटोच असतो..
पंचविशीनंतर प्रत्येकीने करावाच 'हा' घरगुती उपाय! वय वाढलं तरी सौंदर्य खुलतच राहील...
सगळे इमेल्स एकत्र संग्रहित करून आलिया त्याचं छानसं पुस्तक तयार करणार आहे आणि ते पुस्तक राहाला तिच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून देणार आहे. आलियाचे प्लॅनिंग जबरदस्त असून राहासाठीही ते नक्कीच एक वेगळं आणि अतिशय स्पेशल गिफ्ट ठरेल..