आपल्या मुलांची उंची व्यवस्थित वाढत नाही यासाठी अनेक पालक चिंताग्रस्त असतात. आपल्या शरीराची योग्य वाढ होऊन आपल्याला शोभेल अशी हाईट असणे सगळ्यांनाचं आवडते. खरंतर, चांगली हाईट असणे किंवा उंची व्यवस्थित असण्याने आपले व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसते. आपली उंची कमी आहे किंवा (aaradhya bachchan fitness secret) आपण बुटके आहोत याबद्दल अनेकांना वाईट वाटते किंवा याची खंत मनात असते. वयोमानानुसार, मुलांची उंची वाढत नसेल तर पालक त्यावर अनेक उपाय (know aishwarya rai daughter diet plan that will help to growth height to your child) करतात. उंची वाढवायचे औषध, एक्सरसाइज, दोरी उड्या असे अनेक उपाय मुलांना करायला लावतात. या उपायांचा काहीवेळा फायदा होतो तर कधी नाही.
बॉलिवूड मधील स्टारकिड असलेली आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हिच्या हाईटची नेहमीच माध्यमांत चर्चा होत असते. परंतु तिची ही उंची वाढवण्यात आई ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai Bachchan) हिने फार मेहेनत केली असल्याचे समजते. ऐश्वर्याने आराध्याच्या लहानपणापासूनच तिच्या डाएटची योग्य काळजी घेतली असल्याचे दिसून येते. आराध्याची उंची वाढवण्यासाठी ऐश्वर्याने नेमकं कोणतं डाएट फॉलो केलं होत, यासोबतच आराध्याच्या डाएटमध्ये कोणकोणते पदार्थ होते ते पाहूयात.
आराध्याची उंची वाढवण्यासाठी आई ऐश्वर्याने फॉलो केल्या या टिप्स...
१. आराध्याच्या उंचीची नेहमीच माध्यमांत चर्चा होताना दिसते. फक्त १३ वर्षाची असणाऱ्या आराध्याची उंची ५ फूट ३ इंच इतकी आहे.
२. मुलीच्या जन्मानंतर आई ऐश्वर्या हिने तिच्या डाएट व आहाराची संपूर्ण काळजी घेतली. आराध्याच्या जन्मानंतर, ऐश्वर्या स्वतः स्वयंपाकघरात जाऊ लागली जेणेकरून ती तिच्या मुलीच्या आहाराची नीट काळजी घेऊ शकेल.
प्राजक्ता कोळी म्हणते महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स कशाला, मी करते घरगुती उपाय कारण...
३. ऐश्वर्याने आराध्याला तिच्या जन्मानंतर फक्त पहिले ६ महिने स्तनपान आणि त्यानंतर इतरही वरचे अन्नपदार्थ हळुहळु द्यायला सुरुवात केली. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनंयुक्त अन्नपदार्थांचा फार मोठ्या प्रमाणात समावेश होता. यामुळेच आराध्याला लहानपणापासूनच भरपूर पोषण मिळाले आहे.
भारती सिंग मुलाला देते हेल्दी ड्रायफ्रुटस चॉकलेट्स, पाहा ते घरी कसे करायचे - रेसिपी...
४. ६ महिन्यांपर्यंतच्या बाळासाठी आईचे दूध हा संपूर्ण आहार असतो, परंतु त्यानंतर त्याला वरचे अन्नपदार्थ आणि इतर पौष्टिक पदार्थ देखील खाण्याची आवश्यकता असते. म्हणून, तुम्ही बाळाला सफरचंद, केळी, डाळिंब यांसारख्या फळांसोबत दलिया, खिचडी आणि भाज्यांचा सूप देखील देऊ शकता.
५. आराध्याच्या उंची मागे फक्त तिचा आहार हेच एकमेव कारण नाही. तर यामागे वडील अभिषेक बच्चन आणि आई ऐश्वर्या बच्चन यांच्याकडून मिळालेले जीन्स देखील तितकेच कारणीभूत आहेत.