Lokmat Sakhi >Parenting > दहावीचा निकाल: आईबाबांनी निकालापूर्वी काय सांगायला हवं मुलांना, ५ गोष्टी- टेंशन होईल कमी

दहावीचा निकाल: आईबाबांनी निकालापूर्वी काय सांगायला हवं मुलांना, ५ गोष्टी- टेंशन होईल कमी

What to tell children before board results: Tips for parents before 10th result: दहावीच्या निकालाचं टेंशन येतंच, पण त्या मार्कांचा किती बाऊ करायचा याचा विचार पालकांनीच करायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2025 15:36 IST2025-05-12T15:35:53+5:302025-05-12T15:36:40+5:30

What to tell children before board results: Tips for parents before 10th result: दहावीच्या निकालाचं टेंशन येतंच, पण त्या मार्कांचा किती बाऊ करायचा याचा विचार पालकांनीच करायला हवा.

10th board exam results parents should tell their children before the results, 5 things tension will be reduced | दहावीचा निकाल: आईबाबांनी निकालापूर्वी काय सांगायला हवं मुलांना, ५ गोष्टी- टेंशन होईल कमी

दहावीचा निकाल: आईबाबांनी निकालापूर्वी काय सांगायला हवं मुलांना, ५ गोष्टी- टेंशन होईल कमी

दहावीचा निकाल ही आयुष्यातील फार मोठी गोष्ट असते. मुलांना ताण असतोच पालकांना त्यांच्यापेक्षा जास्त काळजी वाटते.(Reduce exam result stress in children) वाढती स्पर्धा आणि पुढे प्रवेशाचे टेंशन त्यामुळे चांगले मार्क मिळावेत असं सर्वांना वाटतं.(10th board result advice for parents) मुलांनाही स्ट्रेस येतो यामुळे अनेकदा परिस्थिती इतकी गंभीर होते की, मुलांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागते.(How to support child during exam result time) निकाल लागण्यापूर्वीच मुले गोंधळून जातात. वाढता तणाव आणि नैराश्यामुळे आत्महत्या करण्यासही ते प्रवृत्त होतात.(What parents should say before result day) आपण पुढे काय करायला हवे, कॉलेज कोणते असायला हवे याविषयी देखील त्यांची पालकांसोबत चर्चा करण्याचा आणि वाद झाल्याने मनस्ताप वाढण्याचा धोका असतोच. परंतु, यावेळी पालकांचा योग्य दृष्टीकोन आणि पाठिंबा महत्त्वाचा असतो. मुलांचा रिझल्ट असेल दहावीचा तर पालकांनी काही गोष्टी करायलाच हव्या..(Board exam result day parenting advice)

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

1. स्ट्रेस घेऊ नका, देऊ नका..

निकाल लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर पालकांनी मुलांशी जास्त गुण मिळायला हवे असे वारंवार बोलणे टाळा. यामुळे मुले अधिक चिंतेत पडतात. यापेक्षा पालकांनी मुलांच्या मेहनतीचे कौतुक करायला हवे. आता स्ट्रेस घेऊन उपयोग नाही. मुलांना सांगा, जो रिझल्ट लागेल तो आपण मनापासून स्वीकारु. पुढचं पुढे.

2. बोला, पण बोलायचं काय?

अनेकदा पालक मुलांना चांगले मार्क्स मिळाले तर त्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन देण्याचे आमिष दाखवतात. परंतु, अशावेळी मुलांच्या भावना आणि चिंतेबद्दल संवाद साधणे गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थितीत आम्ही सोबत आहोत असा पाठिंबा पालकांनी मुलांना द्यायला हवा. त्यांच्यावर टिका न करता त्यांचे मत ऐकून घ्या. टोमणे मारु नका.

वयाच्या चाळिशीतही पांढरे केस होतील काळे, तेलात मिसळा एक गोष्ट- केसगळतीही थांबेल, सोपा घरगुती उपाय

3. तुलना करणे टाळा

अनेकदा पालक मुलांचे वर्गमित्र, भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी तुलना करतात. ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास ढासळतो. प्रत्येक मुलाची स्वत:ची मेहनत, ताकद आणि कमकुवतपणा वेगळा असतो. पालकांनी आपल्या मुलांच्या क्षमता ओळखायला हव्या.
उगीच तुलनात्मक बोलण्यात काही अर्थ नाही.

4. तणाव कसा घालवाल?

निकाल लागण्यापूर्वीच मुलांना तणाव आला असेल. यामुळे अचानक बीपी कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते. यासाठी मुलांना ध्यान, माइंडफुलनेस यांसारख्या तणाव कमी करणाऱ्या पद्धती पालकांनी शिकवायला हव्या. तसेच त्यांना आवडणाऱ्या गोष्टीत त्यांचे मन जास्त रमवायला हवे. शक्य असेल तर काही विशेष बोलूच नका निकालाविषयी..

5. सकारात्मक दृष्टीकोन

परीक्षेच्या दरम्यान मुले अधिक अभ्यास करतात परंतु, निकाल मनासारखा लागला नाही की, त्यांना नैराश्य येते. असे काही घडण्यापूर्वीच पालकांनी मुलांच्या निकालाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा.जे होईल ते स्वीकारु, मी सोबत आहे हे मुलांना सांगणं पुरेसं आहे.

 

Web Title: 10th board exam results parents should tell their children before the results, 5 things tension will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.