Join us  

टॅलण्ट असूनही आपण मागे पडतोय असं सारखं वाटतं तुम्हाला? करा ५ गोष्टी, बदलेल जगणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 2:42 PM

Why you aren't successful despite being talented and hardworking आपल्यापेक्षा कमी गुणवत्तेची माणसं आपल्यापेक्षा फार पुढे निघून जातात असं का होतं? आपलं कुठं चुकतं?

आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वपूर्ण पैलू आहे. तो डळमळला की पुढची सगळी गणितं चुकतात. त्यामुळे आपला आत्मविश्वास कोणाच्याही बोलण्यावरून डळमळू देऊ नका. आत्मविश्वास कमी होईल या गोष्टी टाळा. जेव्हा आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा होणारी कामं देखील नीट होत नाही. आत्मविश्वास पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

काहींचा वाढता आत्मविश्वास त्यांच्या लो कॉन्फिडन्सला जबाबदार ठरतो, ज्याला अहंकार असे म्हटले जाते. काही लोकांचा वेळ विचार करण्यात जातो, ज्यामुळे ते योग्य अॅक्शन घेण्यात मागे पडतात. आपण या ५ टिप्स फॉलो करू शकता, ज्यामुळे कॉन्फिडन्स बुस्ट होईल, यासह जीवनात सकारात्मक सुधार होईल(Why you aren't successful despite being talented and hardworking, Tips to increase Confidence).

स्वतःवर शंका घेणे टाळा

काही लोकं अनेकदा स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो. दुसरीकडे, सेल्फ डाउटमुळे होणारे काम देखील बिघडते. त्यामुळे स्वतःवर शंका घेऊ नका. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. स्वतःवर विश्वास ठेऊन काम करत राहा.

कधी खूप आनंद होतो, उत्साही वाटतं? कधी डोळ्यात पाणी-प्रचंड दु:ख असं कशानं होतं?

योग्य आशा ठेवा

कधीकधी लोकांना स्वतःकडून मोठ्या अपेक्षा असतात. अशा स्थितीत अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे स्वत:कडून योग्य अपेक्षा ठेवा, स्वतःची क्षमता ओळखण्याचा प्रयत्न करा. यामुळे आत्मविश्वास कमी होणार नाही, व तुमचा स्वतःवरील विश्वासही कायम राहील.

नोकरीत दणक्यात यश मिळवायचं आहे? ३ मंत्र, म्हणाल त्या कामात येईल यश

नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा

नकारात्मकतेला बळी पडल्यानंतर, लोकं अनेकदा स्वतःवर डाऊट घेऊ लागतात. ज्यामुळे आत्मविश्वास तर कमी होतोच. पण मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच स्वतःबद्दल कधीही चुकीचे बोलू नका. ज्यामुळे आत्मविश्वास कमी होण्यापेक्षा वाढेल.

प्रत्येक काम पूर्ण करा

अनेकदा काही लोकं मोठी कामे पाहून घाबरतात. आपल्याकडून हे काम होणार नाही, किंवा काम वाढेल, अशी भावना मनात उद्भवते. हे नकारात्मक विचार स्वतःपासून लांब ठेवा. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. हे नकारात्मक विचार स्वतःपासून दूर ठेवून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.

सतत कमी लेखणारी, तुम्हाला काहीच जमत नाही म्हणणारी माणसे अवतीभोवती आहेत? हे गॅसलायटिंग तर नाही?

आपली बाजू सविस्तर मांडा

कमी आत्मविश्‍वासामुळे काही लोकं आपला मुद्दा इतरांसमोर उघडपणे मांडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी कमी होतो. अशा वेळी सर्वांसमोर न घाबरता मनाशी बोला. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल, व चारचौघात बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल.

टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्स