Join us
Daily Top 2Weekly Top 5

अगं सांगते...पण नेमका तोच शब्द विसरले! ओठावर शब्द पण आठवत नाही असं होतंय का तुमचंही..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 17:08 IST

why does a word feel stuck on the tip of the tongue : scientific reason behind forgetting words while speaking : बोलताना शब्द अगदी ओठांवर असतो पण आयत्यावेळी आठवत नाही, असं नेमकं का होतं?

आपण एखाद्या मित्राशी गप्पा मारत असतो किंवा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बोलत असतो आणि अचानक एका शब्दापाशी येऊन थांबतो. तो शब्द आपल्याला पूर्णपणे माहीत असतो, त्याच्याबद्दलची सर्व माहिती डोक्यात असते, अगदी तो शब्द कोणत्या अक्षराने सुरू होतो हेही आठवत असतं, पण तो नेमका ओठावर येत नाही. आणि अशावेळी आपण म्हणतो, "अरे, तो शब्द अगदी ओठांवर आहे, पण आठवत नाहीये!"(why words suddenly disappear from memory).

 अनेकदा एखाद्या व्यक्तीचं नाव, एखादा शब्द किंवा माहिती आठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती नेमकी आठवत नाही. मात्र मनात सतत असं वाटत राहतं की “अरे, हा शब्द तर ओठावर आहे!” किंवा नेहमीच्या वापरातला आहे पण आठवतच नाही... आणि काही वेळाने अचानक तो शब्द आठवतोही. हा अनुभव जवळपास आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी येतो आणि त्यामुळे थोडी चिडचिडही होते. वैज्ञानिक भाषेत या स्थितीतीला “Tip of the Tongue Phenomenon” असं म्हटलं जातं. म्हणजेच माहिती (scientific reason behind forgetting words while speaking) आपल्या मेंदूत साठवलेली असते, पण त्या क्षणी मेंदू ती योग्य पद्धतीने बाहेर काढू शकत नाही. ताण, थकवा, वाढतं वय किंवा मेंदूवरील ताण यांसारख्या अनेक गोष्टी यामागे कारणीभूत असू शकतात. , एखादा शब्द आठवणे ही एक बहुस्तरीय प्रक्रिया असते. जेव्हा ही साखळी कुठेतरी तुटते, तेव्हा शब्द 'ओठावर' असूनही बाहेर येत नाही. हा विसरभोळेपणा (why does a word feel stuck on the tip of the tongue) आहे की मेंदूची माहिती साठवण्याची पद्धत? यामागील मेमरी रिट्रायव्हलचं विज्ञान नेमकं काय असतं ते पाहूयात. 

नेमकं काय घडतं?

आपला मेंदू माहिती साठवताना ती एकाच ठिकाणी ठेवत नाही. एखाद्या शब्दाचा अर्थ, त्याचा उच्चार आणि त्याचे व्याकरण या तिन्ही गोष्टी मेंदूच्या वेगवेगळ्या कप्प्यात साठवलेल्या असतात. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा मेंदू या तिन्ही कप्प्यांतून (what causes tip of the tongue phenomenon in brain) माहिती गोळा करून ती सेकंदाच्या आत एकत्र करतो. 'टिप ऑफ द टंग'मध्ये होतं असं की, मेंदूला त्या शब्दाचा 'अर्थ' सापडतो, पण त्याचा 'उच्चार' ज्या कप्प्यात आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तात्पुरता खंडित होतो. यालाच वैज्ञानिक भाषेत 'मेमरी रिट्रायव्हल फेल्युअर' म्हणतात.

अंथरुणावर पडताच डोक्यात निगेटिव्ह विचारांचं काहूर - झोपेचं होतं खोबरं? ५ सोप्या गोष्टी करा - मन शांत होईल...

ही समस्या का निर्माण होते यामागे आपल्या मेंदूची कार्यपद्धती कारणीभूत असते. मेंदूमध्ये आपण अनेक माहिती, शब्द, नावं आणि आठवणी साठवून ठेवतो. जेव्हा आपल्याला एखादी माहिती आठवायची असते, तेव्हा मेंदू ती शोधण्याचं काम करतो. पण काही वेळा माहिती मेंदूत असली तरी ती योग्य वेळी पूर्णपणे बाहेर येत नाही. त्यामुळे आपल्याला त्या शब्दाचा पहिला अक्षर, त्याचा आवाज किंवा त्याच्याशी संबंधित काही गोष्टी आठवतात, पण नेमका शब्द आठवत नाही.

शब्द न आठवण्याची प्रमुख कारणे नेमकी कोणती ? 

१. मानसिक थकवा :- जेव्हा आपण खूप थकलेले असतो किंवा स्ट्रेसमध्ये असतो, तेव्हा मेंदूतील न्यूरॉन्सची माहिती पोहोचवण्याची गती मंदावते.

२. वयाचा परिणाम :- वाढत्या वयानुसार हा अनुभव अधिक वेळा येऊ लागतो, कारण मेंदूला माहिती शोधण्यासाठी जास्त वेळ लागतो.

३. चुकीचा शब्द आठवणे :- अनेकदा आपण ज्या शब्दाचा शोध घेत असतो, त्याच्याशी मिळताजुळता एखादा चुकीचा शब्द मेंदूमध्ये सतत समोर येतो. हा चुकीचा शब्द योग्य शब्दाला बाहेर येण्यापासून रोखतो.

काहीजणांकडे कायम प्रचंड पैसा येतो, असं का? १० गोष्टी लक्षात ठेवा, घरी येईल पैसाच पैसा...

ही समस्या टाळण्यासाठी नेमकं काय करावं ? 

१. दबाव टाकू नका :- तो शब्द आठवण्यासाठी मेंदूवर जास्त जोर देऊ नका. तुम्ही विचार करणं सोडलं की काही वेळाने मेंदू शांत होतो आणि तो शब्द आपोआप सुचतो.

२. शब्दांशी खेळायला शिका :- वाचन वाढवा आणि शब्दकोडी सोडवा. यामुळे मेंदूचे माहिती शोधण्याचे मार्ग अधिक मजबूत होतात.

३. पुरेशी झोप घ्या :- मेंदूची स्मरणशक्ती कायम चांगली ठेवण्यासाठी चांगली झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे.

'शब्द ओठांवर असतो पण आठवतच नाही' हे विसरभोळेपणाचे लक्षण नसून, आपला मेंदू किती गुंतागुंतीचा आहे हे सांगतं. हा एक अतिशय सामान्य अनुभव असून जगातील प्रत्येक व्यक्तीला तो कधी ना कधी येतोच. त्यामुळे पुढच्या वेळी शब्द सुचला नाही, तर गडबडून न जाता थोडा वेळ द्या, तुमचा मेंदू नक्कीच तो शब्द शोधून काढेल!

English
हिंदी सारांश
Web Title : Word on the tip of tongue? Science behind memory lapses.

Web Summary : Ever feel a word's on the tip of your tongue? It's common! Called "Tip of the Tongue Phenomenon," stress, age, or fatigue can disrupt memory retrieval. Brain separates word aspects; blockage causes recall failure. Relax, read, sleep well to help.
टॅग्स :मानसिक आरोग्यसोशल व्हायरल