वर्ष संपत आलं पण माझ्याने काहीच झालं नाही. असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं असेलच. विचाराचं काहूर आणि मनात उठलेलं वादळ काही केल्या क्षमवता देखील येतं नाही. प्रमाणापलिकडे विचार करुन थकले असूच. वर्ष संपायला जेमतेम १० ते १२ दिवस उरले हातात ना पैसा आहे, ना हवी असणारी माणसं. आहेत त्या फक्त आठवणी. करिअरचा तर नुसता गोंधळ उडालेला... (anxiety symptoms)
विचार करुन करुन मन आणि मेंदू दोन्ही अक्षरश: थकलं आहे. अचानक हात-पाय थरथरु लागतात. हृदयाची धडधड वाढते.(shortness of breath) डोळ्यांत नकळत पाणी येतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो. अशा क्षणी आपण स्वत:लाच ओळखू शकत नाही. बाहेरुन सगळं ठीक वाटत असलं, तरी मन आतून पोखरत असतं. माझंच काहीतरी बिनसलंय का? मी कमजोर आहे का? असे प्रश्न सतत डोक्यात घोळू लागतात. माझं काहीच नीट होणार नाही अशी भावना वारंवार सतावत असते.
आलिया भटप्रमाणे विसरा ‘लो हाईट कॉम्प्लेक्स!’ हिल्स न घालता उंच दिसण्यासाठी ५ टिप्स-दिसाल उंच स्मार्ट
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात ओव्हरथिंकिंग, ताणतणाव, असुरक्षितता, अपेक्षांचा भार आपल्याला अचानक पॅनिक अटॅक येतो. कामाचं प्रेशर, नात्यांमधील ओढाताण, भविष्यासंबंधीची भीती किंवा सतत स्वतःची तुलना. या सगळ्याचा परिणाम हळूहळू मनावर होत जातो. एक दिवस मन थकून जातं आणि शरीराच्या माध्यमातून ते व्यक्त होऊ लागतं. मग अशावेळी करायचं तरी काय असा प्रश्न कायम मनात सुरु असतो. काही सोपे उपाय पाहू, त्यानं आपलं मन नक्कीच शांत होण्यास मदत होईल.
1. अनेकदा आपण प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये स्वत:ला दोष देतो. आपण वेडे नाही, कमजोर नाही असं स्वत:ला ठामपणे बजावून सांगा. आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करुन खोलवर श्वास घ्या, काही सेकंद श्वास धरुन ठेवा आणि हळूहळू सोडा. हा साधा उपाय मेंदूला शांत करतो.
2. आपण जेव्हा ओव्हरथिंकिंग करतो तेव्हा एक मन चांगल्या गोष्टी सांगत असतं तर दुसरं मन वाईट गोष्टी. अशावेली स्वत:शी संवाद साधा. आपल्या मनाला ठामपणे बजावून सांगा. हे जे काही आहे ते क्षणिक आहे.
3. आपला श्वास गुदमरत असेल तर पाय जमिनीवर घट्ट टेकवा. परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहा. ही समस्या कशी सोडवता येईल याकडे लक्ष द्या. यामुळे आपल्याला भावनांवर नियंत्रण मिळवता येईल.
4. आपल्या रोजच्या जीवनशैलीत शारीरिक हालचाली, योग किंवा ध्यान यावर सगळ्यात जास्त भर द्या. ज्यामुळे शारीरिक ताण कमी होईल. तसेच शरीर आणि मन सक्रिय ठेवता येईल.
