लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांच्याच हातात आता मोबाईल दिसतो. काही वर्षांपुर्वी अशी परिस्थिती होती की गेम खेळणे, फोटो पाहाणे, मेसेज पाहणे किंवा सोशल मीडिया साईट बघणे अशी सवय लोकांना होती. पण आता मात्र रिल्सचा जमाना आहे. लांबलचक व्हिडिओ बघत बसायला आता कुणाला फारसा वेळ नाही. त्यामुळे मग रिल्स बघणाऱ्यांची आणि ते तयार करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे (Side Effects of Watching Reels on Brain and Mental Health). त्यामुळे मोबाईल उघडायचा आणि आपल्या आवडीच्या विषयाचे एकानंतर एक रिल्स तासंतास बघत बसायचे, अशी कित्येकांची अवस्था आहे. पण ही सवय मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरत आहे, असं नुकत्याच एका अभ्यासावरून लक्षात आलं आहे.(addiction of watching reels)
आपण कल्पनाही करू शकत नाही, एवढा त्या रिल्सचा वाईट परिणाम आपल्या मेंदूवर आणि आरोग्यावर होतो आहे. याविषयी The MES Times ने दिलेल्या वृत्तानुसार नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये एकूण १ लाख लोकांची पाहणी केली गेली.
छोट्याशा कुंडीतही उगवतील भरपूर सिमला मिरची! बघा सिमला मिरचीचं रोप वाढविण्याची सोपी पद्धत
या सगळ्या लोकांना मोबाईलवर स्क्रोलिंग करत बसण्याची आणि सतत रिल्स बघण्याची सवय होती. सर्व्हेक्षणामध्ये असं दिसून आलं की या सवयीमुळे या लोकांची विचारक्षमता दिवसेंदिवस कमी कमी होत चालली असून त्यांच्या भावनिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे.
दारू किंवा स्मोकिंग या व्यसनांमुळे मेंदूचे जेवढं नुकसान होतं त्याच्या ५ पट जास्त नुकसान मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे होत असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे. एकाग्रता कमी होते, स्वत:वरचा कंट्रोल कमी होणे, तर्कशक्ती कमी होणे यासोबतच एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस असा त्रासही रिल्स ॲडीक्ट लोकांमध्ये दिसून येतो.
व्यायामासाठी वेळ नसल्यास करा 'एक्सरसाईज स्नॅक्स'- फिट राहण्यासाठी नव्या जमान्याचा नवा फंडा
कारण हे लोक सतत एका रिल्सवरून दुसऱ्या रिल्सवर जातात, त्यामुळे त्यांच्या मेंदूला ती सवय लागते. त्यामुळे शांतपणे बसून विचार करणे, एखादी अडचण शांतपणे सेाडविणे अशा गोष्टी हळूहळू त्यांना जमेनाशा होतात. त्यामुळे आताच विचार करा आणि होता होईल तेवढे रिल्स पाहणे कमी करा, असं तज्ज्ञ सुचवतात.
