ग्लॅमर, प्रसिद्धी आणि पैसा म्हणजे सुखी आयुष्य असं आपल्याला कायम वाटतं. पण झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येतात. ज्यांची आपण कधी कल्पनाही करु शकत नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हसन हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. (Shruti Haasan anxiety)
गेल्या अनेक वर्षांपासून श्रुती एका गंभीर मानसिक आजाराशी झुंज देत होती. तिने या स्थितीला "क्रिपलिंग एन्झायटी" असं नाव दिलं असून, यामुळे तिचं आयुष्य कसं थांबलं होतं, याचा अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला.(Shruti Haasan mental health)
६ महिन्यांत पांढरे केस होतील कायमचे काळे! ‘या’ हिरव्या पानांचा हेअर मास्क लावा, डाय कलरची गरजच संपेल
श्रुती हसनने एका मुलाखतीत सांगितलं की ती अनेक वर्षे क्रिपलिंग अॅन्झायटी म्हणजेच मानसिक अस्वस्थतेशी झुंज देत होती. ही अवस्था इतकी गंभीर होती की तिला दैनंदिन आयुष्य जगणंही कठीण झालं होतं. साध्या हालचाली, कामावर लक्ष केंद्रित करणं किंवा पुढचा दिवस कसा जाईल याचाही तिला अंदाज येत नव्हता.
ती म्हणते की त्यातील काही दिवस असे होते की मला अंथरुणातून उठता येत नव्हतं. शरीर जरी काम करण्याचा प्रयत्न करत होतं तरी मन काही प्रतिसाद देत नव्हतं. अभिनयासारख्या क्षेत्रात काम करताना मानसिक ताण देखील वाढला. या त्रासामुळे मी अभिनयातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
२०१८ मध्ये अभिनयातून ब्रेक घेण्याच कारण तिने ब्रेकअप सांगितलं. ती म्हणते वेळीच काही गोष्टी समजणं देखील चांगले असते. पण हा काळ स्वत:ला समजून घेण्यासाठी चांगला काळ होता. मी कोण आहे, माझं अस्तित्व काय याकडे मी लक्ष दिलं. माझ्याकडे माझ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ होता. मी अनेक वर्षांपासून नैराश्याशी झुंजत होते आणि त्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण झाले होते.
मी लंडनमध्ये गाण्याच्या माध्यमातून स्वत:ला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला. स्वत:शी संवाद साधणं, थेरपी घेणं आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. हळूहळू मी सर्व गोष्टी स्वीकारल्या आणि पुन्हा तितक्या ताकदीने उभी राहिली. तिने आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांनाही आवाहन केलं आहे की, जर तुम्हालाही असा त्रास होत असेल, तर तो लपवू नका आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
