Lokmat Sakhi >Mental Health > भागे रे मन...! डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ७ सोपे उपाय, ओव्हिरथिंकिंग थांबेल, मन होईल शांत

भागे रे मन...! डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ७ सोपे उपाय, ओव्हिरथिंकिंग थांबेल, मन होईल शांत

how to stop overthinking :overthinking solutions in daily life: घराबाहेर पडण्यापूर्वीच आपल्या मनात काहीबाही विचार येतात. मन सैरभैर होतं, निर्णय सुद्धा घेता येत नाही. अशावेळी काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 18:31 IST2025-06-24T18:30:10+5:302025-06-24T18:31:24+5:30

how to stop overthinking :overthinking solutions in daily life: घराबाहेर पडण्यापूर्वीच आपल्या मनात काहीबाही विचार येतात. मन सैरभैर होतं, निर्णय सुद्धा घेता येत नाही. अशावेळी काय करायचं?

Restless mind Constant buzz of thoughts in your head? Try these 7 simple tips to stop overthinking and find inner peace | भागे रे मन...! डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ७ सोपे उपाय, ओव्हिरथिंकिंग थांबेल, मन होईल शांत

भागे रे मन...! डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ७ सोपे उपाय, ओव्हिरथिंकिंग थांबेल, मन होईल शांत

कितीही काही केलं तरी अडचणी काही संपायचं नाव घेत नाही. आपलं कसं होईल? वेळेत सगळं होईल ना? ऑफिस-घर नीट सांभाळू ना? पगार पुरेल ना? करिअर चुकत नाही आहे ना? नात्यातील तणाव,असे अनेक प्रश्न वारंवार आपल्या डोक्यात फिरत असतात.(mental peace tips) एका क्षणासाठी वाटतं की, सारं काही संपलंय आता आणि आपण भल्या मोठ्या खड्ड्यात पडू. खूप हताश झाल्यासारखं वाटतं, पुढचा रस्ताच दिसत नाही. (reduce anxiety and overthinking)
कोरोनामुळे साऱ्या जगानं ही भीती अनुभवली पण सध्या देशभरात सुरु असलेल्या घटनांमुळे मन हेलावून टाकले आहे.(how to stop overthinking) अपघात, युद्ध, खूण, मारामारी, कामाचा ताण यामुळे आपल्या मनासह मेंदूवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे बरेचदा आपण त्या ठिकाणी असूनही नसल्यासारखे वाटते.(overthinking solutions in daily life) घराबाहेर पडण्यापूर्वीच आपल्या मनात काहीबाही विचार येतात.(ways to calm your mind) मन सैरभैर होतं, निर्णय सुद्धा घेता येत नाही.(natural ways to relax your mind) अशावेळी काय करायचं? काही सोपे उपाय पाहूयात, ज्यानं आपलं ओव्हरथिकिंग थांबून मन शांत होण्यास मदत मिळेल. (how to control thoughts)

भीती वाटते, आपलं कसं होणार भविष्यात? निर्णयच घेता येत नाही? वाचा मन शांत करणारे ४ उपाय

1. रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे तरी आपल्या मनातील गोष्टी एका डायरीमध्ये लिहा. यामध्ये आपण आपल्या भावना आणि विचार मांडू शकता. त्यामुळे ताण कमी होईल तसेच आपल्याला शांत झोप लागेल. 

2. अनेकदा गाणी ऐकल्यामुळे आपला मूड सुधारतो. यामुळे आपली स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याचे कौशल्य सुधारा. ज्या वेळी आपल्याला अस्वस्थ वाटेल तेव्हा हेडफोन वापरा आपले आवडते गाणे ऐका, ज्यामुळे मन शांत होईल. 

3. रात्री ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. ज्यामुळे मानसिक आणि भावनिक स्थिती सुधारेल. झोपेचा अभाव तणाव वाढवण्यास आणि निर्णय घेण्यास अडचणी निर्माण करतात. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी पुरेशी झोप घ्या. 

९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने केसांना लावतात कांद्याचा रस, योग्य पद्धत पाहा- केसांची होईल वाढ

4. अनेकदा तणावामुळे कामावर फोकस करणे कठीण जाते. अशावेळी सुट्ट्या घेऊन थोडी विश्रांती घ्या. निसर्गाच्या सान्निध्यात जा. मोकळ्या वातावरणात फिरा. ज्यामुळे मन शांत होऊन आपल्याला काम करण्यास नवीन ऊर्जा मिळेल. 

5. आपल्या ऑफिसमधल्या डेस्कवरील नकारात्मक गोष्टी बदला. डेस्कवर सुंदर आणि सकारात्मक गोष्टी ठेवा, ज्यामुळे आपले मन प्रसन्न राहिल. 

6. रोज दिवसातून १५ ते २० मिनिटे ध्यान करा. मनाला शांत करण्यासाठी मेडिटेशन करा. १५ ते २० मिनिटे मोकळ्या हवेत फिरा. 

7. फोन आणि सोशल मीडियापासून काही वेळ दूर राहा. दिवसातून किमान काही वेळ तरी फोनला बाजूला ठेवा. आपल्या माणसांशी संवाद साधा. कुटुंबासोबत, मित्रांसोबत वेळ घालवा.  

 

Web Title: Restless mind Constant buzz of thoughts in your head? Try these 7 simple tips to stop overthinking and find inner peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.