Join us  

मुलं लहान, घरात हजार कामं - म्हणजे तुमचं करिअर संपलं? करा ३ गोष्टी, पाहा आनंदी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2024 11:15 AM

Resolution for mommies to be happy and energetic in new year : लग्न, मूल झाल्यावरही आनंदी, उत्साही राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत...

लग्नाआधीचं मुलींच आयुष्य आणि लग्नानंतरचं यामध्ये बरीच मोठी तफावत असते. लग्न झाल्यावर एकवेळ ठिक आहे पण मुल झालं की मात्र सगळंच ३६० अंशाच्या कोनात बदलून जातं. हे फक्त आपलंच नाही तर जोडीदारांपैकी दोघांचे, कुटुंबातील सगळ्यांचेच असे होण्याची शक्यता असते. पण महिलांच्या दृष्टीने करिअर, मित्रमंडळी,सोशल लाईफ यांना लग्न आणि मूल या गोष्टींमुळे बराच ब्रेक लागण्याची शक्यता असते. सुरुवातीला आपल्याला या बदलाविषयी फारसे काही वाटत नाही पण कालांतराने आपण कसे होतो आणि आता आपले काय झाले अशा प्रकारचा फिल महिलांना यायला लागतो. काही जणींना तर करिअरमधून ब्रेक घ्यावा लागल्याने आपण खूप मागे पडल्यासारखे वाटते. पण असे होऊ नये आणि आपण प्रवाहासोबत असावे यासाठी नव्या वर्षात काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे (Resolution for mommies to be happy and energetic in new year) . 

१. आपण नेहमी कुटुंबाचा, मुलांचा विचार करत असतो. पण हे करत असताना स्वत:ला आनंदी, उत्साही ठेवण्यासाठी नव्या वर्षात आवर्जून प्रयत्न करायला हवेत. कारण आपण आतून आनंदी असू तर आपली मुले, घरातील इतर व्यक्ती आणि एकूणच वातावरण सकारात्मक राहायला मदत होते. 

२. ऑनलाईन किंवा ऑफलाईन बरेच लर्निंग प्लॅटफॉर्म असतात. याबाबत वेळच्या वेळी चौकशी करुन स्वत:ला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. मुलांमुळे करिअरमध्ये ब्रेक पडला असेल तर अशाप्रकारचे कोर्सेस करुन स्वत:ला अपडेट करणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे आपण इतरांपेक्षा मागे पडलो असे होत नाही आणि नव्याने येणारे तंत्रज्ञान अपडेट होत राहते. त्यामुळे आपल्या करिअरशी निगडीत गोष्टींपासून आपण तुटले जात नाही.

३. बौद्धिकदृष्ट्या तुम्ही स्वत:ला अपस्कील केलं तर नकळत तुमच्या आत्मविश्वासावर त्याचा परीणाम होईल आणि तुम्ही मागे पडलात असा फिल तुम्हाला येणार नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता. नवीन गोष्टी शिकल्याने नक्कीच तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटण्यास मदत होईल. 

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइलपालकत्व