Join us
Daily Top 2Weekly Top 5

New Year 2026 Resolutions: मागे सुटलं ते आपलं नव्हतंच... नव्या वर्षात करा स्वत:मध्ये ५ बदल, मिनिटांत सुटेल 'मना'चा गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2025 13:42 IST

New Year 2026 resolutions: Mental clarity in 2026: Self improvement tips: नवीन वर्षात मनाची काळजी घेण्यासाठी करा ५ बदल..

संत तुकाराम महाराज म्हणतात नको नको मना गुंतूं मायाजाळी... असं आपण कायमच ऐकत आलो. नवीन वर्ष आलं की कॅलेडर बदलतं, पण मनातले प्रश्न काही संपत नाही. अपयशाच्या आठणवींमध्ये अडकून पडल्यासारखे वाटते. आपण कमी पडलो का ही भावना सतत मनात घर करते.(New Year 2026 resolutions) ठरवलेल्या गोष्टी मिळाल्या नाही, ठरवलं ते घडलं नाही आणि हातून सगळंच काही निसटून गेलं असं वाटू लागते. पण एक गोष्ट कायम मनात असायला हवी. मागे सुटलं ते आपलं कधीच नव्हतं, पुन्हा नव्या ताकदीने नव्या संधी तयार करु.(Mental clarity in 2026)आपल्या मनाला जे वाटेल, जे सुचेल आपण त्या पद्धतीने जात असतो. मनाची आणि बुद्धीची कायम आतल्या आत घुसमट होत असते.(Self improvement tips) पण मनाचा कौल मिळाला की ही घुसमटही थांबते. जग सुंदर वाटू लागतं. आपलं मन सतत भूतकाळात अडकलेलं असतं. तेव्हा वेगळा निर्णय घेतला असता तर…, तो प्रसंग टाळला असता तर… अशा विचारांचा गुंता दिवसेंदिवस घट्ट होत जातो. हा गुंता सोडवण्यासाठी मोठे बदल नाही, तर ५ छोटे पण प्रभावी बदल पुरेसे आहेत.

नव्या वर्षात १५ दिवसात करा वजन कमी! 'हे' सुपर ड्रिंक प्या, दिसाल सडपातळ-पोट आणि मांडीवरची चरबी गायब

1. खरंतर आपल्या यशाच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा मी उद्या करेन हा विचार. कमी वेळेत होणारे काम लगेच उरकून घ्या. कामात आळसपणा केला तर त्याचा ताण देखील वाढतो. त्यासाठी नव्या वर्षात संकल्प करा आजचे काम आजच पूर्ण करुया. 

2. दुसरी गोष्ट अशी अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम कामावर होतो. ज्यामुळे काम थांबवते. मनात विचार येतात. आपण स्वत:ला दोष देत बसतो. पण चूक झाली असेल तर ती स्विकारा, त्यातून नवीन काही तरी शिका. 

3. एकमेकांसोबत आपली तुलना करणं थांबवा. अनेकदा सोशल मीडियाच्या जाळ्यात आपण अडकून पडतो. ज्यामुळे आपल्याला सगळंच खरं वाटतं. प्रत्येकाची वेगळी अशी ओळख आहे. आपण कायम आपल्या मार्गाने जायला हवे. 

4. इतरांना नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खूश ठेवण्याच्या नादात आपण स्वत:ला हरवतो. त्यासाठी कायम स्वत:च्या मनाला प्राधान्य द्या. स्वत:च्या मनाचे ऐका. आपण मन मोकळेपणाने बोलायला हवे. भावना दाबून ठेवल्या की त्याचं ओझं बनत. कुणाशी तरी बोला, लिहा किंवा स्वत:शी संवाद साधा. 

5. जे मिळालं नाही त्यावर रडण्याऐवजी आपण जे आहे त्याची जाणीव ठेवूया. या सवयीमुळे मनाला स्थैर्य मिळतं. स्वत:वर कायम विश्वास ठेवा. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा कामाबद्दल कायम कृतज्ञता दाखवा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : New Year 2026: 5 changes for mental clarity, shed past regrets.

Web Summary : Embrace the new year by letting go of the past. Prioritize self-care, avoid comparisons, and learn to say no. Practice gratitude and address tasks promptly for a clearer mind and a more fulfilling life.
टॅग्स :मानसिक आरोग्यनववर्ष 2026