Lokmat Sakhi >Mental Health > मृणाल ठाकूर-करिना कपूरने इतरांना रंगरुपावरुन ठेवली नावं, मारले टोमणे! सुंदर कोण, हे ठरवतं कोण?

मृणाल ठाकूर-करिना कपूरने इतरांना रंगरुपावरुन ठेवली नावं, मारले टोमणे! सुंदर कोण, हे ठरवतं कोण?

-अंजली गोस्वामी डिजिटल स्पेसमध्ये आता काहीच पुसलं जात नाही.फार पूर्वी केव्हा तरी कुठं काही बोललं असेल, व्हिडीओ किंवा फोटो ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 14:44 IST2025-08-20T14:40:27+5:302025-08-20T14:44:50+5:30

-अंजली गोस्वामी डिजिटल स्पेसमध्ये आता काहीच पुसलं जात नाही.फार पूर्वी केव्हा तरी कुठं काही बोललं असेल, व्हिडीओ किंवा फोटो ...

Mrunal Thakur & Kareena Kapoor Passed Comments on Bipasha basu Looks and Appearance Who Decides Beauty their impact on mental health | मृणाल ठाकूर-करिना कपूरने इतरांना रंगरुपावरुन ठेवली नावं, मारले टोमणे! सुंदर कोण, हे ठरवतं कोण?

मृणाल ठाकूर-करिना कपूरने इतरांना रंगरुपावरुन ठेवली नावं, मारले टोमणे! सुंदर कोण, हे ठरवतं कोण?

Highlights‘कुमकुम भाग्य’ मालिकेत अर्जित तनेजा आणि मृणालची जोडी हिट होती. त्याकाळी एका मुलाखतीत अर्जितने म्हटले होते की, त्याला सावळ्या मुलीशी लग्न करायला आवडेल. त्यावर मृणाल म्हणाली, मग बिपाशाशीच लग्न कर!

-अंजली गोस्वामी

डिजिटल स्पेसमध्ये आता काहीच पुसलं जात नाही.फार पूर्वी केव्हा तरी कुठं काही बोललं असेल, व्हिडीओ किंवा फोटो असतील तर ते अचानक बाहेर येतात आणि त्यावरूनही लोक ट्रोल करतात.(Boday Shaming In Bollywood) खरं-खोटं करतात. स्क्रिन शॉट काढून दाखवतात. मृणाल ठाकूरच्या संदर्भात असंच झालं.(Mental Health And Beauty Standards)
‘सीता-रामन’ या चित्रपटानंतर दिलेल्या अनेक मुलाखतींमध्येही मृणालने सांगितलं होतं की, सगळ्याच महिला सुंदर असतात. आत्मविश्वासानं वावरलं पाहिजे.(Mrunal Thakur & Kareena Kapoor Passed Comments on Looks) तिचे अनेकांनी कौतुकही केले. मात्र, एकदमच तिचा जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत अर्जित तनेजा आणि मृणालची जोडी हिट होती. त्याकाळी एका मुलाखतीत अर्जितने म्हटले होते की, त्याला सावळ्या मुलीशी लग्न करायला आवडेल. त्यावर मृणाल म्हणाली, मग बिपाशाशीच लग्न कर!"

बावरा मन...! मनात सतत विचारांचे काहूर, बेचैन वाटतंय ? मनाला शांत करण्यासाठी ३ सोपे उपाय'


रंग आणि व्यायामावरून केलेली ती टिपणी आता व्हायरल झाली आणि मृणालने माफी मागत सांगितलं की, वयाच्या १९ व्या वर्षी मी काहीबाही बोलून गेले. तेव्हा समज कमी होती. आता मला मान्यच आहे की सर्व रंगरूपाच्या महिला सुंदरच असतात. मी दिलगिरी व्यक्त करते. आता तिने माफी मागितल्याने या विषयावर पडदा पडला.
करिना कपूरचाही असाच एक जुना टिपण्या करणाऱ्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.


मुद्दा हाच की, सौंदर्याच्या गोऱ्या-घाऱ्या-कमनीय बांधा-सरळ नाक हेच निकष अनेकांच्या मनात ठाम असतात. त्याविषयीची संवेदनशीलता तरी नसते किंवा समज तरी, त्यामुळे काळ्यासावळ्या मुलींना रंगावरून टोमणे खावे लागणे आपल्या समाजात काही नवीन नाही. सतत अपमान, लग्नच न होण्याची भीती, काम न मिळणे, गोऱ्या मुलींपुढे डावलणे जाणे हे अनुभव अनेकींचे असतात.
मृणालसारखे फार कमी असतात जे आपलं चुकलं असं मान्य करून आपली समज बदलली हेही जाहीर स्वीकारतात. हा बदलही कौतुकास्पद आहे. पण अनेकींना रंगावरून मारले जाणारे टोमणे आणि दुय्यम वागणूक हे आपल्या समाजाचे वास्तवच आहे.

 

Web Title: Mrunal Thakur & Kareena Kapoor Passed Comments on Bipasha basu Looks and Appearance Who Decides Beauty their impact on mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.