Lokmat Sakhi >Mental Health > सावर रे मना... रोज तेच तेच काम करुन थकल्यासारखे वाटते, वैताग आलाय? ७ उपाय- मेंदूला येईल तरतरी

सावर रे मना... रोज तेच तेच काम करुन थकल्यासारखे वाटते, वैताग आलाय? ७ उपाय- मेंदूला येईल तरतरी

daily routine fatigue solutions: simple ways to energize your brain: आपल्या मेंदूला रिचार्ज करण्यासाठी काय करायला हवं पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 17:55 IST2025-06-26T17:53:09+5:302025-06-26T17:55:33+5:30

daily routine fatigue solutions: simple ways to energize your brain: आपल्या मेंदूला रिचार्ज करण्यासाठी काय करायला हवं पाहूया.

mental health issue tired of daily routine tips how to feel motivated every day mental boost tips at work | सावर रे मना... रोज तेच तेच काम करुन थकल्यासारखे वाटते, वैताग आलाय? ७ उपाय- मेंदूला येईल तरतरी

सावर रे मना... रोज तेच तेच काम करुन थकल्यासारखे वाटते, वैताग आलाय? ७ उपाय- मेंदूला येईल तरतरी

सकाळचा गजर वाजला की, आपल्याला असं वाटतं आपण झोपेतून उठलो आहोत आणि     सगळी काम भराभर झालीत.(Mental Health Tips) पण अनेकदा हे सगळं फक्त डोळे बंद असताना घडत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली काम काही संपत नाही.(tired of daily routine tips) घरातील कामं, स्वयंपाक, ऑफिस... पुन्हा घरी आल्यानंतर जेवण, आवराआवरी आणि झोपणे. रोज उठून तेच रुटीन आपलं सुरु असतं. वीकेंडच्या दिवसाची वाट पाहावी तर या दिवशी देखील असंख्य कामाची यादी आपल्या पुढे तयारच असते.(simple ways to energize your brain) 
सतत वेगवेगळ्या प्रकारचे काम, घर-ऑफिसचा ताण, घरातील गडबड यामुळे शरीर जितके थकते तितकाच आपला मेंदू देखील थकतो.(mental boost tips at work) अशावेळी आपल्याला काहीच करावेसे वाटत नाही. शरीर, मन, मेंदू यावर इतका परिणाम होतो की जीव नकोसा झाल्यासारखा वाटतो.(Psychological well-being) असं वाटतं लांब कुठेतरी शांत ठिकाणी जावं. जिथे फोन, घरातील काम, ऑफिसचा ताण नसेल. पण सुट्ट्या आणि इतर गोष्टी मॅनेज होत नसल्याने हे देखील राहून जाते. अशावेळी दिवस नुसते चिडचिड आणि कुढत काढावे लागतात. आपल्या मेंदूला रिचार्ज करण्यासाठी काय करायला हवं पाहूया. (Mental disorders)

भागे रे मन...! डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ७ सोपे उपाय, ओव्हिरथिंकिंग थांबेल, मन होईल शांत

1. सगळ्यात आधी आपल्याला स्वत:च्या भावना समजून घ्यायला हव्या. आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतोय हे आवश्यक आहे. त्यानुसार आपण त्यावर काम करु शकतो. 

2. आपल्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जा. अनेकदा आपल्या काही गोष्टींमुळे अस्वस्थ वाटत असते अशावेळी आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो परंतु, त्याचा आपल्या मनावर खोल परिणाम होतो. 

3. मेंदूला रिचार्ज करण्यासाठी आपल्याला आत्मचिंतन करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला असं का वाटते हे समजून घ्या. त्यातून  स्वत:ला नवीन काही शिकता येतंय का हे देखील पहा. 

4. आपल्या स्वत:च्या चुका स्विकारा, त्यात स्वत:ला क्षमा करायला विसरु नका. स्वत:ला दोष देणे टाळा. 

भीती वाटते, आपलं कसं होणार भविष्यात? निर्णयच घेता येत नाही? वाचा मन शांत करणारे ४ उपाय

5. आपण जितके शरीराने स्ट्राँग असतो तितकेच मनाने देखील स्ट्राँग व्हायला हवे. यासाठी आपल्याला व्यक्त होता यायला हवे. भावना दाबून ठेवल्याने आपली घुसमट होते. त्यासाठी संवाद साधा, आपल्या आवडत्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला हवे. 

6. आपल्या कामांसाठी आपण वेळ सेट करायला हवी. ठरलेल्या वेळेत काम करा. ठराविक वेळेत काम केल्याने आपला मेंदू थकणार नाही. 

7. त: मध्ये परिवर्तन आणण्याचे प्रयत्न करा. सतत काम करुन मेंदू थकतो, अशावेळी एखादी सुट्टी घ्या. आपण घर आणि कामाचे ओझे उचलण्याऐवजी घरातील कामे मुलांना किंवा इतर घरातील मंडळींना वाटून द्या. यामुळे आपल्याला थोडा आराम मिळेल. 

 

Web Title: mental health issue tired of daily routine tips how to feel motivated every day mental boost tips at work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.