आई गं.. आज काम करायचा कंटाळा आला आहे आणि कामाला जाण्याचा सुद्धा. असं आपल्या महिन्यातून एकदा तरी होतं. (stress relief tips) सकाळचा गजर वाजत राहतो आणि आपण उठलो आहोत, सगळी काम भराभर झालीत असं आपल्याला वाटतं. पण अनेकदा हे सगळं डोळे बंद असताना घडते. बरेचदा तर आपल्याला काम करण्याची इच्छा नसते. त्यामुळे सगळंच यंत्रवत वाटू लागते. (daily stress management) रोज तेच काम करुन वैताग येतो, थकल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली तारेवरची कसरत सुरुच असते. घरातील आणि बाहेरची कामं काही केल्या संपत नाही. रोज उठून तेच रुटीन पुन्हा सुरु असतं. सुट्टीच्या दिवशी काय करायला हवं. याची लिस्ट तर डोळ्यांसमोर अगदी नाचत असते. ज्यामुळे आपल्याला आराम मिळत नाही. (reduce work stress naturally)
स्वत:साठी वेळ नाही मिळाला की, आपल्याला थकल्यासारखं वाटतं. हळूहळू थकवा शरीरात नाही तर मनात घर करतो. काही कारण नसताना चिडचिड होते, लहानसहान गोष्टींवर राग येतो. (mental peace tips) कधी कधी असं वाटतं बस्स झालं आता काहीच नको. अशा वेळी आपलं शरीर नाही तर मेंदू आणि मन थकलेलं असते. सतत विचार, काळजी आणि दडपण यामुळे आपल्या मेंदूवर ताण येतो. ज्यामुळे आपलं लक्ष, एकाग्रता, झोप सगळं काही बिघडतं.
ऑफिसचा प्रेशर, घरातलं काम, जबाबदाऱ्या, नात्यांमधील गुंतागुंत याचा परिणाम मनावर मोठ्या प्रमाणात आघात करतो. माझं कसं होणारं? सगळं व्यवस्थित होईल ना?, घर आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडताना गल्लत तर होणार नाही ना असा प्रश्न कायम सतावत राहतो. या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो. खूप जास्त प्रमाणात ताण घेतल्यावर केसगळती, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, झोप न लागणं किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवर उदास वाटतं. पण मग अशावेळी करायचं काय? काही सोपे उपाय पाहू, त्यानं आपलं मन शांत होईल.
आपल्याला काय करायला हवं?
1. सतत काम, विचार आणि जबाबदाऱ्या मेंदूला थकवतात. म्हणून दिवसातून किमान १० ते १५ मिनिटे स्वत:साठी काढा. आपला स्क्रीन टाइम करा. फक्त शांत बसा, मनाला प्रसन्न करणारी गाणी ऐका. यामुळे मेंदूला विश्रांती मिळेल.
2. स्ट्रेस आला की, आपल्या खूप लो वाटतं. हात- पाय थरथरतात, श्वास घेण्यास अडचणी येतात. अशावेळी जोरजोरात श्वास घ्या. दिवसातून दोन वेळा आपण दीप ब्रीदिंग केल्यास आराम मिळेल.
3. घरातील वातावरणामुळे मनावर दडपण येत. अशावेळी बाहेर फिरायला जा, म्हणजे आपल्याला फ्रेश वाटेल. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याने आपला मानसिक ताण कमी होईल.
4. आपण दिवसभरात सगळ्यांशी बोलतो, पण अनेकदा स्वत:शी बोलणे टाळतो. त्यासाठी दररोज काही मिनिटे स्वत:शी बोला. मी ठीक आहे आणि मी हे सगळं व्यवस्थित करु शकतो. यामुळे मनाला शांती मिळेल.