lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > आपलं इमोशनल आरोग्य ठणठणीत आहे की आपण 'इमोशनल आजारी' आहोत हे कसं ओळखाल?

आपलं इमोशनल आरोग्य ठणठणीत आहे की आपण 'इमोशनल आजारी' आहोत हे कसं ओळखाल?

इमोशनल हेल्थ हा आता कोरोनाकाळात फार गंभीर विषय आहे, त्याविषयी बोला, स्वत:ला वेळ द्या आणि प्रयत्नही करा, इमोशनल आरोग्य उत्तम ठेवण्याचा, त्यासाठी हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:29 PM2021-06-04T16:29:25+5:302021-06-04T16:36:57+5:30

इमोशनल हेल्थ हा आता कोरोनाकाळात फार गंभीर विषय आहे, त्याविषयी बोला, स्वत:ला वेळ द्या आणि प्रयत्नही करा, इमोशनल आरोग्य उत्तम ठेवण्याचा, त्यासाठी हे उपाय.

know about emotional health, try to be positive and know your emotions | आपलं इमोशनल आरोग्य ठणठणीत आहे की आपण 'इमोशनल आजारी' आहोत हे कसं ओळखाल?

आपलं इमोशनल आरोग्य ठणठणीत आहे की आपण 'इमोशनल आजारी' आहोत हे कसं ओळखाल?

Highlightsजश्या नाण्याला दोन बाजू असतात, कडक उन्हाळ्यानंतर गार पाऊस कोसळतो , तसेच दुःखानंतर सुखाची आनंदाची सर येणार!

पूनम घाडिगावकर

आनंद, प्रेम, दुःख, राग, चिंता, भीती या भावना आपण रोज अनुभवत असतो. आपण म्हणजे फक्त आपण माणसं नव्हे, सर्व सजीव. पण गंमत बघा, आनंद ही भावना  आपल्याला सहज पेलता येते,  मज्जा वाटते, खुश होतो आपण.  तसेच  भीती, काळजी, त्रास या भावना हाताळणं खूपच कठीण होऊन जातं. त्रास होतो त्याचा आपल्याला आणि कळत नकळत आपल्यामुळे इतरांना. म्हणून आपण हेल्दी भावना ठेवायला हवी ज्याचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनात होत जातो आणि अशी भावना आपल्याशी, समाजाशी तसेच एखाद्या घटनेशी सामोरे जायला किंवा हाताळायला मदत करते.
सध्याची कोरोना महामारी आपल्या सगळ्यांना वेदना देणारी आहे. अनेक दिवस तेच तेच रटाळ आयुष्य, स्वछंद वावर नाही, ना मित्र मैत्रिणींची भेट, मिठी मारता येत नाही, मुलांना मैदानी खेळ नाही, शाळा आणि हवीहवीशी वाटणारी मज्जा काहीच नाही . सगळा अर्थव्यवहार ढासळला, सगळ्या नियोजनाचा विचका झाला. आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून कायमची दूर जाताना अनेकांनी पहिली. हृदय पिळवटून टाकणारे क्षण अनेकांनी अनुभवले आहेत. आपल्याच वाट्याला असे दुःख का हा आक्रोश झालेला आपण ऐकतो, बघतो , अनुभवतो. फारच मानसिक, भावनिक हतबल करणारी आताची परिस्थिती आहे. पण यातून बाहेर पाडावेच लागणार..हो अट्टहासाचा “च” आहे हा. आणि तोच
आपल्याला जगण्याची उम्मेद देतो. आपण नेहमी आणि आता सतत ऐकत आहोत सकारात्मक राहा.
विचार करा. हे करणे सहज नाही होऊ शकत. सकारात्मक राहा कसे शक्य आहे?


  ... इतक्या वेदना देणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला होत असताना मन कसे प्रसन्न राहील?


मग मी काय करायला हवे? तर मला माझे भावनिक आरोग्य सक्षम करायला हवे. भावनिक आरोग्य म्हणजे तुमच्या मनाची सकारात्मक स्थिती म्हणजेच नेहमी आनंदी राहणं, प्रेम दर्शवणे, दयाळू भावना व्यक्त करणे, नेहमी समाधानी असणे, सकारात्मक विचार करणे, आत्मविश्वास असणे, तसेच तुम्ही एखाद्या घटनेला कसे सकारात्मक सामोरे जाता. आपल्या इतर दैनंदिन गरजांबरोबरच भावनिक आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. भावनिक आरोग्य हा संपूर्ण आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. जे लोक भावनिकदृष्ट्या निरोगी वा सुदृढ असतात ते त्यांच्या विचारांच्या भावना
आणि वागणुकीवर नियंत्रण ठेऊ शकता ते जीवनातल्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतात आणि अडचणींवर सहज मात करू शकतात. आपल्याला आलेल्या दुखी भावनांना स्वीकारा, मान्य करा हे घडले आहे, दुःख अश्रूतून वाहू द्या,
भावना लपवू नका, दाबून टाकू नका, मनाची कोंडी करू नका, तर व्यक्त करा. पण त्याचबरोबर
जसे सुकलेल्या बीजाला जसा पाणी आणि माती मिळाल्यावर अंकुर फुटतो तसाच तुमच्या मनातून हळूहळू का होईना परिस्थिती स्वीकारण्याचा, नव्या उम्मेदीने जगण्याचा अंकुर फुटू द्या. स्वतःशी बोला ही परिस्थिती फक्त मी नाही तर पूर्ण जग अनुभवत आहे, त्यातील मी एक! मी परिस्थिती बदलू शकत नाही आणि गेलेले क्षण, जवळची प्रेमळ व्यक्ती परत भेटू शकत नाही.

पण मी हे नक्कीच करू शकते…..


१. जी परिस्थिती आहे त्याचा पूर्णपणे स्वीकार.
२. आलेल्या परिस्थितीशी लढा, त्यासाठी लागणाऱ्या क्षमतांवर काम
३. मनाला आनंद देणाऱ्या सहज शक्य साध्य होणाऱ्या गोष्टी
४. स्वतःशी सकारात्मक बोलणं, तसा आवर्जून प्रयत्न करणार .
५. नुसताच अडचणींचा विचार न करता त्यावर मात करण्यासाठी त्या दृष्टीने पावले उचलणार
६. स्वतःला छंद लावून घेणार
७. सुंदर गाण्याचा आस्वाद घेणार,
८. आपल्याला प्रेरणा आणि उत्तेजना देणाऱ्या व्यक्तीना भेटणार किंवा व्हीडीओ कॉल
९. स्वतःला ॲक्टिव ठेवणार
१०. सोशल मीडियाचा योग्य उपयोग करणार .
११. ज्या भावना त्रास दायक आहेत त्या भावनांना वेळ देणार आणि मग त्या कटू आठवणींना टाटा –
बाय बाय करून आनंददायी भावनांचा विचार करणार
१२. मनाला आणि शरीराला शांत ठेवणारे मेडिटेशन करणार
आपोआपच आपली भावना सकारात्मक होणार म्हणजे आपण आपले भावनिक आरोग्य सुदृढ ठेवणार.
जश्या नाण्याला दोन बाजू असतात, कडक उन्हाळ्यानंतर गार पाऊस कोसळतो , तसेच दुःखानंतर सुखाची
आनंदाची सर येणार!
माझा पूर्ण विश्वास आहे सगळं चांगलं होणार!

(लेखिका काऊन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहेत.)
दिशा काऊन्सिलिंग सेंटर
http://www.dishaforu.com

Web Title: know about emotional health, try to be positive and know your emotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.