Join us  

नव्या वर्षात कोणत्याच गोष्टीचा स्ट्रेस येणार नाही, १ जालीम उपाय- स्ट्रेस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 5:02 PM

जेफ बेझोस सांगतात, स्ट्रेस नक्की कशाने येतो आणि काय केलं तर तो झटक्यात कमी होतो.

ठळक मुद्देथेट परिस्थितीला भिडण्याची हिंमत आपण कमावणार का?

सरत्या वर्षात सर्वाधिक तुम्हाला कोणत्या गोष्टीनं छळलं? असा प्रश्न कुणी विचारलाच तर काय उत्तर द्याल? काहींकडे एखादी गोष्ट असेल काहीजणांकडे बऱ्याच असतील पण बहूसंख्य लोक एक कॉमन उत्तर देतील ते म्हणजे स्ट्रेस. लहान मुलांपासून आजीआजोबांपर्यंत सगळ्यांना एक गोष्ट छळते स्ट्रेस. लहान गोष्टींचा स्ट्रेस येतो, नोकरी करणाऱ्यांना तर स्ट्रेसने पोखरुन काढलं आहे इतकं तो स्ट्रेस आयुष्य पोखरतो. नात्यात स्ट्रेस, कामाचा, पैशाचा, जबाबदारीचा आणि जगण्याचाही स्ट्रेस येतो? प्रश्न एवढाच की त्या स्ट्रेसचं करायचं काय? या प्रश्नाचं उत्तर देणारा जेफ बेझोस यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

जेफ बेझोस म्हणजे अमेझॉनचे संस्थापक संचालक. तर त्यांनी स्ट्रेस कमी करण्याचं जे सुंदर उत्तर दिलं आहे, ते वापरुन पाहिलं तर २०२४ स्ट्रेस फ्री होण्याची शक्यता आहे.

(Image :google)

बेझोस म्हणतात, स्ट्रेस कशाचा येतो हे मला कळतं. आणि आपल्याला स्ट्रेस येतो आहे अमूक गोष्टीमुळे येतो हे लक्षात येणं हीच माझ्यासाठी वॉर्निंग आहे. याचा अर्थ असा की आपल्याला स्ट्रेस आला आहे, तो कशाने आला आहे याचा नेमका अर्थ लागत नाही. एकदा का तो अर्थ लागला की आपलं सबकॉन्शस माईण्ड आपल्या मागे लागतं की तुला कळतंय ना कसला त्रास होतो आहे मग त्यावर तू काही कृती का करत नाहीस? आता आपण एकतर ती कृती करत नाही किंवा नेमकी काय कृती करायची हे आपल्याला कळत नाही. आणि खरा स्ट्रेस त्याचा येतो की मला कळतंय की मला काय बोचतंय, काय खुपतंय तरी मी काही करत नाही. मग आता यावर उपाय काय तर थेट कृती. स्ट्रेस कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे कृती करणं. एखादा फोन, एखादा मेसेज करणं किंवा जे काही त्या परिस्थितीत आपल्याला करणं शक्य आहे ते करणं. थेट भिडायचंच प्रश्नाला. 

(Image :google) 

आता पुढचा प्रश्न. असं केल्यानं तो प्रश्न सुटेल का? सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात का? तर नाही.काही गोष्टी, काही प्रश्न आपण प्रयत्न करुनही सुटत नाही. पण मग तरी आपला स्ट्रेस कमी होतो कारण आपण स्वत:ला असं सांगतो की जे माझ्या हातात होतं ते केलं. गोष्टी मी माझ्या हातात घेतल्या, कृती केली. त्यातून मी जबाबदारी घेतली. त्यामुळे झटक्यात स्ट्रेस कमी होतो. पण आपण कृती करत नाही, आपल्याला कृती केल्यानंतरच्या परिणामांची कालजी वाटते आणि जे डाचतं, जे छळतं ते आपण इग्नोर करतो आणि दुर्लक्ष केल्यानं ते आपल्याला जास्त छळतं आणि त्यानं आपला स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस कमी करायचा तर आपण कृती करुन आहे त्या परिस्थितीला भिडायलाच पाहिजे!’

बेझोस म्हणतात, तसं थेट परिस्थितीला भिडण्याची हिंमत आपण कमावणार का? किंवा मग रडत बसणार मला फार स्ट्रेस आहे असं म्हणत..चॉइस शेवटी आपलाच!

टॅग्स :नववर्षमानसिक आरोग्यआरोग्य