lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > Mindfulness - मन थाऱ्यावर नाही, प्रचंड स्ट्रेस आहे, त्यावर आहे काही उत्तर?

Mindfulness - मन थाऱ्यावर नाही, प्रचंड स्ट्रेस आहे, त्यावर आहे काही उत्तर?

माइंडफूलनेस म्हणजे वर्तमानात जगण्याची मूलभूत मानवी क्षमता. आपण कोण आहोत, काय करत आहोत याची स्पष्ट जाणीव आणि आपल्या भोवतीच्या कोणत्याही गोष्टीवर टोकाची किंवा भावनिक प्रतिक्रिया देत नाही ना याविषयीचं असलेलं भान म्हणजेच माइंडफूलनेस होय. तो कृतीत आणणं शक्य आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 07:46 PM2021-05-12T19:46:18+5:302021-05-13T12:07:30+5:30

माइंडफूलनेस म्हणजे वर्तमानात जगण्याची मूलभूत मानवी क्षमता. आपण कोण आहोत, काय करत आहोत याची स्पष्ट जाणीव आणि आपल्या भोवतीच्या कोणत्याही गोष्टीवर टोकाची किंवा भावनिक प्रतिक्रिया देत नाही ना याविषयीचं असलेलं भान म्हणजेच माइंडफूलनेस होय. तो कृतीत आणणं शक्य आहे.

If you want to fight the current situation with strength, be mindful! What does it take to put mindfulness into action? | Mindfulness - मन थाऱ्यावर नाही, प्रचंड स्ट्रेस आहे, त्यावर आहे काही उत्तर?

Mindfulness - मन थाऱ्यावर नाही, प्रचंड स्ट्रेस आहे, त्यावर आहे काही उत्तर?

Highlightsमाइंडफूलनेस म्हणजे वर्तमानात जगण्याची मूलभूत मानवी क्षमता. आपण कोण आहोत, काय करत आहोत याची स्पष्ट जाणीव .आपल्याला बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव, माहिती , भान असतं. पण आपल्या आत, मनात काय घडतंय याबद्दल मात्र आपण बहुतेकदा अनभिज्ञ असतो.या माइंडफूलनेसला आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनवायला हवं.ते शक्य आहे.

-अनुराधा प्रभूदेसाई

सध्याची स्थिती आता आपल्यावर नकारात्मक परिणाम करु लागली आहे. आपण वेगवेगळ्या भावनांशी सध्या रोज लढत आहोत. राग, दु:ख, शोक, भीती यांच्याशी सतत सामना करावा लागत आहे. आपण या भावनांना कसं तोंड देणार? आपलं मन हे अस्वस्थ आणि अति क्रियाशील झालेलं आहे. आणि म्हणूनच माइंडफूलनेस अर्थात सजगता या प्रगल्भ संकल्पनेविषयी बोलणं , ती समजून घेणं हे आजच्या स्थितीत खूपच गरजेचं झालेलं आहे. माइंडफूलनेस हा सध्याच्या काळात तसा चर्चेतला शब्द आहे. पण होतं काय की केवळ त्याबद्दल चर्चा होतात. तो समजून घेणं, प्रत्यक्ष कृतीत आणणं हे घडत नाहीये.

माइंडफूलनेस ( सजगता) म्हणजे नक्की काय?  


माइंडफूलनेस म्हणजे वर्तमानात जगण्याची मूलभूत मानवी क्षमता. आपण कोण आहोत, काय करत आहोत याची स्पष्ट जाणीव आणि आपल्या भोवतीच्या कोणत्याही गोष्टीवर टोकाची किंवा भावनिक प्रतिक्रिया देत नाही ना याविषयीचं असलेलं भान म्हणजेच माइंडफूलनेस होय.
आपल्याला बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव, माहिती , भान असतं. पण आपल्या आत, मनात काय घडतंय याबद्दल मात्र आपण बहुतेकदा अनभिज्ञ असतो. अगदी एखाद्या बाबतीत आपण प्रतिक्रिया देऊनही टाकतो तोपर्यंत आपल्याला आपल्या मनात काय घडतंय याची जाणीव नसते. आणि प्रतिक्रिया देऊन झाल्यानंतर वाटतं की अरे आपण एवढी टोकाची प्रतिक्रिया का बरं दिली?
याचं कारण एकच की आपल्याला अशी प्रतिक्रिया देण्यासाठी नेमकं काय कारणीभूत ठरलं याबद्दल आपण जागरुकच नसतो.
आपल्या मानसिक स्थितीबद्दल जागरुक असणं , आपण कोण आहोत, आपल्याला काय छळतंय, आपल्यावर काय परिणाम करतं हे समजून घेणं म्हणजेच माइंडफूलनेस होय.
कबाट झिन म्हणतात की माइंडफूलनेस ही वर्तमानातील क्षणांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर निर्माण होणारी सजगता आहे. ही सजगता काय चूक आणि काय बरोबर असा निवाडा करत बसत नाही . यात भर घालताना मी म्हणते की माइंडफूलनेस ही स्वत:ला समजून घेण्याची कृती आणि शहाणपणही आहे.

माइंडफुलनेसला कृतीत उतरवण्यासाठी ...

या माइंडफूलनेसला आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनवायला हवं.ते बनवता येतं. ते कसं हे फक्त शिकावं लागतं.
  माइंडफूलनेसची सूरुवात करताना वर्तमान क्षणांचं निरिक्षण करायला हवं. हे निरिक्षण करताना आपण शूध्द निरिक्षणकर्ते असायला हवं. काय चूक आणि बरोबर याचा न्यायनिवाडा करण्याच्या कृतीपासून स्वत:ला दूर ठेवायला हवं. हे करणं अवघड आहे. पण आपल्या मेंदूला याचं प्रशिक्षण दिलं तर हे जमू शकतं.

- माइंडफूल निरीक्षण - पानं, फुलं यांचं निरिक्षण करण्यासारख्या छोठ्या छोट्या गोष्टी कराव्यात. निरिक्षण करताना फक्त पान/ फूल कसं दिसतंय, त्याचा पोत कसा आहे एवढं बघावं. आपलं लक्ष कुठे आहे याचं भान ठेवावं. आणि न्यायनिवाड्याच्या कृतीपासून कटाक्षानं दूर राहावं.

- माइंडफूल खाणं- जेव्हा खात असाल तेव्हा फक्त त्या पदार्थासोबत आणि खाण्याच्या कृतीसोबत राहा. अनेकजण खाताना मोबाइल, टीव्ही बघत राहातात आणि त्यामुळे खाण्यातलं लक्ष उडून जातं.  पदार्थाची पोषकमूल्यं आणि ज्ञानेंद्रियांना तो कसा जाणवतो आहे, त्याचा रंग, पोत,चव, स्पर्श याकडे जेवण संपून जातं तरी लक्ष दिलं जात नाही.

-  आपल्या विचारांबद्दल सजगता - आपल्या मनातील विचारांसोबत राहा. आपण जो विचार करत आहोत ते विचार आपल्याला सक्षम करत आहे की दुबळे बनवत आहे ? याबद्दल स्वत:लाच विचारा. आणि जर आपल्या मनातील विचार आपल्याला दुबळे बनवत असतील तर ते आपण सोडून देऊ शकतोय का? हे बघा.

- माइंडफूल ऐकणं- सजगतेनं ऐकणं, रुची घेऊन ऐकणं ही गोष्ट माइंडफूलनेस वाढवते. ऐकताना बोलणाऱ्याला मध्येच तोडणं, मधेच आपण बोलणं यापासून स्वस्त:ला रोखा. यामूळे केवळ मांडफूलनेसच वाढतो असं नाही तर जो बोलतो आहे त्याच्यासोबतच नातंही सुधारतं. ते वेगळ्या स्तरावर पोहोचतं.

माइंडफूलनेसचे फायदे काय?
- स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.
- भावनिक प्रतिक्रिया देणं टाळलं जातं.
-शांतता आणि स्वनियंत्रणाचा अनुभव घेता येतो.
- ताण निवळतो आणि आरोग्यास फायदा होतो.
माइंडफूलनेस ही खूप जुनी वर्षानूवर्षापूर्वीची कृती आहे. या माइंडफूलनेसचे फायदे बघता त्यात आपण आताच्या काळात गूंतवणूक करणं आणि स्वत:त बदल घडवणं ही अत्यावश्यक बाब झाली आहे.

( लेखिका मानसशास्त्रज्ञ, कौन्सिलर आणि दिशा कौन्सिलिंग सेण्टरच्या संचालक आहेत.)
www.dishaforu.com
dishacounselingcenter@gmail.com

 

Web Title: If you want to fight the current situation with strength, be mindful! What does it take to put mindfulness into action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.