Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंथरुणावर पडताच डोक्यात निगेटिव्ह विचारांचं काहूर - झोपेचं होतं खोबरं? ४ सोप्या गोष्टी करा - मन शांत होईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2026 15:00 IST

ways to stop negative thoughts at night : how to stop ruminating thoughts at night : how to stop ruminating thoughts and fall asleep fast : डोक्यात सतत निगेटिव्ह विचार रात्री झोपतानाच का येतात ? आणि ते थांबवण्यासाठी खास ५ उपाय...

दिवसभर आपण आपल्या कामात, घर-कुटुंबात आणि इतर व्यापांमध्ये इतके व्यस्त असतो की स्वतःबद्दल विचार करायलाही वेळ मिळत नाही. अशा स्थितीत, जेव्हा आपण रात्री थकून-भागून झोपण्यासाठी बेडवर जातो, तेव्हा शारीरिकरीत्या आपण कोणतेही काम करत नसतो, पण आपले मन मात्र ॲक्टिव्ह असते. यावेळी मेंदू केवळ दिवसभराच्या कामांचाच विचार करत नाही, तर भूतकाळ आणि भविष्याबद्दलही भरकटू लागते. जर तुमच्या आयुष्यात सध्या (stop overthinking before bed) काही गोष्टी नीट घडत नसतील, तर मन जुन्या चुका, भविष्याची चिंता आणि नात्यांमधील दुरावा यांसारख्या गोष्टींचा जास्त विचार करू लागते. हळूहळू हे विचार इतके नकारात्मक होतात की, त्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होतो(how to stop ruminating thoughts at night)

झोपण्याच्या वेळी डोक्यात सतत अशा नकारात्मक गोष्टी सुरू राहिल्यामुळे केवळ झोपेचेच खोबरं होत नाही, तर ते तुमच्या आरोग्यासाठीही अत्यंत हानिकारक ठरू शकते. रात्री झोपताना येणारे नकारात्मक विचार हे एखाद्या विषाप्रमाणे हळूहळू  आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात. पुणे येथील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. मुकेश पटेल यांनी सांगितलेले काही सोपे उपाय तुमचे (ways to stop negative thoughts at night) आयुष्य बदलू शकतात. रात्रीच्या वेळी झोपताना जर डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर नेमकं (how to stop ruminating thoughts and fall asleep fast) काय करावं यासाठी खास उपाय पाहूयात. 

डोक्यात सतत निगेटिव्ह विचार रात्री झोपतानाच का येतात ? 

डॉ. मुकेश पटेल यांच्या मते, दिवसा आपण काम, लोक आणि इतर विविध उपक्रमांमध्ये व्यस्त असतो. यामुळे आपल्याला स्वतःबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करायला वेळ मिळत नाही. मात्र, रात्रीच्या वेळी जेव्हा चोहोबाजूंनी शांतता असते, तेव्हा आपल्या मनात दाबलेले विचार आपोआप बाहेर येऊ लागतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे आपण अनेकदा त्रस्त असतो, पण रात्रीच्या वेळी हे विचार अधिक वाढतात, कारण त्यावेळी आपण स्वतःला पूर्ण वेळ देतो. यामध्ये आपण केवळ दिवसभराच्या घडामोडींचाच विचार करत नाही, तर भूतकाळ आणि भविष्याबाबतही खूप जास्त विचार करू लागतो.

काहीजणांकडे कायम प्रचंड पैसा येतो, असं का? १० गोष्टी लक्षात ठेवा, घरी येईल पैसाच पैसा...

डोक्यांत सतत निगेटिव्ह विचार येतात ? रोज करा फक्त ५ गोष्टी - मन शांत ठेवण्याची मॅजिकल ट्रिक...

रात्री वारंवार येणारे नकारात्मक विचार कसे रोखावेत?

डॉ. मुकेश पटेल यांच्या मते, अनेकदा आपण आपल्या विचारांशी लढत असतो आणि आपल्याला वाटते की लगेच त्याबद्दल विचार करणे थांबवावे. मात्र, आपण जितका विचार थांबवण्याचा प्रयत्न करतो, तितक्याच वेगाने ते विचार मनात पुन्हा पुन्हा येत राहतात. त्यामुळे, रात्रीच्या वेळी डोक्यात येणारे वाईट आणि नकारात्मक विचार रोखण्यासाठी खास टिप्स पाहूयात. 

१. आपल्या विचारांशी लढू नका, त्यांचा स्वीकार करा :- स्वतःच्या विचारांशी लढण्याऐवजी त्यांना म्हणा, "मी विचार करू शकतो, ही माझी शक्ती आहे." जेव्हा आपण स्वतःच्या विचारांशी संघर्ष करणे थांबवतो, तेव्हा त्या विचारांची आपल्या मनावर असलेली पकड आपोआप सैल होऊ लागते. आपण ज्या विचारांचा स्वीकार करतो, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे जाते.

२. शरीराला आराम द्या :- आपले मन शांत करण्याचा सर्वात सोपा मार्ग हा शरीरातून जातो. त्यामुळे, झोपण्यापूर्वी काही मिनिटे प्राणायाम किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजचा सराव करा. श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा; आपले संपूर्ण लक्ष फक्त याच क्रियेवर केंद्रित करा. या दरम्यान आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधील संवेदना अनुभवा, तिथला ताण ओळखा आणि तो हळूहळू सोडून द्या. खरं तर, जेव्हा तुमचे शरीर शांत असते, तेव्हा मन देखील आपोआप नियंत्रणात येते. यानंतर विचारांना दाबण्याऐवजी, ते फक्त कसे येतात आणि जातात हे पाहत राहा.

३. आपल्या आवडीच्या गोष्टी करा :- जर आपण दिवसभरात फक्त जबाबदाऱ्या आणि खूप कामाचे प्रेशर, टेंन्शन हॅण्डल करत असू तर रात्री मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, दिवसातला काही वेळ स्वतःसाठी नक्की काढा. दिवसभरात लेखन, संगीत, पेंटिंग, बागकाम, वाचन किंवा इतर कोणतेही क्रिएटिव्ह काम करा, ज्यामुळे मन शांत होईल. असे केल्याने केवळ तुमचे लक्ष दुसरीकडे वळत नाही, तर तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासही मदत मिळते, ज्यामुळे रात्री जास्त नकारात्मक विचार येण्यापासून रोखले जाते.

४. लहान-लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा :- जर आपण फक्त बाह्य गोष्टींमध्ये अडकून राहिलो, तर मनाची आंतरिक शांती हरवते. तसेच, जर आपण सतत विचार करत राहिलो, तर आयुष्यातील खरे आनंद आपण मागे सोडून देतो. यासाठीच, आपल्या जीवनातील छोट्या-छोट्या आनंदाचे क्षण शोधण्याचा आणि ते मनापासून जगण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने रात्रीच्या वेळी मनात येणारे नकारात्मक विचार थांबवण्यास मदत मिळते आणि मनाला खरी शांती मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Stop negative thoughts at night: Simple tips for peaceful sleep.

Web Summary : Negative thoughts at bedtime disrupt sleep and harm health. Expert Dr. Mukesh Patel suggests accepting thoughts, relaxing the body with breathing exercises, pursuing hobbies, and finding joy in small things to calm the mind and prevent negative thoughts.
टॅग्स :मानसिक आरोग्य