सकाळचा अर्लाम वाजला की तिच्या डोक्यात विचारांच चक्र सुरु होतं. आज काय भाजी करायची?. एकीकडे गॅसवरची शिट्टी वाजते तर दुसरीकडे मोबाईलवर ऑफिसच्या मेलते नोटिफिकेशन वाजत असतात.(work life balance) काम करताना तिच्या डोक्यात ट्रेन-बसची वेळ याविषयी गणित सुरु असतं. वर्किंग वुमन म्हणून मिरवताना समाजाला ती सशक्त वाटतं असली तरी यामागे तिची होणारी तारेवरची कसरत फक्त तिलाच माहित असते. घर आवरताना ना तिला कधी सासूची मदत असते ना नवऱ्याची.(mental exhaustion) यात नवराही घरची कामं ही बायकांचीच याच मानसिकतेचा असेल तर त्या स्त्रीची अवस्था एखाद्या प्रेशर कुकरसारखी होते. ऑफिसची डेडलाईन आणि घरची जबाबदारी या कचाट्यात अडकलेले असताना तिचं स्वत:च अस्तित्व, तिचे छंद आणि तिची मन:शांती कुठेतरी हरवते.(daily stress relief) अनेकदा तिला असं वाटतं की आता मला वेडच लागेल की काय? असा विचार तिच्या मनात डोकावू लागतो. जर आपलीही अशीच कोंडी होत असेल, तर वेळीच सावध होण्याची आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
आजच्या काळात स्त्री शिकली, कमावती झाली, पण घराची 'सुपरवुमन' असण्याचा भार अजूनही तिच्याच खांद्यावर आहे. ऑफिसमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करून आल्यावरही घरात तिला 'आई', 'सून' किंवा 'बायको' म्हणून तिच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्या लागतात. अशा वेळी मानसिक थकवा (Mental Fatigue) येणं नैसर्गिक आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आता सहनशक्ती संपली आहे, तेव्हा काही छोटे बदल आपले आयुष्य बदलू शकतात.
अनेकदा आपल्याला घर आणि ऑफिस दोन्हीकडे परफेक्ट दिसायचं असतं. घर चकाचक हवं आणि ऑफिसचे कामही वेळेत पूर्ण व्हायला हवे असा आपला अट्टहास असतो. अशावेळी आपण स्वत:ला सवलत द्यायला हवी. घरकाम करताना आपल्याला बरेचदा घरातील मंडळींकडून मदत मिळत नाही. अशावेळी त्यांच्याशी स्पष्टपणे संवाद साधा. जबाबदाऱ्यांची वाटणी करा. आपल्या कामात इतरांनाही सहभागी करुन घ्या.
प्रत्येक वेळी सगळ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु नका. ऑफिसमध्ये जास्तीचे काम किंवा नातेवाईंकाकडे एखादा कार्यक्रम असेल तर आपल्याला थकवा जाणवतो. अशा ठिकाणी नाही म्हणायला शिका. दिवसभरातून १५ ते २० मिनिटे स्वत:साठी काढा. गाणी ऐकणे, पुस्तक वाचणे किंवा आपल्या आवडीचा छंद जोपासा. यामुळे आपले मन शांत होईल, आपल्याला जास्त रिलॅक्स वाटेल. जर आपण आर्थिकरित्या सक्षम असू तर एकट्याने काम करण्याची जिद्द सोडा. घरातील काही कामांसाठी मेड ठेवा. शारीरिक कष्ट कमी करा. यामुळे आपली ऊर्जा अधिक खर्च होणार नाही. इतर कामांचा ताण देखील आपल्याला येणार नाही.
आपलं आरोग्य आणि आपलं मानसिक समाधान हे जगातील कोणत्याही कामापेक्षा मोठं आहे. जर आपण आनंदी आणि निरोगी असू, तरच आपण घर आणि ऑफिस नीट सांभाळू शकतो. त्यामुळे स्वतःला विसरू नका. कधीकधी 'काहीच न करणं' हे देखील सर्वोत्तम औषध असतं.
Web Summary : Juggling home and office leaves women exhausted. Share responsibilities, say no to extra commitments, and dedicate time for yourself. Prioritize well-being, seek help, and remember, self-care is essential for a balanced life.
Web Summary : घर और ऑफिस को एक साथ संभालने से महिलाएं थक जाती हैं। जिम्मेदारियाँ साझा करें, अतिरिक्त प्रतिबद्धताओं को ना कहें और अपने लिए समय निकालें। अपने स्वास्थ्य को प्राथमिकता दें, मदद लें और याद रखें, संतुलित जीवन के लिए आत्म-देखभाल आवश्यक है।