lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > चिंता - काळजी करून डोक्याचा भुगा झाला? ३ उपाय - सतत चिंता करणं होईल बंद

चिंता - काळजी करून डोक्याचा भुगा झाला? ३ उपाय - सतत चिंता करणं होईल बंद

How To Manage Stress : ताण न घेता खूश राहायचं तर करा फक्त ३ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 02:07 PM2023-04-26T14:07:08+5:302023-04-26T14:07:56+5:30

How To Manage Stress : ताण न घेता खूश राहायचं तर करा फक्त ३ गोष्टी...

How To Manage Stress : Anxiety - Got a headache from worry? 3 Remedies - Constant worrying will stop | चिंता - काळजी करून डोक्याचा भुगा झाला? ३ उपाय - सतत चिंता करणं होईल बंद

चिंता - काळजी करून डोक्याचा भुगा झाला? ३ उपाय - सतत चिंता करणं होईल बंद

सुचेता कडेठाणकर 

एक राजा होता, त्याच्याकडे सगळं काही होतं. धन, धान्य, पुत्र, पौत्र, संपत्ती. प्रजा सुखी होती. सगळं आलबेल होतं. पण तरीही त्याला काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. मनाला आनंद, समाधान वाटत नव्हतं. मग एक दिवस, त्या राजाच्या गुरुंनी त्याला एक युक्ती सांगितली. त्यांनी राजाला सांगितलं, की तुझ्या राज्यात जो माणूस सर्वाधिक सुखी, समाधानी असेल, त्याचा सदरा तू घाल. राजानी आदेश सोडले. राजाने प्रथम सर्व मंत्र्यांना विचारले. पण काय आश्चर्य! राजाच्या मंत्र्यांपैकी कोणीच सुखी, समाधानी, आनंदी नव्हते. कोणाला जबाबदारीचा ताण होता, तर कोणाला राजाची मर्जी संभाळण्याचा. कोणाला प्रजेला असलेलं उत्तरदायित्व सोसवत नव्हतं, तर कोणाला work life balance साधता येत नव्हता. त्यामुळे आता कोणत्याच मंत्र्याचा सदरा मिळून उपयोग नव्हता (How To Manage Stress).  

सैनिकांचीही तीच स्थिती होती. सतत युद्धासाठी सज्ज रहाण्याच्या ताणामुळे, त्याच्या कुटुंबात फारसे सौख्य नव्हते, त्यामुळे त्यांना सौख्य नव्हते. आता सर्व मंत्री आणि सैनिक मिळून राज्यात शोध घेऊ लागले. राज्यातल्या सर्वात यशस्वी उद्योजकांकडे, राजकारण्यांकडे, अभिनेत्यांकडे, गृहिणींकडे, डॉक्टर, वकिलांकडे शोध घेऊन दमलेले सैनिक पाणी पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलेले असताना एक मनुष्य बैलगाडीच्या खाली, सावलीत बसून दोर वळताना त्यांना दिसला. सहज चौकशी करायची म्हणून सैनिकांनी त्याला विचारलं, "काय, कसं काय चाललंय सगळं?". त्यावर तो माणूस उत्तरला, "मस्त, आनंदात सुरु आहे सर्व". 

हे उत्तर ऐकताच सैनिकांचे कान टवकराले. अखेर त्यांना आनंदी, सुखी, समाधानी, माणूस सापडला होता. आता फक्त त्याचा सदरा घ्यायचे बाकी होते. एकदाचा त्याचा सदरा राजापर्यंत पोहोचता केली, की ते त्यांच्या जबाबदारीच्या ताणातून मुक्त होणार होते. त्या मनुष्याजवळ जाऊन सैनिकांनी त्याच्याकडे सदरा मागितला पण गंमत अशी की त्या माणसाकडे एकही सदरा नव्हता. तात्पर्य असं, की आपला आनंद, सुख, समाधान कोणत्याही वस्तूमध्ये किंवा माणसामध्ये लपलेलं नाहीच. अमूक एक वस्तू मिळाल्याने किंवा अमूक एक माणूस आपल्या अपेक्षेनुसार वागल्याने आपल्याला क्षणिक आनंद होऊ शकतो, पण तो टिकणार नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा असलेला क्षण जगणं आणि त्यावर लक्ष देणं हे किती महत्वाचं आहे, हे अधोरेखित होतं. भूतकाळाची एक आणि भविष्यकाळाची एक अशा दोन सूटकेसेस सतत बरोबर घेऊन आपण रोजचा दिवस सुरु केला, तर आपण वर्तमानात येणार कसे. मग आपलीही स्थिती त्या गोष्टीतल्या लोकांसारखी होऊन जाते. 

मग काय करायचं -

१. रात्री झोपताना पलंगावर आडवे होण्याआधी ५ मिनिटं डोळे मिटून बसा आणि आपण किती वेळा श्वासोच्छ्वास करतो, ते मोजा. अमूक इतके श्वास घ्यायचे असं काहीच नाही. जेवढे होतात तेवढे मोजे. 

२. सकाळी उठल्यावर,  पलंगावरुन खाली येण्यापूर्वी देखिल हेच करा

३. आपण मिनिटाला १५ ते १७ वेळा म्हणजे २४ तासात साधारण २२००० वेळा आपण श्वसन करतो. तेही प्रतिक्षिप्त क्रिया असते. त्यातली किमान १०० श्वास तरी जागेपणी सजगपणे घेता येतील का बघूया.

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

वेबसाईट -  www.kohamfit.com

संपर्क - 744 781 5781 (फक्त व्हॉट्सअॅप)
 

Web Title: How To Manage Stress : Anxiety - Got a headache from worry? 3 Remedies - Constant worrying will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.