Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > चारचौघात फजिती टळेल-तोंड उघडण्यापूर्वी ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वत:च्या प्रेमात पडाल इतके व्हाल स्मार्ट

चारचौघात फजिती टळेल-तोंड उघडण्यापूर्वी ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वत:च्या प्रेमात पडाल इतके व्हाल स्मार्ट

Things to remember before speaking in public: How to avoid embarrassment while talking: कपाळावर आठ्या आणि चेहऱ्यावर गोंधळलेले भाव घेऊन बोलण्यापेक्षा, शांत राहून विचारपूर्वक दिलेले उत्तर तुम्हाला 'स्मार्ट' बनवते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 18:00 IST2026-03-02T18:00:00+5:302026-03-02T18:00:02+5:30

Things to remember before speaking in public: How to avoid embarrassment while talking: कपाळावर आठ्या आणि चेहऱ्यावर गोंधळलेले भाव घेऊन बोलण्यापेक्षा, शांत राहून विचारपूर्वक दिलेले उत्तर तुम्हाला 'स्मार्ट' बनवते.

How to control anger for women Ragavar niyantran kase milvvave Mahilancha rag shant karnyache upay Anger management tips for women marathi Relationship tips for short-tempered women | चारचौघात फजिती टळेल-तोंड उघडण्यापूर्वी ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वत:च्या प्रेमात पडाल इतके व्हाल स्मार्ट

चारचौघात फजिती टळेल-तोंड उघडण्यापूर्वी ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वत:च्या प्रेमात पडाल इतके व्हाल स्मार्ट

कधीकधी आपण अशा टप्प्यावर येऊन उभे राहतो की स्वत: बद्दल न्यूनगंड तयार होतो. आपल्याला बाहेरच्या जगापेक्षा स्वत:चा जास्त राग येतो. मीच अशी का? मलाच नीट वागता येत नाही? माझंच नेहमी चुकत का? असे अनेक प्रश्न मनात घर करतात.(How to control anger for women) अनेकदा घर, जबाबदाऱ्या सांभाळताना आपलं काही बिनसलं तर त्याचं खापर आपण स्वत:वर फोडून घेतो. अशावेळी आपल्याला स्वत:चा राग येतो, तेव्हा आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. याचा परिणाम असा होतो की, चारचौघात वावरताना आपण गोंधळतो आणि मग नकळतपणे आपल्याकडून अशा चुका होतात ज्याने आपला अपमान होऊ शकतो. (Things to remember before speaking in public)
माणसाचे सौंदर्य त्याच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या बोलण्यावरून जास्त मोजले जाते. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण काय आणि कसे बोलतो, यावर आपली समाजातली प्रतिमा (Image) अवलंबून असते. अनेकदा आपण एखाद्या कार्यक्रमात किंवा ग्रुपमध्ये उत्साहाच्या भरात किंवा रागाच्या भरात असे काही बोलून जातो, ज्याचा नंतर आपल्यालाच पश्चात्ताप होतो. जेव्हा आपण न विचार करता बोलतो, तेव्हा आपण केवळ इतरांचा अपमान करत नाही, तर स्वतःची किंमतही कमी करतो.(How to avoid embarrassment while talking) कपाळावर आठ्या आणि चेहऱ्यावर गोंधळलेले भाव घेऊन बोलण्यापेक्षा, शांत राहून विचारपूर्वक दिलेले उत्तर तुम्हाला 'स्मार्ट' बनवते.

रोज रात्री झोपताना ‘या’ तेलाचे २ थेंब फक्त चेहऱ्याला लावा, पिंपल्सचे काळे डाग-पिग्मेटेंशन गायब करणारा सोपा उपाय

कपाळावर दिसणाऱ्या आठ्या आणि मनातला संताप आपल्या चेहऱ्यावरचं हसू गायब करतो. या सगळ्यात आपण स्वत:ला माफ करायला विसरतो. सतत स्वत:ला चुकीचं समजल्यामुळे आपण इतरांसमोर दबून राहतो, ज्यामुळे लोक आपला फायदा घेतात आणि सतत अपमान करतात. पण स्वत:वरचा राग कमी करुन पुन्हा स्वत:च्या प्रेमात कसं पडायचं यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. 

1. रागात अनेकदा आपण अपशब्द बोलतो, अशावेळी नेहमी विचारपूर्वक वागायला हवं. आपल्याला ज्यावेळी राग येतो तेव्हा दीर्घ श्वास घ्या. आपल्याला आलेला राग सोडून द्या. आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा आपण राग, चिडचिड करुन स्वत:च्या मनावर मानसिक ताण आणतो. अशावेळी स्वत:शी संवाद साधा. 

2. आपल्याला अनेकदा वाटतं की प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असायला हवं. उत्तम सुगरण, आदर्श आई आणि परफेक्ट वर्किंग वुमन. हे ओझं स्वत:वर घेऊ नका. चुका होणं हा मानवी स्वभाव आहे. चारचौघांमध्ये आपल्या कमतरतांचा आत्मविश्वासाने स्वीकार करा. आपली रिअल इमेज लोकांसमोर ठेवल्यास अपमानाला जागा मिळत नाही. 

3. स्मार्ट व्यक्ती नेहमी कमी बोलते आणि दुसऱ्यांचे बोलणे जास्त ऐकते. जेव्हा आपण शांत राहून समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकता, तेव्हा आपल्याला परिस्थितीचा अचूक अंदाज येतो. यामुळे विचारपूर्वक आणि मुद्देसूद बोला. लोक अशाच व्यक्तीचा आदर करतात जी विचार करून बोलते. 
 

Web Title : शर्मिंदगी से बचें: बोलने से पहले 3 बातें याद रखें, बनें होशियार।

Web Summary : गुस्से को प्रबंधित करके, खामियों को स्वीकार करके और ध्यान से सुनकर आत्मविश्वास की कमी को दूर करें। विचारशील संचार आपकी छवि को बढ़ाता है और सार्वजनिक शर्मिंदगी को रोकता है। आत्मविश्वास और आत्म-जागरूक बनें।

Web Title : Avoid embarrassment: Remember these 3 things before speaking, be smarter.

Web Summary : Overcome self-doubt by managing anger, accepting imperfections, and listening attentively. Thoughtful communication enhances your image and prevents public embarrassment. Be confident and self-aware.