Join us

बावरा मन...! मनात सतत विचारांचे काहूर, बेचैन वाटतंय ? मनाला शांत करण्यासाठी ३ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 12:35 IST

Mindfulness exercises : Meditation for overthinking: Mental health self-care: अचानक रडू येते, काय करावं समजत नाही? अस्वस्थ वाटतं, असं का होते? अशावेळी नेमकं काय करायला हवं, पाहूया...

ठळक मुद्देसतत भीती वाटतं राहते, अस्वस्थ वाटतं. आजच्या दिवसाची सुरुवात कशी करावी हे देखील समजत नाही. शांत बसून राहावसं वाटतं किंवा यंत्रवतपणे सुरु असलेली कामे कधी संपतात असं वाटतं.

सकाळचा गजर वाजत राहतो आणि आपल्याला अजून थोडंस झोपून राहवंस वाटतं.(Mental Health) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली काम काही संपत नाही. रोजचा दिनक्रम ठरलेला असतो.(Aniexty)  आठवड्याभराच शेड्यूल देखील ठरलेलं असतं.(Mindfulness exercises) पण मनाच काय? हा प्रश्न सतत डोळ्यांसमोर असतो.(Meditation for overthinking) कधीकधी काम करायची इच्छा होत नाही. सतत भीती वाटतं राहते, अस्वस्थ वाटतं. आजच्या दिवसाची सुरुवात कशी करावी हे देखील समजत नाही. शांत बसून राहावसं वाटतं किंवा यंत्रवतपणे सुरु असलेली कामे कधी संपतात असं वाटतं. (Meditation for overthinking)अनेकदा हताश वाटतं. आपलं कसं होणारं? ही भीती सतत सतावू लागते.(Mental health self-care) अचानक कुठल्यातरी मोठ्या संकटात सापडल्याची भीती वाटू लागते.(depression stress in women) निर्णय घेतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. पण अशावेळी नेमकं काय करावं? दैनंदिन जीवनशैलीत काही बदल केले तर आपली वाट आणखी सोपी होण्यास मदत होईल. 

मन के जीते जीत है, मन के हारे हार! पाय फ्रॅक्चर होऊनही ऋषभ पंत खेळला, ते कसं जमलं?

1. ताण कमी करण्यासाठी आपण नियमित व्यायाम करायला हवा. दररोज २० ते ३० मिनिटे चालायला हवे. योगा किंवा स्ट्रेचिंग केल्याने ताण कमी होतो. व्यायामामुळे एंडोर्फिन बाहेर पडतात. जे आपला मूड सुधारण्यास मदत करतात. मनाला शांत करण्यासाठी ध्यान करा. आपल्याला आवडणारी गाणी ऐका. 

2. आपला रोजचा आहार संतुलित असायला हवा. आहारात ओमेगा-३ , मांस, अक्रोड, ड्रायफ्रुट्स, व्हिटॅमिन बी आणि भरपूर मॅग्नेशियम असणारे पदार्थ खायला हवे. हिरव्या भाज्या, केळी, बदाम खाल्ल्याने ताण कमी होतो. साखर आणि कॅफिनचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. तसेच दररोज २ ते ३ लिटर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन टाळता येते. 

3. माइंडफुलनेसचा सरावा केल्याने झोप शांत लागते. त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करायला हवे, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. त्यातून निघणारा निळा प्रकाश झोपेमध्ये अडचणी निर्माण करतो. किमान ७ ते ८ तास झोप घ्या, ज्यामुळे मेंदू रिचार्ज होण्यास मदत होईल. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या किंवा दिवसभरातील घडामोडी लिहून ठेवा. ज्यामुळे ताण हलका होण्यास मदत होईल. 

टॅग्स :आरोग्यमानसिक आरोग्य