Lokmat Sakhi >Mental Health > कॉन्फिडन्स कमी झाला, चारचौघांत बोलायची भीती वाटते? सकाळी उठताच 'हे' काम करा- आत्मविश्वास वाढेल

कॉन्फिडन्स कमी झाला, चारचौघांत बोलायची भीती वाटते? सकाळी उठताच 'हे' काम करा- आत्मविश्वास वाढेल

How To Boost Confidence Level?: कॉन्फिडन्स कमी झाला असेल तर हा एक सोपा उपाय काही दिवस घरच्याघरी करून पाहा..(simple tricks and tips to increase confidence level)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2025 14:51 IST2025-08-02T14:50:19+5:302025-08-02T14:51:03+5:30

How To Boost Confidence Level?: कॉन्फिडन्स कमी झाला असेल तर हा एक सोपा उपाय काही दिवस घरच्याघरी करून पाहा..(simple tricks and tips to increase confidence level)

how to boost confidence level? simple tricks and tips to increase confidence level  | कॉन्फिडन्स कमी झाला, चारचौघांत बोलायची भीती वाटते? सकाळी उठताच 'हे' काम करा- आत्मविश्वास वाढेल

कॉन्फिडन्स कमी झाला, चारचौघांत बोलायची भीती वाटते? सकाळी उठताच 'हे' काम करा- आत्मविश्वास वाढेल

Highlightsआपल्या पॉझिटीव्ह गोष्टी आठवतो त्यामुळे आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो. त्याचा चांगला परिणाम आपल्या कामावर दिसून येतो. 

बऱ्याचदा असं होतं की आपला कॉन्फिडन्स कमी होतो. काही वेळेला आपल्याला कोणी काहीतरी बोलतं, आपल्या कामावर, आपल्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उठवलं जातं. त्यामुळे मग खचून गेल्यासारखं होतं. यामुळे मग आपल्याला सगळं येत असून, सगळं माहिती असून उगाच खचल्यासारखं होतं, निगेटीव्ह वाटायला लागतं आणि कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. असं काही तुमच्या बाबतीत होत असेल तर मिरर थेरपी हा एक उपाय घरच्याघरी काही दिवस करून पाहा (How To Boost Confidence Level?). मनातली नकारात्मकता कमी होऊन कॉन्फिडन्स वाढायला मदत होईल.(simple tricks and tips to increase confidence level)

 

कॉन्फिडन्स वाढण्यासाठी काय उपाय करावा?

कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मिरर थेरपी हा उपाय करण्याचा सल्ला अनेक मानसोपचार तज्ज्ञ देतात. हा उपाय करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आरशासमोर उभे राहा.

लिंबू पिळून सालं फेकून देऊ नका, रोपांसाठी वापरा- रोपांवर रोग पडणार नाही, हिरवीगार होतील

यानंतर आरशात स्वत:लाच पाहून खुश, आनंदी व्हा. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींची उजळणी करा. त्या सगळ्या चांगल्या गोष्टी स्वत:चं स्वत:लाच सांगा. असं केल्याने आपल्या पॉझिटीव्ह बाजुंची उजळणी होते, त्यांची आपल्याला नव्याने आठवण होते आणि कॉन्फिडन्स वाढायला मदत होते.

 

यानंतर मग आजचा माझा दिवस चांगला जाणारच आहे. मी मला दिलेलं हे काम अतिशय उत्तम करणार आहे. पुढच्या एक महिन्यात मला काय करायचं आहे, वर्षभरात मला काय हवं आहे, माझं काय स्वप्न आहे आणि ते पुर्ण करण्यासाठी मला काय काय करायचं आहे हे स्वत:ला सांगा.

१ तासात उपवासाची खमंग भाजणी होईल तयार, विकतच्या पिठाचे थालिपीठ करण्यापेक्षा घ्या ही खमंग रेसिपी... 

काही दिवस अगदी रोज हा उपाय न चुकता करा. हा उपाय सलग दोन ते तीन महिने केल्यास तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप सकारात्मक वाटू लागेल. नकारात्मकता कमी होऊन तुमचा आत्मविश्वास वाढेल. यामध्ये कोणतीही जादू नाही. याचा परिणाम एवढाच होतो की आपण रोज सकारात्मक बोलतो, आपल्या पॉझिटीव्ह गोष्टी आठवतो त्यामुळे आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो. त्याचा चांगला परिणाम आपल्या कामावर दिसून येतो. 

 

Web Title: how to boost confidence level? simple tricks and tips to increase confidence level 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.