मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... मैत्रीचं नातं खरंतर थोडं आंबट थोडं गोड. रक्ताचं नातं नसलं तरी स्वत:हून जोडलेलं हक्काचं असं नातं म्हणजे मैत्री.(Friendship) पु.ल. देशपांडे यांनी देखील म्हटलं आहे की मैत्रीची व्याख्या सोपी आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही. मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री तर तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री..! (Effects of fights with friends) पण मोठं होताना ही मैत्री जितकी जगण्याचा आधार होते, तितकीच मैत्रीतली भांडणं जगणं मुश्किलही करु शकते.(Teenage mental health) अगदी जय-वीरु सारखे एकेकाळचे मित्र पण त्याच मैत्रीतले गैरसमज, एकमेकांशी केलेली स्पर्धा, इगो आणि कमी संवाद,मानसिक थकवा.(Emotional insecurity) त्याचा परिणाम फक्त मैत्रीवरच नाही तर अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावरही होत आहे.(Mental health in teens)
बावरा मन...! मनात सतत विचारांचे काहूर, बेचैन वाटतंय ? मनाला शांत करण्यासाठी ३ सोपे उपाय
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲण्ड न्यूरोसायन्स (National Institute of Mental Health and Neurosciences -Nimhans) या मानसिक आरोग्यासाठी मुलभूत काम करणाऱ्या संस्थेचं नुकतंच प्रसिध्द झालेलं एक सर्वेक्षण अत्यंत काळजी वाटावं असंच आहे. वयात येणाऱ्या मुलांचा त्यांनी अभ्यास केला आणि या मुलांना सर्वाधिक भीती असुरक्षितता कशाची वाटते याचं विश्लेषण केलं. तर अनेक मुलांनी त्यांना असं सांगितलं की वयात येताना सगळ्यात जास्त काळजी आपला जवळचा मित्र तर आपण गमावणार नाही ना याची वाटते. तसा मित्र गमावला किंवा त्यातली असुरक्षितता ऐन तारुण्यात त्यांच्या व्यक्तिमत्वातला कच्चा दुवा ठरते.
अनेक मुलांना आपल्या भावनांचं नीट नियमन करता येत नाही. ते अत्यंत इम्पलसिव्हली वागतात. त्यांना आपले नातेसंबंध सुदृढ आणि स्थिर ठेवता येत नाही. मैत्री तुटण्याचं भय किंवा अनुभव त्यांना अतिशय अस्वस्थ करतो.
हे संशोधन करणारे डॉ. मेहेक सिकंद आणि डॉ. पुर्णिमा भोला, डॉ. मीना के. एस यांनी मैत्री आणि मानसिक स्वास्थ्यासंदर्भात काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. मैत्रीचा आपल्या एकूण मानसिक स्वास्थ्यावर किती मुलभूत आणि दूरगामी परिणाम होतो हे ते सांगतात. आपण कोण आहोत, आपल्याला काय महत्वाचं वाटतं, आपण कोण होणार यात मित्रांची मतं, मित्रांचं सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. वयात येण्यापासून तरुणपणापर्यंत आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतं.
अनेकदा पालक मुलांना विचारतात की, तुला तुझे मित्र आमच्यापेक्षा जास्त जवळचे आणि महत्वाचे वाटतात का?
मुलं या प्रश्नानं कात्रीत सापडत असले तरी वयात येणाऱ्या आणि तरुण मुलांना पालकांपेक्षा मित्र जास्त जवळचे वाटतात. त्यांच्याशी मुलांना मनातं बोलता येतं, मित्र आपल्या भावना समजून घेतात असं मुलांना वाटतं.
ज्या घरात पालकांचा मुलांशी चांगला संवाद असतो, निकोप नातं असतं त्या घरातली मुलं बाहेर मित्रांशीही उत्तम नातं ठेवू शकतात. आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. त्यामुळे मैत्री आणि आपलं व्यक्तिमत्व यांचं जवळचं नातं असतं, वयात येणाऱ्या मुलांसाठी तर ते फारच महत्वाचं असतं हे विसरु नयेच.