Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो सावधान- राग, दु:ख मनात दाबून कुढत बसणं खूपच धोक्याचं, ५ आजार लागतील मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2026 09:30 IST

Mental Health Tips: महिलांनो बोला, ओरडा, चिडून मोकळं व्हा.. पण आतल्या आत कुढत बसू नका, कारण...

ठळक मुद्देवेगवेगळ्या भावना केवळ मनातच दाबून ठेवल्याने आणि कधीच कोणाकडे व्यक्त न झाल्याने महिलांना काय त्रास होऊ शकतो?

प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. कोणी धाड धाड बोलून मोकळं होतं तर कोणी कृतीतून आपल्या भावना व्यक्त करून दाखवतं. तर काही लोक असेही असतात जे त्यांच्या मनातलं कधीच कोणाकडेच मोकळं बोलत नाहीत. खासकरून महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कित्येकजणींना सासुरवास असतो, नवऱ्याचा जाच असतो किंवा अन्य काही त्रास असतात. पण त्यांच्या स्वभावामुळे या सगळ्या गोष्टींचा त्यांना कितीही राग आला, त्रास झाला तरी त्या त्याविषयी अवाक्षरही बोलत नाहीत. आतल्याआत कुढत बसतात आणि सगळं काही निमूटपणे ऐकून घेतात. मनातली चीड, राग, संताप तुम्ही कधीच कोणत्याच माध्यमातून व्यक्त करत नसाल आणि नुसतंच तो दाबून ठेवून मनातल्या मनात कुढत बसत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. 

 

भावना दाबून ठेवल्याने महिलांना होणारे त्रास

वेगवेगळ्या भावना केवळ मनातच दाबून ठेवल्याने आणि कधीच कोणाकडे व्यक्त न झाल्याने महिलांना काय त्रास होऊ शकतो, याविषयीची माहिती डॉक्टरांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

संक्रांत स्पेशल इंस्टंट ग्लो देणारं फेशियल, घरातलेच पदार्थ 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, १५ मिनिटांत त्वचा चमकेल

यामध्ये डाॅक्टर सांगतात की या दाबून ठेवलेल्या संतापाचा, रागाचा महिलांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ लागतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे मग थायरॉईड, अपचन, गॅसेस होणे, केस गळणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकदुखी, एन्झायटी असे वेगवेगळे त्रास मागे लागतात. हे त्रास पुर्णपणे मानसिक आरोग्य बिघडलेले असल्यामुळे सुरू झालेले असतात..

 

त्यामुळे मग तुम्ही त्यांच्यावर कितीही उपचार घेतले तरी ते पुर्णपणे बरे होत नाहीत. वारंवार उफाळून येतात.

चली चली रे पतंग...!! मकर संक्रांतीला मनसोक्त करा पतंगबाजी, मिळतील ५ जबरदस्त फायदे...

म्हणूनच जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही, मनातला राग, संताप, चीड किंवा इतर भावना बाहेर काढत नाही, तो पर्यंत तुमचं शरीर पुर्णपणे बरं होत नाही. म्हणूनच व्यक्त होणं, भावना मोकळं करणं खूप गरजेचं आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष... त्यात कमीपणा काहीही नाही. असा सल्ला डॉक्टर देतात. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Women, beware! Suppressing emotions can lead to serious health issues.

Web Summary : Suppressing emotions, especially for women facing hardship, can negatively impact health. Doctors warn that bottled-up feelings can cause hormonal imbalances, thyroid issues, digestive problems, hair loss, and body aches. Expressing emotions is crucial for overall well-being, regardless of gender.
टॅग्स :मानसिक आरोग्यमहिला