Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर बॉयफ्रेण्डला नंतर आधी मोबाइलला दोष द्या! डोकं बधीर करणारं कारण..

तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर बॉयफ्रेण्डला नंतर आधी मोबाइलला दोष द्या! डोकं बधीर करणारं कारण..

Do you use mobile all day long? it makes you angry and is a main reason for many issues : मोबाइल वापरताना काळजी घेणे गरजेचे. पाहा कसा परिणाम होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2026 17:36 IST2026-01-29T17:34:44+5:302026-01-29T17:36:04+5:30

Do you use mobile all day long? it makes you angry and is a main reason for many issues : मोबाइल वापरताना काळजी घेणे गरजेचे. पाहा कसा परिणाम होतो.

Do you use mobile all day long? it makes you angry and is a main reason for many issues | तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर बॉयफ्रेण्डला नंतर आधी मोबाइलला दोष द्या! डोकं बधीर करणारं कारण..

तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर बॉयफ्रेण्डला नंतर आधी मोबाइलला दोष द्या! डोकं बधीर करणारं कारण..

आजच्या डिजिटल युगात मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्ही यांचा वापर टाळणे जवळजवळ अशक्य झाले आहे. काम, शिक्षण, मनोरंजन आणि संवाद यासाठी सतत स्क्रीनकडे पाहावे लागते. मात्र दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने स्क्रीन पाहिल्यास शरीरावर आणि मनावर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे स्क्रीन वापरताना योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. (Do you use mobile all day long? it makes you angry and is a main reason for many issues )सतत चिडचिड होत राहते. त्याचा दोष आपण आईची बडबड, बाबांचा ओरडा आणि नवऱ्याची कटकट याला देतो. मुळात चूक त्यांची नाही आपल्या हातातल्या मोबाइलची आहे. 

सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे सर्वात जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, पाणी येणे, धूसर दिसणे आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. याला डिजिटल आय स्ट्रेन असेही म्हटले जाते. स्क्रीनकडे पाहताना पापण्या कमी प्रमाणात लवतात, त्यामुळे डोळे कोरडे पडतात आणि थकवा वाढतो. मान, खांदे आणि पाठदुखी ही देखील स्क्रीनच्या अति वापरामुळे होणारी सामान्य समस्या आहे. मोबाइल खाली वाकून पाहणे किंवा लॅपटॉपवर काम करताना चुकीच्या पद्धतीने बसणे मानेवर आणि कण्यावर अतिरिक्त ताण देते, यामुळे मान आखडणे, खांदे दुखणे आणि मणक्याचे त्रास सुरु होऊ शकतात. सतत स्क्रीन वापरल्याचा परिणाम झोपेवरही होतो. मोबाइल किंवा लॅपटॉपमधून निघणारा निळा प्रकाश (ब्लू लाइट) मेंदूला सतर्क ठेवतो आणि मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो. त्यामुळे झोप उशिरा लागणे, झोपेची गुणवत्ता कमी होणे आणि सकाळी थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवतात.

मानसिक आरोग्यावरही स्क्रीनचा परिणाम होतो. सतत नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि माहितीचा मारा यामुळे चिडचिड, तणाव, एकाग्रता कमी होणे आणि चिंता वाढू शकते. विशेषतः मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये याचा जास्त प्रभाव दिसून येतो. मोबाइल आणि लॅपटॉप वापरताना काही साध्या पण महत्त्वाच्या काळजी घेतल्यास हे दुष्परिणाम कमी करता येतात. स्क्रीन डोळ्यांच्या सरळ समोर आणि योग्य उंचीवर ठेवावी, जेणेकरुन मान सतत खाली वाकवावी लागत नाही. काम करताना सरळ बसण्याची सवय लावावी आणि पाठीला आधार द्यावा. प्रत्येक २० मिनिटांनी थोडा ब्रेक घेऊन दूरवर पाहणे, डोळे मिटून विश्रांती देणे उपयुक्त ठरते.

स्क्रीनचा ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट डोळ्यांना सोयीस्कर असतील असेच ठेवावेत. शक्य असल्यास ब्लू लाइट फिल्टर किंवा नाईट मोडचा वापर करावा, विशेषतः रात्रीच्या वेळी. झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाइल किंवा लॅपटॉप वापरणे टाळल्यास झोप सुधारण्यास मदत होते. एकूणच, स्क्रीनचा वापर पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्याचा संतुलित आणि जाणीवपूर्वक वापर करणे आपल्या हातात आहे. 

Web Title : चिड़चिड़ाहट के लिए बॉयफ्रेंड को नहीं, अपने फोन को दोष दें!

Web Summary : अधिक स्क्रीन समय से आंखों पर तनाव, सिरदर्द और नींद की समस्या होती है। यह चिड़चिड़ापन और तनाव भी बढ़ाता है। स्क्रीन का उपयोग कम करें, सेटिंग्स समायोजित करें और ब्रेक लें।

Web Title : Blame your phone, not boyfriend, for irritation! A shocking reason.

Web Summary : Excessive screen time causes eye strain, headaches, and sleep problems. It also contributes to irritability and stress. Reduce screen use, adjust settings, and take breaks.