Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्राम-फेसबूक पेज हॅक, फोटो व्हायरल झाले तर..? ‘एवढंच करा’- डिजिटल मदत करेल तातडीने बंदोबस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 16:13 IST

cyber security tips for photo safety : cyber crime complaint website India : तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमचे फोटो वापरत असेल किंवा त्रास देत असेल, तर घरबसल्या तक्रार कशी करायची ?

आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर आपले सुंदर फोटो शेअर करणे ही एक फॅशन झाली आहे. परंतु एका साध्या 'पोस्ट'च्या मागे काही विकृत प्रवृत्ती टपून बसलेल्या असू शकतात. आपण वेगवेगळ्या सोशल  प्लॅटफॉर्मवर सहजपणे फोटो अपलोड करतो. अनेकदा हेच फोटो आपल्या परवानगीशिवाय डाउनलोड करून त्यांचा गैरवापर केला जातो किंवा विशेषतः मुलींच्या फोटोचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, जे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. बहुतेकवेळा मुलींच्या फोटोंचे मॉर्फिंग केले जाते किंवा ते चुकीच्या वेबसाईटवर अपलोड करून त्यांचा गैरवापर केला जातो. आपल्या एका फोटोचा असा चुकीचा वापर होऊ शकतो, या कल्पनेनेच अनेकजणी हादरून जातात. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या अशा प्रकारांमुळे मानसिक त्रास, भीती आणि बदनामीला सामोरं जावं लागू शकतं(cyber security tips for photo safety).

परंतु जेव्हा असा एखादा प्रकार घडतो, तेव्हा घाबरून जाऊन सोशल मिडिया अकाऊंट बंद करणे हा एकमेव उपाय नसतो. उलट, अशा सायबर गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारच्या सायबर क्राईम विभागाने (Cyber Crime Department) एक विशेष प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून योग्य पावले उचलून स्वतःचं संरक्षण कसं करायचं, हे जाणून घेणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक ठरतं. तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमचे फोटो वापरत असेल किंवा त्रास देत असेल, तर घरबसल्या तक्रार कशी करायची आणि कोणती वेबसाईट तुम्हाला (cyber crime complaint website India) मदत करू शकते, याची सविस्तर माहिती पाहूयात. 

नेमकं करायचं काय ? 

परवानगीशिवाय कोणी तुमचे फोटो वापरत असेल किंवा त्रास देत असेल तर अशावेळी गुगलवर जाऊन, stopncll.org.in या वेबसाईटला भेट द्यावी. StopNCII.org (Stop Non-Consensual Intimate Image Abuse) ही एक अत्यंत महत्त्वाची वेबसाईट आहे. विशेषतः ज्यांचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत किंवा कुणीतरी ते व्हायरल करण्याची धमकी देत आहे, अशा लोकांसाठी (प्रामुख्याने महिलांसाठी) ही वेबसाईट एक 'डिजिटल सुरक्षा कवच' आहे.

ही एक जागतिक स्तरावरील मोफत चालवली जाणारी वेबसाईट आहे, जी 'रिव्हेंज पॉर्न' (Revenge Porn) आणि फोटोंचा गैरवापर रोखण्यासाठी काम करते. जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर केस नोंदवता, तेव्हा तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरच त्या फोटो/व्हिडिओची एक 'डिजिटल फिंगरप्रिंट' (ज्याला 'Hash' म्हणतात) तयार केली जाते. हा फक्त एक अक्षरांचा आणि अंकांचा कोड असतो. तुमचा मूळ फोटो तुमच्याकडेच राहतो, तो वेबसाईटवर जात नाही. फक्त तो 'कोड' (Hash) वेबसाईटला मिळतो. हा कोड सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना शेअर केला जातो. जर कोणीही तो फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचा प्रयत्न केला, तर तो कोड मॅच होतो आणि ती सिस्टिम तो फोटो आपोआप ब्लॉक करते. एकदा हॅश तयार झाला की, फेसबुक, इंस्टाग्राम, रेडिट आणि थ्रेड्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून तो कंटेंट २४ ते ४८ तासांत काढून टाकला जातो. 

या वेबसाईटवर केस कशी नोंदवावी ? 

१. StopNCII.org वर जा.
२. 'Create Your Case' वर क्लिक करा. 
३. तुमचे वय (१८ पेक्षा जास्त असणे आवश्यक) आणि ज्या फोटोंचा गैरवापर होण्याची भीती आहे, ते निवडा. 
४. सिस्टिम तुमच्या डिव्हाइसवरच 'हॅश' तयार करेल.
५. तुम्हाला एक Case Number आणि PIN मिळेल. तो जपून ठेवा, कारण यावरूनच तुम्ही नंतर तुमची तक्रार ट्रॅक करू शकता.

महिलांवरील अत्याचारासोबतच लहान मुलांचे होणारे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार याविषयी देखील आपण तक्रार दाखल करु शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Hacked social media? Photos leaked? StopNCII.org offers immediate protection.

Web Summary : Worried about photo misuse? StopNCII.org offers a solution. It creates a digital fingerprint ('hash') of your photos, shared with social platforms. This blocks unauthorized uploads, protecting your privacy and preventing image abuse. Report incidents and track your case online.
टॅग्स :मानसिक आरोग्यमहिला आणि बालविकासमहिलासायबर क्राइम