Lokmat Sakhi >Mental Health > भीती वाटते, आपलं कसं होणार भविष्यात? निर्णयच घेता येत नाही? वाचा मन शांत करणारे ४ उपाय

भीती वाटते, आपलं कसं होणार भविष्यात? निर्णयच घेता येत नाही? वाचा मन शांत करणारे ४ उपाय

How to calm your mind: Ways to reduce anxiety: Calm your mind naturally: मन कधीकधी बेचैन होतं, परिस्थिती आपल्या हातात नसते अशावेळी काय करायचं म्हणजे आपण योग्य निर्णय घेऊ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 17:29 IST2025-05-22T17:28:30+5:302025-05-22T17:29:03+5:30

How to calm your mind: Ways to reduce anxiety: Calm your mind naturally: मन कधीकधी बेचैन होतं, परिस्थिती आपल्या हातात नसते अशावेळी काय करायचं म्हणजे आपण योग्य निर्णय घेऊ.

Are you afraid of what will happen to you in the future? Can't make a decision? Read 4 ways to calm your mind | भीती वाटते, आपलं कसं होणार भविष्यात? निर्णयच घेता येत नाही? वाचा मन शांत करणारे ४ उपाय

भीती वाटते, आपलं कसं होणार भविष्यात? निर्णयच घेता येत नाही? वाचा मन शांत करणारे ४ उपाय

कधीकधी खूप हताश वाटतं. कळत नाही पुढे काय होणार? आपण सुरक्षित राहू का? पगार पुरेल का? करिअर मनासारखं घडेल का? अनेक प्रश्न.(How to calm your mind) आणि बोगद्यात अडकल्यासारखी अवस्था कारण पुढची वाट दिसतच नाही.(Ways to reduce anxiety) कोरोनाकाळात साऱ्या जगानं हे अनुभवलं आणि आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत असताना तशीच भीती पुन्हा दाटून आली तर काही नवल नाही.(Struggling to make decisions) मन सैरभैर होतंच, निर्णय घेणं अजिबातच सोपं नाही. पण मग अशावेळी करायचं काय? काही सोपे उपाय पाहू, त्यानं आपली वाट कदाचित सोपी होईल..(Overthinking and anxiety relief)

उठता-बसता हाडांमधून कटकट आवाज येतो? खा ६ पदार्थ रोज, ठिसूळ हाडं होतील दणकट

आपल्याला काय करता येईल?

१. जेव्हा भीती वाटते, हे काय संकट आपल्यावर कोसळलंय असं वाटायला लागतं तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या. स्वत:ला सांगा की सर्व काही व्यवस्थित आहे. आपण या परिस्थितीशी सामना करू. तरून जाऊ. हा सकारात्मक विचार मनाला चालना आणि ऊर्जा देतो.
२.  अनेकदा आपण आपली तुलना इतरांशी करतो. अशी तुलना केल्यानं स्वत: जे करतो आहोत, किंवा आपण जे आहोत त्याबद्दल समाधान वाटत नाही. सारखं काहीतरी कमी असल्यासारखं जाणवतं. ही कमीपणाची जाणीवही मन अस्थिर करते. तेव्हा आपलं मन जर इतरांशी तुलना करायला लागलं तर आधी एक मिनिट थांबा. अशी तुलना करणं योग्य नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. त्यामुळे अशा तुलनेचा उपयोग होणार नाही असं स्वत:ला समजावून सांगा.


३.  आपण आपल्या समोरची परिस्थिती नाकारत राहिलो तर आपलं मन दु:खी किंवा घाबरलेलं असतं. पण एकदा का परिस्थिती स्वीकारली की आपण आपल्याला नेमकं काय करायला लागेल याचा विचार करतो आणि तसे उपाय करू लागतो. अशा प्रकारचा स्वीकार मनाला ताकद देतो. उभारी देतो. आणि आपण हे करू शकतो असा विश्वासही देतो. 
४. रिकामं बसूनही मनात भलते सलते विचार येऊन घाबरायला होतं. त्यामुळे सतत कामात राहाणं, आपलं मन वाचन वगैरे कृतीत गुंतलेलं ठेवणं चांगलं. आपलं दिवसभराची दिनचर्या ठरवून ती पाळण्याकडे लक्ष दिल्यास आपल्याला करायला खूप काही आहे याची जाणीव होते. आणि आपण कार्यमग्न राहातो. कार्यमग्न राहणाऱ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहातं.

Web Title: Are you afraid of what will happen to you in the future? Can't make a decision? Read 4 ways to calm your mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.