आपल्या सभोवती आपण अशा काही व्यक्ती पाहातो ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जादू असते. त्या व्यक्तींच्या संपर्कात राहायला आपल्याला आवडतं. शिवाय त्या व्यक्तींना वारंवार भेटावं, त्यांच्याशी भरभरून बोलावं, आपल्या मनातलं त्यांना शेअर करावं असं आपल्याला मनापासून वाटतं. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व आपल्याला आवडत असतं. असंच तुम्हालाही व्हायचं असेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधली एक महत्त्वाची, खास आणि सगळ्यांची आवडती व्यक्ती बनायचं असेल तर पुढे सांगितलेल्या काही साध्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. बघा तुमचं व्यक्तिमत्त्व एवढं आकर्षक होईल की सगळ्यांच्याच तुम्ही अगदी आवडत्या बनाल..
तुम्हाला एक उत्तम, सगळ्यांच्या प्रिय व्यक्ती बनविणाऱ्या ८ गोष्टी..
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वत: बोलण्याऐवजी दुसरा काय सांगतो आहे ते ऐकून घ्या. कारण आपलंच म्हणणं रेटवणाऱ्या व्यक्ती कोणालाही आवडत नाहीत.
२. नेहमी स्वत:बद्दल बोलत राहू नका. स्वत:ची स्तुती स्वत:च्याच तोंडाने कधीही करू नका. त्याऐवजी समोरच्यामध्ये काय चांगले गुण आहेत याविषयी बोला. त्याच्यातले दोष त्याने विचारल्याशिवाय त्याला सांगू नका.
रामनवमीला नीता अंबानींनी नेसली रामशीला साडी, वाचा या इकत साडीची खासियत, पाहा व्हायरल फोटो
३. ज्या व्यक्तींनी काहीतरी करून दाखवलेलं असतं, छोटं का असेना पण स्वत:चं विश्व निर्माण केलेलं असतं, अशा व्यक्ती दुसऱ्यांना आवडतात. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यात एक्सपर्ट व्हा.
४. समोरच्याने स्वत:हून विचारल्याशिवाय त्याला कोणताही सल्ला देऊ नका. कोणालाही विचारल्याशिवाय तुमचं मत देऊ नका.
५. तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीला मदत करा. मदतीचा देखावा नको. कारण तो कधी ना कधी उघड पडतोच. त्यामुळे तुमच्या स्वभावातच तसा बदल करा आणि समोरच्यासाठी मनापासून काहीतरी करा. त्यातला आनंद जेवढा त्या व्यक्तीला मिळेल, त्याहून कित्येक पटींनी जास्त तुम्हाला मिळेल.
६. भावना कंट्रोलमध्ये ठेवायला शिका. कितीही राग आला तरी समोरच्याला कधीही वाईट बोलून दुखवू नका. संयमी राहा. शांत राहा. तुमचं म्हणणं खरं असेल तर ते समोरच्याला आपोआप अनुभवातून पटत जाईल.
७. सतत अपग्रेड राहा. वाचत राहा. छंद जोपासत राहा. कारण काळासोबत चालणाऱ्या, त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवत जाणाऱ्या स्मार्ट व्यक्ती सगळ्यांनाच आवडतात.
८. पॉझिटीव्ह राहा. तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीला पॉझिटीव्ह, उत्साही, आनंदी वाटलं तरच ती व्यक्ती परत तुमच्याशी बोलायला येते. नाहीतर तुम्हाला टाळते.
Web Summary : To become popular, listen more than you speak, highlight others' strengths, and develop your expertise. Offer help genuinely, control emotions, stay updated, and maintain a positive attitude. These simple tips will make you everyone's favorite.
Web Summary : लोकप्रिय बनने के लिए, बोलने से ज़्यादा सुनें, दूसरों की ताक़त पर ज़ोर दें और अपनी विशेषज्ञता विकसित करें। वास्तविक रूप से मदद करें, भावनाओं को नियंत्रित करें, अपडेट रहें और सकारात्मक रवैया बनाए रखें। ये सरल सुझाव आपको सबका पसंदीदा बना देंगे।