Join us
Daily Top 2Weekly Top 5

५ मिनिटांत स्ट्रेस गायब! ऑफिसमध्ये बसल्याजागी करा'हा' व्यायाम; एकाग्रता वाढेल, व्हाल चटकन रिलॅक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 13:53 IST

Deep breathing exercises for instant calm: Stress management tips for employees: ५ मिनिटांत स्ट्रेस गायब करणारा व्यायाम

कामाच्या व्यापामुळे हल्ली प्रत्येकाला स्ट्रेट किंवा मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. घर, ऑफिस, मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास, स्वयंपाक, ऑफिसमधल्या डेडलाइन्स सगळ सांभाळताना आपल्याला नाकी नऊ येतात.(Deep breathing exercises for instant calm) कधी कधी ऑफिसमध्ये काम करताना डेडलाईन्स पूर्ण करणे, सततचे कॉल्स, मीटिंग्स आणि कामाचा वाढता डोंगर यामुळे केवळ शरीरच नाही, तर मनही प्रचंड थकते.अशा वेळी आपल्याला तासनतास विश्रांतीची गरज असते, पण कामाच्या ठिकाणी ते शक्य नसते. मग काय करावे? (Stress management tips for employees)ऑफिसच्या खुर्चीत बसल्या जागी सुद्धा अवघ्या ५ मिनिटांत स्वत:ला आपण रिफ्रेश करु शकतो. मानवी मेंदूला शांत करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी काही विशिष्ट 'क्विक एक्सरसाइजेस' (Quick Exercises) अत्यंत प्रभावी ठरतात.(Simple stretches for office desk) हे व्यायाम करण्यासाठी आपल्याला जिममध्ये जाण्याची गरज नाही. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण बसल्याजागी आपला स्ट्रेस घालवू शकतो. पाहूया ५ मिनिटांत स्ट्रेस गायब करणारा व्यायाम. (How to refresh mind in 5 minutes)

बाहेरून कुरकुरीत आणि आतून चिजी! स्पेशल गरमागरम मिरची भजी, संध्याकाळच्या चहासोबत मस्त बेत- सोपी रेसिपी

ताण कमी करणारा सगळ्यात सोपा व्यायाम ४-७-८ ब्रीदिंग टेक्निक्स. यासाठी आपल्याला सगळ्यात आधी खुर्चीवर पाठ सरळ ठेवून बसावे लागेल. नंतर नाकाने ४ सेकंद खोल श्वास घ्या. तो श्वास ७ सेकंद रोखून धरा. आणि नंतर ८ सेकंद तोंडाने हळूहळू बाहेर सोडा. यामुळे आपल्या शरीरातील पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय होते, ज्यामुळे मेंदूला शांत करता येते.

शोल्डर आणि नेक स्ट्रेच करा. सतत कॅम्प्युटरसमोर बसल्याने आपल्या मानेच्या आणि खांद्याच्या स्नायूंवर ताण येतो. ज्याचा परिणाम थेट डोक्यापर्यंत पोहोचतो. यासाठी बसल्या जागी खांदे कानाच्या दिशेने वर उचला आणि ५ सेकंद धरुन ठेवा. नंतर एकदम खाली सोडा. मान हळूहळू डावीकडून उजवीकडे फिरवा. यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंचा कडकपणा कमी होतो. 

 सतत स्क्रीनकडे पाहिल्यानंतर डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे मानसिक थकवा वाढतो. यासाठी आपल्याला दोन्ही तळवे एकमेकांवर घासून गरम करा आणि ते बंद डोळ्यांवर ठेवा. २ मिनिटे डोळे बंद करुन शांत राहा. अंधार आणि उष्णतेमुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि मन स्थिर व्हायला मदत होते. स्ट्रेस हार्मोन्सची (Cortisol) पातळी कमी होऊन तुम्हाला प्रसन्न वाटते.५ मिनिटांच्या ब्रेकनंतर मेंदू अधिक वेगाने विचार करू लागतो, ज्यामुळे कामाचा वेग वाढतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : 5-Minute Stress Relief: Office Exercises for Focus and Relaxation

Web Summary : Combat work stress with simple office exercises. Deep breathing (4-7-8 technique), shoulder and neck stretches, and palm-to-eye relaxation can quickly calm the mind, improve blood flow, and boost focus in just five minutes.
टॅग्स :मानसिक आरोग्यहोम रेमेडी