lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > ऑफीसमध्ये कायम कॉन्फीडन्ट दिसायचं तर लक्षात ठेवा 4 गोष्टी...तुमचंही पडेल इम्प्रेशन

ऑफीसमध्ये कायम कॉन्फीडन्ट दिसायचं तर लक्षात ठेवा 4 गोष्टी...तुमचंही पडेल इम्प्रेशन

4 Body Language Tips To Look Confident : आत्मविश्वास मिळवण्यासाठी करायला हव्यात अशा ४ सोप्या गोष्टी कोणत्या ते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 10:05 AM2022-11-14T10:05:16+5:302022-11-14T10:10:02+5:30

4 Body Language Tips To Look Confident : आत्मविश्वास मिळवण्यासाठी करायला हव्यात अशा ४ सोप्या गोष्टी कोणत्या ते पाहूया...

4 Body Language Tips To Look Confident : To always look confident in the office, remember 4 things...you will also make an impression | ऑफीसमध्ये कायम कॉन्फीडन्ट दिसायचं तर लक्षात ठेवा 4 गोष्टी...तुमचंही पडेल इम्प्रेशन

ऑफीसमध्ये कायम कॉन्फीडन्ट दिसायचं तर लक्षात ठेवा 4 गोष्टी...तुमचंही पडेल इम्प्रेशन

Highlightsनिराश असालच तर ती निराशा तुमच्या चेहऱ्यावर दिसू देऊ नका.ऑफीसमध्ये कधीही कोणाशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलायला हवे.

ऑफीसमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यातही आपण कॉन्फीडन्ट दिसत असू तरच आपले सगळ्यांसमोर एकप्रकारचे इंप्रेशन पडते. आता हा कॉन्फीडन्स आपल्याला कसा येतो असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. आपल्याकडे असलेल्या गुणांमुळे किंवा आपल्यातील सकारात्मकतेमुळे आपण स्वत:मधला आत्मविश्वास जागवू शकतो. ऑफीसच्या ठिकाणी आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर आपल्याला कामात आणि आपल्या अधिकाऱ्यांशी किंवा सहकाऱ्यांशी डील करताना अडचणी येत नाहीत. मात्र आपल्याकडे पुरेसा आत्मविश्वास नसेल तर मात्र आपण सगळ्यांमध्ये स्वत:ची इमेज गमावून बसतो. आता हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी करायला हव्यात अशा ४ सोप्या गोष्टी कोणत्या ते पाहूया (4 Body Language Tips To Look Confident)...

(Image : Google)
(Image : Google)

१. पोश्चरकडे लक्ष द्या

बरेचदा कामाच्या नादात आपण खांद्यातून किंवा कंबरेतून वाकतो. पण असे पोश्चर आपल्यात कॉन्फीडन्स नसल्याचे दर्शवते. खांद्यातून तुम्ही ताठ असाल तर नकळत तुमची बॉडी लॅग्वेज चांगली दिसते आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास असल्याचे दिसते. 

२. आय कॉन्टॅक्ट

तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात पाहत नसाल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही असे समोरच्याला वाटू शकते. त्यामुळे ऑफीसमध्ये कधीही कोणाशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलायला हवे. त्यामुळे तुमची इमेज नक्कीच चांगली होण्यास मदत होते. 

३. हातवारे 

तुम्ही कसे हातवारे करता यावरही तुमच्याबद्दलची इमेज अवलंबून असते. तुम्ही खूप जास्त हातवारे करत असाल तर तुम्ही अॅग्रेसिव्ह आहात असा समोरच्याचा समज होऊ शकतो. त्यामुळे हातवारे करताना ते जपूनच करायला हवेत.

(Image : Google)
(Image : Google)

४. निराशेत राहणे टाळा 

ऑफीसमध्ये तुम्ही नैराश्यात दिसणे तुमच्या आत्मविश्वासाला धक्का लावणारे असू शकते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कारणाने निराश राहू नका. निराश असालच तर ती निराशा तुमच्या चेहऱ्यावर दिसू देऊ नका. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास विनाकारण कमी असल्याचे समोरच्याला समजते. 


 

Web Title: 4 Body Language Tips To Look Confident : To always look confident in the office, remember 4 things...you will also make an impression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.