सध्याच्या काळात मानवी आयुष्य यंत्रासारखे झालं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभराचं शेड्यूल आधीच ठरलेलं असतं. या धावपळीत आपण पैसा, करिअर आणि यश तर मिळवतो. पण त्या बदल्यात आरोग्य नावाचं सर्वात मोठं भांडवल गमावून बसतो. (Mudra for high BP) आज घराघरात अनेकांना तरुण वयातच जडलेली रक्तदाबाची समस्या आतून पोखरते. आजकाल तर विशी-तिशीतील तरुणांमध्येही बीपीच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. अनेकजण यावर उपाय म्हणून आयुष्यभर गोळ्या घेण्याचा मार्ग निवडतात.
सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तणावाखाली वावरत आहे.(Mudra for stress relief) ऑफिसचे डेडलाईन्स असोत, भविष्याची चिंता असो किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वांचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असतो.(Yoga for blood pressure) जेव्हा मानसिक तणाव आणि चिंता मर्यादेबाहेर जाते, तेव्हा त्याचे रूपांतर हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबामध्ये होते.
सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी, योग आणि ध्यान हे वरदान ठरू शकते. या विशेष मुद्रांपैकी एक म्हणजे धर्मचक्र मुद्रा. ही मुद्रा केवळ शरीराला बळकटी देत नाही तर मानसिक शांती, तणावमुक्ती आणि एकाग्रता वाढविण्यास देखील मदत करते. धर्मचक्र मुद्रेचे अनेक फायदे आहेत. ते शरीरात ऊर्जेचा सतत प्रवाह वाढवते आणि मानसिक एकाग्रता सुधारते.
धर्मचक्र मु्द्रेमुळे तणाव, उच्च रक्तदाब आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. जेव्हा आपण धर्मचक्र मुद्रा करतो तेव्हा हाताच्या बोटांमधील ऊर्जेचे चक्र पूर्ण होते. यामुळे मेंदूला शांत राहण्याचे संकेत मिळतात. इतकंच नाही तर हार्मोन्सची पातळी कमी होऊन मन शांत होते.
उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण म्हणजे मानसिक अशांती किंवा रक्तवाहिन्यांवरील ताण. ही मुद्रा नियमितपणे केल्याने हृदयाचे ठोके नियमित होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते.
आपल्याला सतत भीती किंवा टेन्शन येत असेल तर ही मुद्रा विचार स्थिर करते. यामुळे मनातील नकारात्मक विचारांचे चक्र थांबवते. ही मुद्रा करताना दोन्ही हाताने अंगठा आणि तर्जनी यांची टोके जोडून एक वर्तुळ तयार करा. उरलेली तीन बोटे सरळ ठेवा. उजवा हात हृदयाच्या जवळ असावा आणि तळहात बाहेरच्या बाजूला असावा. ही मु्द्रा करताना १० ते १५ डोळे मिटून शांत ठिकाणी बसून करा. नियमितपणे ही मुद्रा केल्यास हाय बीपी आणि टेन्शनमध्ये लवकर आराम मिळतो.
