Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > World Bicycle Day 2025: अभिनय कमाल आणि सायकलिंग व पोहण्यात देशात नंबर १, लोकप्रिय अभिनेत्रीची जिद्द

World Bicycle Day 2025: अभिनय कमाल आणि सायकलिंग व पोहण्यात देशात नंबर १, लोकप्रिय अभिनेत्रीची जिद्द

World Bicycle Day 2025: Great acting and number 1 in the cycling and swimming : शूभा खोटे या फक्त अभिनेत्री नाहीत तर एक उत्तम खेळाडू आहेत. पाहा त्यांचा प्रवास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 14:35 IST2025-06-03T14:32:49+5:302025-06-03T14:35:57+5:30

World Bicycle Day 2025: Great acting and number 1 in the cycling and swimming : शूभा खोटे या फक्त अभिनेत्री नाहीत तर एक उत्तम खेळाडू आहेत. पाहा त्यांचा प्रवास.

World Bicycle Day 2025: Great acting and number 1 in the cycling and swimming | World Bicycle Day 2025: अभिनय कमाल आणि सायकलिंग व पोहण्यात देशात नंबर १, लोकप्रिय अभिनेत्रीची जिद्द

World Bicycle Day 2025: अभिनय कमाल आणि सायकलिंग व पोहण्यात देशात नंबर १, लोकप्रिय अभिनेत्रीची जिद्द

'शुभा खोटे' हे नाव मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत नावाजलेले आणि लोकप्रिय असे नाव आहे. (World Bicycle Day 2025: Great acting and number 1 in the cycling and swimming)शुभा खोटे यांनी कायमच त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. श्रोत्यांच्या मनात एक मानाचे स्थान निर्माण केले आहे. शुभा खोटे यांनी त्यांच्या अभिनयाला १९५० मध्ये सुरुवात केली. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. फक्त चित्रपट नाही तर त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी त्या ओळखल्या जातात. 

फिल्मफेअरच्या साइटवर सांगितल्यानुसार, शुभा खोटेंच्या मते त्या सुंदर वैगेरे नाहीत. त्यांना अभिनय क्षेत्रात यायचेही नव्हते. त्यांना अभिनय आवडायला लागला मात्र त्यांच्या मते त्या कायम एक टॉमबॉयच होत्या. त्यांनी अनेक छान भूमिका केल्या आहेत. त्या विनोदी अभिनय तर अगदी उत्तम करायच्या. अभिनय तर त्यांच्या रक्तातच आहे. शुभा खोटे या नंदू खोटे यांची मुलगी आणि विजू खोटे यांची बहीण. हे दोघेही अभिनय क्षेत्रात होते. 

शुभा खोटे यांचा जन्म मुंबईतील एका क्रीडाप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जिम्नॅस्टिक्स करायचे. ते एक उत्तम खेळाडू होते. त्यामुळे शुभा यांना लहानपणापासूनच क्रिडाक्षेत्राची आवड लागली. त्यांना त्यांचे वडील विविध खेळ शिकवायचे. त्यातून शुभा यांना पोहण्याची आणि सायकल चालवण्याची आवड लागली. त्यांनी फक्त छंद म्हणून या क्रिडाप्रकारांकडे पाहिले नाही. त्या क्षेत्रांत त्यांनी कौशल्य प्राप्त केले. विविध प्रकार शिकून घेतले. नियमित सराव सुरु केला. स्पर्धांमध्येही भाग घ्यायला सुरवात केली. १९५२ ते १९५५ या कालावधीत, त्यांनी सलग तीन वर्षे राष्ट्रीय सायकलिंग आणि पोहण्याच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. त्यांचा प्रवास महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. 

त्यांच्या सायकलिंगच्या प्रवासाची सुरुवात एका महत्त्वाच्या वाक्याने झाली. असे त्या सांगतात. शुभा त्यांच्या पहिल्या सायकल शर्यतीसाठी तयारी करत होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले, "जर तुला स्ट्रेचरवर घरी आणावं लागलं तरी चालेल, पण तुला ही शर्यत काहीही करुन जिंकायची आहे." या वाक्यांमुळे एखाद्याला भीती वाटली असती. क्षमतेवर शंका आली असती मात्र, वडिलांच्या शब्दांनी प्रेरित होऊन, शुभा यांनी ती शर्यत जिंकली आणि त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला सुरुवात झाली. 

दोन कामं जास्तीची करायला लागल्यावर महिलांना जमत नाही असे म्हणाऱ्यांनी एकदा शुभा खोटे यांची माहिती नक्कीच वाचायला हवी. एक महिला अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करु शकते. शुभा खोटे या मल्टीटास्किंग महिला कशा असतात, याचे उत्तम उदाहरण आहेत. 
 

Web Title: World Bicycle Day 2025: Great acting and number 1 in the cycling and swimming