Join us

सुपरसखी : तिच्यामुळे आम्ही सारे सुखी आहोत, ती आहे म्हणून आम्ही आहोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 15:33 IST

Womens Day Special Super Sakhi: लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा बक्षिस विजेता लेख, गोव्याचे संकेत चारी लिहितात आपल्या पत्नीच्या यशाची गोष्ट.

ठळक मुद्देती माझी नुसती बायको नसून माझा विश्वास आहे. माझी प्रेरणा आहे. ती माझ्या जीवनात आल्याबद्दल मी सदैव तिचा ऋणी असेन.

संकेत चारीफोंडा, गोवा 

प्रत्येक स्त्री ही एक सुपरसखीच असते. पण माझ्यासाठी माझी सुपरसखी म्हणजे माझी बायको. प्रियांका तिचं नाव. प्रियांका चारी. तिचा जन्म झाला गोव्यातल्या सावई बेरे फोडा या गावी. ती लहान असतानाच आई- वडिलांचे छत्र हरपले. घरच्या मंडळींनी सांभाळ केला. पण ती डगमगली नाही. खडतर कष्ट घेवून ती शिकली आणि आपल्या पायावर उभी राहिली. विद्यालयामध्ये ती शिक्षिका म्हणून काम करु लागली. कित्येक मुलांचं करिअर घडवण्यात तिनं मोलाची भुमिका बजावली. 

 

तिचं आणि माझं लग्न ठरवून झाले. मला तिचं स्थळ आलं आणि एका महिन्याच्या आत कसलाच घोळ न घालता आमचा लग्नसोहळा संपन्न झाला. तिने आमच्या कुटुंबाशी बऱ्यापैकी जुळवून घेतलं. सगळ्यांशी मायेनं वागते. माझ्यासाठी तर ती माझी बायको नसून माझा गुरुच आहे. माझ्या जीवनात तिचा खुप मोठा हातभार आहे. आपण म्हणतो ना घरोघरी मातीच्या चुली... त्याचप्रमाणे प्रत्येक सामान्य नवरा बायकोसारखं आमचंही भांडण होत असतं. पण त्या भांडणातसुध्दा एक प्रकारची आपुलकी लपलेली असते. 

जुन्या लेदर बुटांवर सुरकुत्या आल्या? घ्या उपाय- ५ मिनिटांत सुरकुत्या जाऊन बूट होतील नव्यासारखे कडक

आमच्या सर्वांसाठी ती एक मंद दिव्याची वात होऊन उजळत असते. पण जर आम्हा कुणावर संकट आलं तर ती मशालीसारखी पेटून उठते. तिला माझ्याकडून काही जास्त अपेक्षा नसते की मला अमूकतमूक पाहिजे. तिला फक्त पाहीजे असतो तो म्हणजे माझा वेळ. माझ्यासोबत वेळ घालवायला ती आतुरलेली असते. प्रेमाच्या दोन शब्दांनी खुश होते. आम्ही साेबत असलो की त्यानं दोघांना दिलासा वाटतो. चार घटका बोलून सर्व थकवा नाहीसा होतो. पेशाने जरी ती शिक्षिका असली तरीसुद्धा ती एक सुगरणही आहे. कधी कधी मला वाटत की तिनं हॉटेल व्यवसायात उतराय‌ला पाहिजे.

फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- उन्हाळ्यात घरात घालायला हलक्याफुलक्या कपड्यांची स्वस्त खरेदी

मोठी भरारी घेण्याची क्षमता तिच्यात आहे. अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढा देत असते. जरी ती वयाने माझ्यापेक्षा लहान असली तरी तिला जीवनातले बारकावे माझ्यापेक्षा जास्त माहीत आहेत. तिचा तो जीवनातला संघर्ष जन्मापासून आजपर्यंत चालू आहे. ती माझी नुसती बायको नसून माझा विश्वास आहे. माझी प्रेरणा आहे. ती माझ्या जीवनात आल्याबद्दल मी सदैव तिचा ऋणी असेन.

 

टॅग्स :महिला दिन २०२५सुपरसखी कथाप्रेरणादायक गोष्टी