बायकांचं क्रिकेट म्हणजे भातूकली असे टोमणे मारणे आता कमी झाले आहे. महिला क्रिकेटही आता बऱ्यापैकी गांभिर्याने घेतले जाते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या महिलांनी केलेल्या उत्कृष्ट खेळी आणि कामगिरी. भारतात जसे मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना यांनी महिला क्रिकेटला उंची प्राप्त करुन दिली. (women world cup 2025, Shrilanka, Udeshika Prabodhani, Shrilankan women bowler sets record in her 40s, inspiring stories )इतरही देशांतील महिला खेळाडूंना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. असेच एक व्यक्तीमत्त्व म्हणजे श्रीलंकन खेळाडू उदेशिका प्रबोधिनी. (women world cup 2025) (Udeshika Prabodhani Shrilanka)
उदेशिका प्रबोधनी ही श्रीलंकेची एक अनुभवी आणि दमदार महिला क्रिकेटपटू आहे. ४० वर्षे आणि १० दिवस इतकं तिचं वय. मात्र चाळिशीत आपल्या देशासाठी तिन दमदार कामगिरी करत बळी मिळवणं सुरुच ठेवलं आहे. तिचा जन्म २० सप्टेंबर १९८५ रोजी झाला आणि ती एक लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आहे. २००९ साली तिने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्याच वर्षी तिने टी२० सामन्यांमध्येही पदार्पण केले. गेली अनेक वर्षे ती श्रीलंका संघासाठी सातत्याने खेळत आहे आणि संघाच्या गोलंदाजी विभागाचा अविभाज्य भाग ठरली आहे. गोलंदाजीतील चपळता, अचूकता आणि प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकणाऱ्या शैलीसाठी ती ओळखली जाते.
प्रबोधनीने अनेक जागतिक स्पर्धांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये झालेल्या महिला टी२० विश्वचषकात तिने संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेच्या कामगिरीत मोठा हातभार लावला. तिची ही सातत्यपूर्ण गोलंदाजी तिला श्रिलंका महिला संघाची एक महत्वाची खेळाडू ठरवते. फक्त श्रिलंकेसाठीच नाही तर जगभरातील उत्तम महिला गोलंदाजांमध्ये तिचा समावेश केला जातो. तिने आपल्या अनुभवाचा उपयोग करून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे कामही वेळोवेळी केले आहे.
अलीकडेच तिने एक नवा टप्पा गाठला. काही शारीरिक अडचणींमुळे तिने काही दिवस क्रिकेट खेळायचे सोडले होते. जवळपास एका वर्षाच्या दुखापतीनंतर तिने जबरदस्त कमबॅक केला. २०२५ महिला विश्वचषकासाठी तिची निवड झाली आणि वयाच्या चाळिसाव्या वर्षीही तरुणींऐवाजी तिला संघात का घेतले गेले? याचे उत्तर तिने आपल्या कामगिरीतू विश्वचषकाच्या सुरवातीलाच दिले. उदेशिका पहिली सिमर बॉलर ठरली जिने वयाच्या ४०व्या वर्षी विकेट मिळवली. 'Age is just a number' हे तिने सिद्ध केले.