हातची नोकरी गेली की कोणालाही साहजिकच वाईट वाटतं. आर्थिक कमाई थांबते. त्यामुळे मग खर्चाचं गणित कसं सोडवायचं हा प्रश्नही समोर उभा राहातो. कोरोना काळात तर हा अनुभव अनेकांना आला. कित्येक व्यवसाय बंद पडले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावं लागलं. कित्येकांची या काळात नोकरी गेली. तशीच तिचीही गेली. सुरुवातीला तिलाही खूप वाईट वाटलं. आता चरितार्थ कसा चालवावा हा मोठा प्रश्न होताच. पण तिच्या अंगी असलेल्या कलेतून तिने उद्योग सुरू केला आणि आज तिने अशी काही भरारी घेतली आहे की बरं झालं त्यावेळी नोकरी गेली असं तिला वाटत आहे..
ही खरीखुरी गोष्ट आहे रांची येथे राहणाऱ्या शालिनी लकडा या महिलेची. शालिनी आणि तिचे पती दोघांचीही नोकरी गेली होती. शालिनीच्या पतीने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे आणि त्यांना वेगवेगळे बेकरी पदार्थ खूप चांगले करता येतात. शिवाय शालिनीलाही केक बनविण्याचा छंद होताच. ती खूप छान केक करायची. मग त्यांनी ठरवलं की आता त्यांच्या अंगी असणाऱ्या या कलेचाच उपयोग पैसे कमाविण्यासाठी करायचा.
५ मिनिटांत होणारी कच्च्या कांद्याची भाजी! चव अशी भारी की नेहमीच करून खाल
त्यांनी घरगुती स्तरावर केक, बिस्कीट, पाव असे पदार्थ तयार करून ते विकायला सुरुवात केली. सगळ्यांपेक्षा वेगळी चव आणि प्रत्येक पदार्थ अगदी फ्रेश स्वरुपात ग्राहकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न यामुळे त्यांच्याकडच्या पदार्थांची मागणी वाढली.
त्वचेवर ग्लो हवा, वजनही कमी करायचंय? पुदिन्याच्या पानांचा खास उपाय, फिट राहाल- सुंदर दिसाल
हळूहळू त्यांचा व्यवसाय एवढा वाढला की आता सध्या त्यांचे प्रोडक्ट एक लोकल ब्रॅण्ड म्हणून जवळपासच्या भागात ओळखले जात आहे. आता व्यवसायाचा विस्तारही बराच वाढला असून त्यांच्याकडे १५ ते २० लोकांचा स्टाफ आहे. बेकरीसोबतच त्यांनी एक रेस्टॉरंटही सुरू केलं आहे.
एरंडेल तेलाचे फक्त काही थेंब त्वचेला देतील ६ जबरदस्त फायदे, 'या' पद्धतीने लावा- सौंदर्य खुलेल
तिथे नाश्त्याचे आणि बेकरीचे कित्येक पदार्थ मिळतात. त्यांच्याकडची काही बिस्किटं ग्राहकांना एवढी आवडतात की ते नेहमीच आऊट ऑफ स्टॉक असतात. हातात असलेल्या कलेचा सदुपयोग, कामावर असणारं प्रेम आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी घेतलेली ही झेप सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.
