Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या सई जाधवने ९३ वर्षांचा विक्रम मोडला, ठरली टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2025 10:44 IST

Sai Jadhav Territorial Army: Maharashtra woman army officer: First woman lieutenant Territorial Army: महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील सई जाधव टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट ठरली.

वर्षानुवर्षे समाजमनात ही गोष्ट इतकी खोलवर रुजली गेली आहे की, गणवेश, शिस्त, रणभूमी आणि बलिदान हे शब्द आपोआप पुरुषांशीच जोडले जात आहेत.(Sai Jadhav Territorial Army) स्त्रीच्या वाट्याला मात्र घर, संसार, कुटुंब आणि त्याग कायमचा. पण तिने स्वत:ला देशसेवेसाठी वाहून घ्यायचं ठरवलं. महाराष्ट्राच्या लेकीनं ही रेषा पुसून टाकली आणि इतिहास घडवला.महाराष्ट्राची सई जाधव. नाव साधं, पण काम असाधारण. ९३ वर्षांचा जुना विक्रम मोडत सई जाधव टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट ठरली.(Maharashtra woman army officer) हा फक्त वैयक्तिक यशाचा क्षण नाही, तर लाखो मुलींच्या स्वप्नांना पंख देणारा क्षण आहे. स्त्री करू शकत नाही या वाक्याला तिनं पूर्णविराम दिला.

तव्यावर टाकताच चपाती करपते, फुगतही नाही? ४ सोप्या ट्रिक्स, चपाती होईल कापसासारखी मऊ- टम्म फुगेलही

देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये यावर्षी ऐतिहासिक क्षण लिहिला गेला. ९३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला ऑफिसर कॅडेटने या प्रतिष्ठित संस्थेत यशस्वीरित्या आपले प्रशिक्षण पूर्ण केले. हा सन्मान मिळाला तो महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील सई जाधवला. प्रादेशिक सैन्याच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत आपले प्रशिक्षण पूर्ण करुन ती लेफ्टनंट बनली. हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. 

तिने  आयएमएमध्ये सहा महिन्यांचे लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि शिस्त राखत तिने आपल्या स्वप्नांच्या दिशेने भरारी घेतली. लेफ्टनंट सई जाधव हिने IMA मध्ये प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ऑफिसर कॅडेट बनून नवा विक्रम केला. तिचे प्रशिक्षण आयएमए कोर्समधून नव्हे तर टेरिटोरियल आर्मीच्या स्पेशल ट्रेनिंग कोर्समधून पूर्ण केले आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या १६ ऑफिसर कॅडेट्समध्ये ती एकमेव महिला होती. तिची कुटुंबातून देखील तिला यासाठी पाठबळ मिळाले. तिचे वडिल संदीप जाधव हे सुद्धा भारतीय सैन्यात मेजर आहेत. तर आजोबा ब्रिटिश सैन्यात सेवा करत होते. 

या यशामागे तिच्या कुटुंबाचं पाठबळ, स्वतःवरचा विश्वास आणि देशप्रेमाची ठाम भावना आहे. सई जाधव आज फक्त लेफ्टनंट नाही तर अनेक मुलींसाठी ती प्रेरणा ठरली आहे. ग्रामीण-शहरी प्रत्येक मुलीसाठी ती एक जिवंत उदाहरण आहे की स्वप्न मोठं असलं आणि जिद्द पक्की असेल, तर इतिहास घडवता येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Sai Jadhav: First woman Lieutenant, breaks 93-year Territorial Army record.

Web Summary : Maharashtra's Sai Jadhav becomes the first woman Lieutenant in the Territorial Army, breaking a 93-year record. Trained at the Indian Military Academy, she inspires women, proving dedication can rewrite history. Her family's military background fueled her achievement.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी