आपॅरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा भारत-पाक तणाव. भारतीय सैन्य मोठ्या हिमतीने शत्रूचा पाडावा करते आहे.(Shivangi Singh Rafale pilot) आणि त्याचवेळी चर्चा आहे राफेल या लढाऊ विमानाची पहिली भारतीय महिला पायलट शिवांगी सिंह यांची.(India’s first woman Rafale pilot) प्रचंड आत्मविश्वास आणि देशप्रेमासह त्या देशासाठी आपली कामगिरी बजावत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्येही महत्वाची भूमिका बजावत असल्याचे समजते.(Woman fighter pilot Shivangi Singh)
शिवांगी सिंह या मूळच्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील. वयाच्या ९ व्या वर्षी पायलट होण्याचे स्वप्न पाहिले.(Indian Air Force female pilot) त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हैदराबादमध्ये वायूसेना प्रशिक्षण घेतले.
देश सर्वप्रथम म्हणत देशासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी! भारतीय महिलांच्या प्रतिनिधी..
एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, लहान असताना नवी दिल्लीच्या वायूसेना संग्रहालयात गेले असता तिथे पहिल्यांदाच लढाऊ पाहिले आणि आपण पायलट होऊ अशी इच्छा मनात बाळगली. तेच जगण्याचे ध्येय बनले.
शिवांगी सिंह २०१७ मध्ये भारतीय हवाई दलात (IAF) मध्ये सामील झाल्या. त्यांना महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीत कमिशन मिळाले. २०२० मध्ये राफेल पायलट म्हणून निवड झाली. भारतातील पहिला महिला लढाऊ पायलट ठरल्या. यापूर्वी त्यांनी मिग -२१ बायसन विमानही उडवले होते.
शिवांगी सांगतात, आई माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मी फक्त शिकावे इतकेच नाही तर स्वावलंबी व्हावे अशी तिची इच्छा होती. तिची सोबत आणि प्रेरणा कायम माझ्यासोबत आहे.