Lokmat Sakhi >Inspirational > लोकांनी तिला सांगितलं, तुला काहीच नाही जमणार! तिनं जागतिक ब्यूटी क्वीन होऊन दाखवलं...

लोकांनी तिला सांगितलं, तुला काहीच नाही जमणार! तिनं जागतिक ब्यूटी क्वीन होऊन दाखवलं...

Vidhu Ishiqa Creates History for India by Winning Mrs Earth International 2025 : Vidhu Ishiqa Creates History For India As She Wins Mrs Earth International 2025 : विधु इशिका बनली 'मिसेस अर्थ इंटरनॅशनल २०२५' मुलींना संदेश देत उंचावली भारतीयांची मान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 17:59 IST2025-07-23T17:58:00+5:302025-07-23T17:59:35+5:30

Vidhu Ishiqa Creates History for India by Winning Mrs Earth International 2025 : Vidhu Ishiqa Creates History For India As She Wins Mrs Earth International 2025 : विधु इशिका बनली 'मिसेस अर्थ इंटरनॅशनल २०२५' मुलींना संदेश देत उंचावली भारतीयांची मान...

Vidhu Ishiqa Creates History For India As She Wins Mrs Earth International 2025 Vidhu Ishiqa Creates History for India by Winning Mrs Earth International 2025 | लोकांनी तिला सांगितलं, तुला काहीच नाही जमणार! तिनं जागतिक ब्यूटी क्वीन होऊन दाखवलं...

लोकांनी तिला सांगितलं, तुला काहीच नाही जमणार! तिनं जागतिक ब्यूटी क्वीन होऊन दाखवलं...

'विधु इशिका' ह्या नावामुळे आज संपूर्ण देशाला अभिमान वाटतोय. टीव्ही होस्ट म्हणून छोट्याशा पडद्यावरुन सुरुवात करत पुढे जाऊन मिळवलेल्या यशाबद्दल आज संपूर्ण भारतवासियांकडून तिचे तोंड भरुन कौतुक होताना दिसत आहे. विधु इशिका हिने 'Mrs Earth International 2025' ही स्पर्धा जिंकून भारताची (Vidhu Ishiqa Creates History for India by Winning Mrs Earth International 2025)  मान उंचावली आहे. या अभूतपूर्व यशामुळे विधुसोबतच सगळे भारतीय देखील अत्यंत आनंदी आहे. 'विधु इशिका' हिने ‘मिसेस अर्थ इंटरनॅशनल २०२५’ हा सौंदर्य स्पर्धेचा किताब जिंकून भारतीयांना अभिमानाचा क्षण दिला आहे(Vidhu Ishiqa Creates History For India As She Wins Mrs Earth International 2025).

'मिसेस इंडिया युनिव्हर्स - द ड्रीम' या इंस्टाग्राम अकाउंटवर 'विधु इशिका' हिच्या यशाबद्दल माहिती शेअर करण्यात आली आहे.या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, विधु इशिका हिने ब्यूटी पेजेंट (Vidhu Ishiqa) जिंकण्यापूर्वी काही टीव्ही शोज होस्ट केले होते. तसेच, तिने एका सस्टेनेबल फॅशन प्लॅटफॉर्मचीही स्थापना केली. आता ‘मिसेस अर्थ इंटरनॅशनल २०२५’ झाल्यानंतर ती खूप आनंदी दिसत आहे. 

मुलींसाठी दिला प्रेरणादायी संदेश.... 

भारतीय सौंदर्य, संस्कृती आणि स्त्रीत्वाची ओळख जागतिक व्यासपीठावर अधोरेखित करत विधु इशिका हिने मिसेस अर्थ इंटरनॅशनल २०२५ हा किताब पटकावला. पूर्वी टीव्ही शोज होस्ट करणाऱ्या विधु इशिकाने केवळ सौंदर्यच नव्हे तर बुद्धिमत्ता आणि विचारांनीही परीक्षकांचं मन जिंकलं.

विधु इशिकांने जिंकल्यानंतर आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना म्हटलं की, हे फक्त माझेच यश नाही तर त्या प्रत्येक मुलीचे यश आहे जिने कधी तरी हे ऐकलं असेल  की तू हे करू शकत नाहीस.” तिचा हा संदेश महिलांना, मुलींना प्रेरणा देणारा आहे. आज विधु इशिकाचे यश हे केवळ तिचं वैयक्तिक यश नाही, तर संपूर्ण भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे.


Web Title: Vidhu Ishiqa Creates History For India As She Wins Mrs Earth International 2025 Vidhu Ishiqa Creates History for India by Winning Mrs Earth International 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.