lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > Tokyo Olympics: अभ्यासात ढ म्हणून कमलप्रीत कौरला नावं ठेवणारे ‘नापास’ ! थाळीफेकमधे गाठली अंतिम फेरी..

Tokyo Olympics: अभ्यासात ढ म्हणून कमलप्रीत कौरला नावं ठेवणारे ‘नापास’ ! थाळीफेकमधे गाठली अंतिम फेरी..

Tokyo Olympics: Kamalpreet Kaur - रेकॉर्ड ब्रेकर ही तिची ओळख.ही मुलगी भारतासाठी ऑलिम्पिकमधलं पहिलं वहिलं पदक नक्की आणेल अशी आशा आज संपूर्ण देशाला आहे. आज देशाची आशा झालेल्या पंजाबमधल्या एका खेड्यातल्या कमलप्रीत कौरच्या ध्येयवादी प्रवासाची गोष्ट. India@olympics2021

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 02:44 PM2021-07-31T14:44:25+5:302021-07-31T15:51:01+5:30

Tokyo Olympics: Kamalpreet Kaur - रेकॉर्ड ब्रेकर ही तिची ओळख.ही मुलगी भारतासाठी ऑलिम्पिकमधलं पहिलं वहिलं पदक नक्की आणेल अशी आशा आज संपूर्ण देशाला आहे. आज देशाची आशा झालेल्या पंजाबमधल्या एका खेड्यातल्या कमलप्रीत कौरच्या ध्येयवादी प्रवासाची गोष्ट. India@olympics2021

Tokyo Olympics: Kamalpreet Kaur Reached the final round in Discus Throw. medal sure for India | Tokyo Olympics: अभ्यासात ढ म्हणून कमलप्रीत कौरला नावं ठेवणारे ‘नापास’ ! थाळीफेकमधे गाठली अंतिम फेरी..

Tokyo Olympics: अभ्यासात ढ म्हणून कमलप्रीत कौरला नावं ठेवणारे ‘नापास’ ! थाळीफेकमधे गाठली अंतिम फेरी..

Highlightsपंजाबमधील श्री मुख्तार साहिब जिल्ह्यातील बादल या छोट्याशा गावातली ही कमलप्रीत कौर.कमलप्रीतची अँथलिट म्हणून सुरुवात गोळा फेकीनं झाली. मात्र नंतर ती थाळी फेक प्रकराकडे वळली.थाळीफेक स्पर्धेत 65 मीटर पार थाळी फेक करणारी कमलप्रीत ही पहिली भारतीय महिला बनली. हा विक्रम नोंदवतान तिचा आदर्श असलेल्या सीमा पुनियालाही तिनं मागे टाकलं आहे.छायाचित्रं:- गुगल

Tokyo Olympics :- कमलप्रीत कौर या 25 वर्षीय खेळाडूनं जगाच लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं. कमलप्रीतनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये थाळीफेक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. ही मुलगी भारतासाठी ऑलिम्पिकमधलं पहिलं वहिलं पदक नक्की आणेल अशी आशा आज संपूर्ण देशाला आहे. आज देशाची आशा झालेल्या या कमलप्रीतला तिच्या कुटुंबाला काही वर्षांपूर्वी स्वत:च्या भविष्याबद्दल कोणतीच आशा नव्हती. कारण एकच कमलप्रीत अभ्यासात अगदीच ढ होती. आजही आपल्या देशात कर्तबगारीची उंची अभ्यासातल्या कामगिरीवर मोजली जाते तिथे पंजाबमधल्या एका खेड्यातली कमलप्रीत अभ्यासात जेमतेम असल्यानं तिला पुढे काही भविष्यच नव्हतं हे तिला स्वत:लाही पक्कं माहिती होतं.

छायाचित्र:- गुगल 

पंजाबमधील श्री मुख्तार  साहिब जिल्ह्यातील बादल या छोट्याशा गावातली ही कमलप्रीत कौर. वडील शेती करतात. तसंही गावातलं वातावरण मुलींनी कर्तबगार बनावं असं नव्हतंच. कमी वयात लग्न करुन देण्याची गावातली परंपरा. आपल्या अभ्यासातला जेमतेमपणा आपल्याला दहावी पार होऊ देईल की नाही आणि झालोच पार कसेबसे तरी मार्क बघून पुढच्या शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजात नंबर लागणं अशक्यच हे कमलप्रीतला इतरांनी सांगण्याची गरज नव्हती. तिचं तिलाच हे माहित होतं. आणि म्हणूनच मनात भीती होती की आता आपलंही लग्न इतर मुलींसारखं लवकर लागणार.
पण कमलप्रीतला या परंपरेचा भाग व्हायचं नव्हतं. तिला कसंही करुन लग्न टाळायचं होतं. नुसतं लग्नच टाळायचं होतं असं नाही तर तिला तिचं नाव कमवायचं होतं. अभ्यासात ना सही पण खेळात आपण करिअर करु शकतो याची तिला खात्री होती. लहानपणापसूनच तिला खेळाची आवड होती. शिवाय शारीरिक ताकदही भरपूर. सहा फूट एक इंच उंचीच्या कमलप्रीतनं मग मनाची ताकद वाढवायला सुरुवात केली. लहानपणापासून तिला क्रिकेटपटू व्हायचं होतं. ती खेळात उत्तम आहे हे बघून दहावीत असताना तिच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिकेनं तिला अँथलिट बनण्याचा सल्ला दिला. तिला राज्यस्तरीय खेळामधे सहभागी होण्यास सांगितलं.

कमलप्रीतची अँथलिट म्हणून सुरुवात गोळा फेकीनं झाली. मात्र नंतर ती थाळी फेक प्रकराकडे वळली. शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहानामुळे तिनं 2012 मधे स्वत:साठी यशस्वी अँथलिटचं स्वप्न पाहाण्यास आणि त्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. 2014 पासून कमलप्रीतनं कसून सरावाला सुरुवात केली. तिच्या गावातील स्पोर्टस ऑथेरिटी ऑफ इंडिया अर्थात ( साई) मध्ये तिनं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सीम पुनिया ही तिचा आदर्श होती. तिच्यासारखं व्हायचं आपल्याला असं ठरवून तिनं संपूर्ण लक्ष थाळी फेककडे केंद्रित केलं. तिथून सराव- स्पर्धा- बक्षिसं- रेकॉर्ड हे सुरु झालं आणि आज ती टोकियो ऑलिम्पिकमधे थाळीफेक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली.

छायाचित्र:- गुगल 

ऑलिम्पिकपर्यंत पोहोचोस्तवर कमलप्रीतनं भारतात चांगलं नाव कमावलं होतं. रेकॉर्ड ब्रेकर ही तिची ओळख. 2016 मधे अठरा वर्षाखालील आणि 20 वर्षाखालील स्पर्धेत कमलप्रीत नॅशनल चॅम्पियन झाली. 2017 मधे  वर्ल्ड  युनिर्व्हसिटी गेम्समधे ती सहाव्या स्थानावर होती तर 2019 मधे दोहा येथील आशियाइ अँथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर आहे.

छायाचित्र:- गुगल 

कमलप्रीत मार्च 2020मध्ये अँथलेटिक्स फेडरेशन कप स्पर्धेत 65.05 मीटर लांब थाळी फेक करुन टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. ही पात्रता फेरी गाठताना तिने राष्ट्रीय रेकॉर्ड बनवलं. थाळीफेक स्पर्धेत 65 मीटर पार थाळी फेक करणारी कमलप्रीत ही पहिली भारतीय महिला बनली. हा विक्रम नोंदवतान तिचा आदर्श असलेल्या सीमा पुनियालाही तिनं मागे टाकलं. नंतर तीनच महिन्यांनी कमलप्रीतनं स्वत:चंच रेकॉर्ड मोडत 66.5 मीटर लांब थाळीफेक करुन राष्ट्रय स्तरावर नवीन रेकॉर्ड बनवलं.

संपूर्ण भारत या राष्ट्रीय रेकॉर्ड होल्डरकडे डोळे लावून बसला आहे. अंतिम फेरीत कमलप्रीत 12 खेळाडूंसोबत स्पर्धा करणार आहे. या अंतिम फेरीतही अमेरिकेच्या वालारी ऑलमेननंतर कमलप्रीत ही दुसर्‍या स्थानावर आहे. भारत आता तिच्या ऑलिम्पिक रेकॉर्डची वाट पाहातो आहे.

कमलप्रीतनं ही कमाल केल्यानंतर तिच्या वडिलांच्या कुलदीप सिंह यांच्या प्रतिक्रिया घेण्यास माध्यमांनी गर्दी केली. पण कुलदीप सिंह म्हणाले की, ' मी हा क्षण पाहूच शकलो नाही. मला कमलनं मॅचच्या टायमिंगबद्दल आदल्या दिवशीच सांगितलं होतं. मी टीव्हीही लावला. पण मॅच काही सुरु नव्हती आणि तेव्हाच मला शेतात महत्त्वाचं काम आलं आणि मी गेलो तोपर्यंत मॅच झाली आणि मी तो क्षण गमावला. पण आता कोणत्याही परिस्थितीत मी अंतिम मॅच चुकवणार नाही. कमलनं यापुढच्या मॅचमधे आणखी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केलाच असेल.' असं अभिमानानं सांगणार्‍या कमलप्रीतच्या वडिलांना आपली मुलगी देशासाठी मेडल आणेलच याची खात्री वाटते.

Web Title: Tokyo Olympics: Kamalpreet Kaur Reached the final round in Discus Throw. medal sure for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.