भारत-पाकिस्तानात युद्धविराम झाला असला तरी बलुचिस्तान सतत चर्चेत आहेच.(Kashish Chaudhary inspiration to women) तिथला स्वातंत्र्यलढा सुरुच असताना आता बातमी आली आहे की बलुचिस्तानमधील 'कशिश चौधरी' या पंचविस वर्षांच्या तरुणीने इतिहास रचला.(Kashish Chaudhary Balochistan) पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाला एकूणच संधी कमी असताना आता कशिशची बलुचिस्तान प्रांतातील सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. या पदावर बसणारी ती पहिली हिंदू महिला ठरली आहे. (Hindu woman in government)
देश सर्वप्रथम म्हणत देशासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी! भारतीय महिलांच्या प्रतिनिधी..
बलुचिस्तानमधील चगाई जिल्ह्यातील नोशकी शहरात ती राहते. तिने बलुचिस्तान लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षेत पास होऊन यश मिळवले. इतकेच नाही तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांसाठी प्रेरणास्थान बनली. पाकिस्तानी मीडियाशी संवाद साधताना कशिश म्हणाली की, सलग तीन वर्षे रोज आठ तास अभ्यास केला. शिस्त, कठोर परिश्रम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द मला या प्रवासात घेऊन आली. तर तिच्या वडिलांचा मुलीच्या झालेल्या कौतुकामुळे उर दाटून आला. ते म्हणाले की, माझ्या मुलीने जे काही साध्य केले आहे ते तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
कशिश चौधरी हिने वडिलांसह बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बगुती यांची क्वेटा येथे भेट घेतली. तिने असं म्हटलं की, महिलांसाठी आणि अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी काम करेल. पाकिस्तानात आता हिंदू समुदायाच्या महिला हळूहळू पुरुषप्रधान क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवत आहे. २०२२ च्या सुरुवातीला मनीषा रोपेता कराचीत पहिली हिंदू महिला एसपी बनली. तर पुष्पा कुमारी कोहली कराचीमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. २०१९ मध्ये सुमन पवन बोधनानी शाहदादकोट, सिंध येथे न्यायाधीश झाली.
पाकिस्तानात हिंदू महिलांची स्थिती अतिशय वाईट असताना या मुलीचे यश खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. जिद्द आणि मेहनत याबळावर ती तिथल्या व्यवस्थेशी झगडते आहे.